Maharashtra Assembly Election 2024 Live : 'आमच्यावर शंका घेणारे एका बापाची औलाद नाही', शाहांसोबतच्या भेटीवर राऊतांची प्रतिक्रिया

मुंबई तक

21 Oct 2024 (अपडेटेड: 21 Oct 2024, 04:15 PM)

Maharashtra Live Updates : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स आणि इतर महत्त्वाच्या घडामोडी 'मुंबई Tak'च्या या लाइव्ह ब्लॉगमध्ये जाणून घ्या फक्त एका क्लिकवर...

Mumbaitak
follow google news

Maharashtra Assembly Election 2024 LIVE : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून राजकीय मोर्चेंबाधणीला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत. भाजपने रविवारी आपल्या 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यानंतर आता पुढे काय घडणार कोण कोणत्या जागांवर आपले उमेदवार जाहीर करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर मोठ्या प्रमाणात सुरु आहेत.

महाविकास आघाडीचं जागावाटपही अद्याप झालेलं नाही. तसंच मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भूमिकाही महत्वाची ठरत आहे. याबाबतचे सर्व अपडेट्स तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील.

अशाच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर... 
 

 

लाइव्हब्लॉग बंद

  • 03:17 PM • 21 Oct 2024
    Maharashtra News: 'आमच्यावर शंका घेणारे एका बापाची औलाद नाही', शाहांसोबतच्या भेटीवर राऊतांची प्रतिक्रिया

    'शिवसेना कधीही दिल्लीसमोर झुकणार नाही. शाह आणि आमची भेट झाल्याचा दावा हास्यास्पद आहे. आम्ही भाजपसोबत जाण्यासाठी काही संघर्ष केला नाही. या षडयंत्रात आणखी लोक सहभागी असतील. भाजपचे लोक आम्हाला घाबरत आहेत. आमच्यावर शंका घेणारे एका बापाची औलाद नाही. बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला', राऊत-शाह भेटीच्या चर्चेवर संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 

  • 01:38 PM • 21 Oct 2024
    Maharashtra Assembly Election 2024 Live : शिवसेना ठाकरे गटातच मुंबईच्या जागांवरुन राडा, मातोश्रीवर वेगवान घडामोडी

    महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांआधी बरीच राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. निवडणुकीआधी जागावाटप हा महत्त्वाचा मुद्दा. पण याच जागावाटपावरुन मविआच्या काँग्रसे आणि ठाकरे (UBT) या पक्षांमध्ये राडा आहे. पण त्याचबरोबर ठाकरे गटामध्येही मुंबईच्या जागांवरुन राडा आहे. मातोश्रीवर वेगवान घडामोडी घडताहेत. 
     

  • 01:34 PM • 21 Oct 2024
    Maharashtra News : शिवसेना ठाकरे गटाच्या मुंबईतल्या जागांचा तिढा सुटणार?
    • मविआमध्ये जागांचा तिढा सुटेना 
    • ठाकरे गटात मुंबईच्या जागांवर राडा
    • मातोश्रीवर नेत्यांच्या बैठका
    • अजय चौधरी, प्रकाश फातर्पेकर मातोश्रीवर पोहोचले
    • संजना घाडी, मनोज जामसुदकर मातोश्रीवर दाखल
    • मुंबईतल्या जागांवर अधिकजण इच्छुक
    • चेंबूर, शिवडी, भायखळा, कुर्ला जागांवर तिढा
    • मागाठाणे, घाटकोपर पश्चिमच्या जागेवरदा तिढा
    • शिवडीसाठी अजय चौधरी, सुधीर साळवी इच्छुक
    • चेंबूरवर प्रकाश फातर्पेकर, अनिल पाटणकरांचा दावा
    • घाटकोपर (प) साठी सुरेश पाटील, संजय भालेराव इच्छुक
    • मागाठाणे- संजना घाडी, उदेश पाटेकर इच्छुक
       
  • 12:50 PM • 21 Oct 2024
    Maharashtra News: महानायक म्हणून मुख्यमंत्र्यांचे बॅनर मुक्ताईनगरमध्ये झळकले

    मुक्ताईनगरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मेळावा असून शहरात महानायक म्हणून मुख्यमंत्र्यांचे बॅनर झळकलेत.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी शुभेच्छा बॅनर लागले आहेत. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मतदारसंघात महायुतीच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे

     

  • 12:49 PM • 21 Oct 2024
    Maharashtra News: सुनिल राणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

    बोरिवलीचे आमदार सुनिल राणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल झाले. भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत सुनील राणेंचे नाव नव्हते. त्यामुळे आता उमेदवारीसंदर्भात चर्चेसाठी राणे सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत.

     

  • 12:49 PM • 21 Oct 2024
    Maharashtra News: एकनाथ शिंदे यांचा एकनाथ खडसेंचा मतदार संघात मेळावा

     

    एकनाथ खडसेंच्या मुक्ताईनगरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तोफ धडकणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  महायुतीचा मेळावा घेणार आहे. त्याची जय्यत तयारी सुरू आहे.

     

  • 12:48 PM • 21 Oct 2024
    Maharashtra News: बारामती लोकसभा मतदारसंघ अमित झेंडे यांची निवड

    राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हाध्यक्ष बारामती लोकसभा मतदारसंघ अमित झेंडे यांची निवड झाली आहे. अजित पवार यांच्या हस्ते अमित झेंडे यांना निवडीचे पत्र देण्यात आले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवड महत्वाची आहे.

     

  • 12:48 PM • 21 Oct 2024
    Maharashtra News: फुलंब्री मतदारसंघात रंगणार भाजप विरुद्ध शिंदे लढत, एक नेता करणार बंडखोरी

    फुलंब्री मतदारसंघात भाजपच्या विरोधात शिंदे सेना बंडखोरी करणार आहे. भाजपच्या अनुराधा चव्हाण यांच्या विरोधात शिंदेसेनेचे जिल्हा प्रमुख रमेश पवार हे निवडणूक लढणार आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महायुतीत बंडाची पडली पहिली ठिणगी पडली आहे. अनुराधा चव्हाण यांना उमेदवारी जाहीर होताच रमेश पवार यांच्याकडून निवडणुकीची घोषणा करण्यात आला आहे. त्यामुळे फुलंब्री विधानसभा मतदारसंघात भाजप आणि शिंदे सेना आमनेसामने येणार आहेत. जिल्हाध्यक्ष रमेश पवार यांच्याकडून निवडणूक लढवण्याची घोषणा करण्यात आली आहे.

     

  • 10:56 AM • 21 Oct 2024
    Maharashtra News: नाशिकमध्ये सिमा हिरे यांना भाजपकडून ऊमेदवारी जाहीर

    नाशिकचे कार्यकर्ते नेते संजय राऊत यांच्या भेटीला…. भाजपचे नाशिकचे नगरसेवक शशिकांत जाधव, राष्ट्रवादीचे नेते अपुर्व हिरे, शिवसेना माजी आमदार योगेश घोलप, देवळालीचे योगेश भोर तसेच भाजपचे कार्यकर्ते विक्रम नागरे संजय राऊत यांच्या भेटीसाठी दाखल… अर्ध्या तासापासून नाशिकच्या नेत्यांसोबत संजय राऊत यांची बैठक सुरू…

     

  • 10:55 AM • 21 Oct 2024
    Maharashtra News: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज डोंबिवली दौऱ्यावर

    मनसे आमदार आणि कल्याण ग्रामीण मनसे उमेदवार राजू पाटील यांच्या निवडणूक मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. यासाठी दुपारी तीन वाजता राज ठाकरे डोंबिवलीत उपस्थित राहणार आहेत. त्याचवेळी विधानसभा निवडणुकीसाठी मनसेची आज पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.  

     

follow whatsapp