Maharashtra breaking news in marathi : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळत आहे. महाविकासआघाडी आणि महायुतीत जागावाटपाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. तर काही पक्षांनी उमेदवारांची घोषणा केली आहे. तर अनेक पक्षांतंर्गत बैठकाही होत आहेत.
पुण्यातील बावधनमध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना समोर आली आहे. धुक्यामुळे हेलिकॉप्टर कोसळलं. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. दोन पायलट आणि एका इंजिनिअरचा यात मृत्यू झाला आहे. याच हेलिकॉप्टरने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे प्रवास करणार होते अशी महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
अशाच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर...
लाइव्हब्लॉग बंद
ADVERTISEMENT
- 09:52 PM • 02 Oct 2024बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील फरार असलेले सहआरोपी आपटे आणि कोतवाल अखेर पोलिसांना सापडले!
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी आणि शाळेच्या संचालक मंडळात असलेले तुषार आपटे आणि उदय कोतवाल यांना काही वेळापूर्वीच अटक करण्यात आली आहे. हे दोघेही तब्बल दीड महिन्यांपासून फरार होते.
- 02:48 PM • 02 Oct 2024मविआ जागावाटपचा फॉर्म्युला ठरला? महायुतीचं पहिली यादी उद्या?
मविआचं जागावाटप दसऱ्याला जाहीर होणार असं म्हटलं जात आहे. तर महायुतीची पहिली यादी उद्या जाहीर होण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे.
- 01:13 PM • 02 Oct 2024Maharashtra News : मातोश्रीवरील बैठकांचे सत्र आज संपणार!
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मातोश्रीवर बैठक सत्राचा आजचा शेवटचा दिवस आहे. 26 सप्टेंबर पासून दररोज विविध जिल्ह्यांचा आढावा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला आहे. आज बारामती, मावळ, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील सातारा येथील विधानसभा निहाय आढावा उद्धव ठाकरे घेणार आहेत. या लोकसभा मतदारसंघ तसेच मुंबईतील काही विधानसभांचा उद्धव ठाकरे आढावा घेणार आहेत. या बैठकीसाठी बारामती, मावळ, पुणे, सातारा इथले प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
- 01:02 PM • 02 Oct 2024Maharashtra News : आज चंद्रपुरात ओबीसी महाएल्गार मेळावा! हाके, वडेट्टीवार राहणार हजर
ओबीसी सेवा संघाच्यावतीने आज चंद्रपुरात सायंकाळी पाच वाजता ओबीसी महाएल्गार मेळावा होत आहे. या मेळाव्याला प्रा. लक्ष्मण हाके, विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार, नवनाथ वाघमारे यांची उपस्थिती राहणार आहे.
- 12:52 PM • 02 Oct 2024Maharashtra News : महाराष्ट्रासह 9 राज्यात आज मुसळधार पावसाची शक्यता
महाराष्ट्रासह 9 राज्यात आज मुसळधार पाऊस कोसळणार, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. राज्यातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. याशिवाय पुणे, नगर, रायगड, धुळे, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस पडणार आहे. आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
- 12:37 PM • 02 Oct 2024Maharashtra News : पक्ष फोडून मित्र मिळवणारे 2029 ला सत्तेत कसे येतील?- जयंत पाटील
जे पक्ष फोडून मित्र बनले, त्यांचा आधार घेण्याची वेळ 2024 मध्ये भाजपवर आली. तो पक्ष 2029 ला सत्तेत कसा येईल? आता कमळाची परिस्थिती गंभीर आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील म्हणाले
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT