Maharashtra Mahaparinirvan Diwas News LIVE in Marathi: राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि एकनाथ शिंदेंनी शपथ घेतली. त्यानंतर आज या तीनही नेत्यांनी शिवाजी पार्क मैदानात जाऊन भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन केलं. दुसरीकडे नव्या सरकारच्या शपथविधीनंतर विधानसभेचं विशेष अधिवेशन यासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे.
त्याचबरोबर नव्या मंत्रिमंडळात कोणाकोणाला स्थान द्यायचं यावरही विचारविनिमय सुरू झाला आहे. त्यासाठी लवकरच यादीही तयार केली जाईल. तसेच येत्या आठवड्याभरातच मंत्रिमंडळ विस्तार देखील केला जाणार आहे.
अशाच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी आणि सर्व महत्त्वाचे अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर...
लाइव्हब्लॉग बंद
ADVERTISEMENT
- 11:52 AM • 06 Dec 2024Maharashtra Breaking live updates: मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी आता सुरुवात करायची, नाटकबाजी बंद करायची: जरांगे
Manoj Jarange: 'वैचारिक मतभेद जरी असले तरी अभिनंदन करण्याची, शुभेच्छा देण्याची प्रथाच आहे. त्याप्रमाणे त्या तिघांचं खूप-खूप अभिनंदन. पण आता मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी सुरुवात करायची. नाटकबाजी बंद करायची.' असं विधान मनोज जरांगे यांनी केलं आहे.
- 09:29 AM • 06 Dec 2024Mahaparinirvan Diwas: या देशाला संविधान जगातील महाशक्ती बनवू शकतं: देवेंद्र फडणवीस
Maharashtra Breaking live updates: 'आज आपला देश वेगाने प्रगती करतो आहे. जगातील पाचवी अर्थसत्ता भारत झाला आहे. याच सर्व श्रेय संविधानाचे आहे. आज कुठलीही समस्या देशासमोर असली तरी त्याचा उपाय आपल्याला संविधानात पाहायला मिळतो.'
'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये जाण्याची संधी मिळाली तिथले डीन म्हणाले बाबासाहेबांचं लिखाण आम्ही प्रमाण मानतो. इंदू मिलवर स्मारक करत आहोत त्याला उशीर झालाय पण वेगाने आपल्याला ते पूर्ण करायचं आहे.'
'या देशाला संविधान जगातील महाशक्ती बनवू शकतं. कुठल्याही धर्मग्रंथ पेक्षा संविधान आपल्याला प्रिय पाहिजे. आम्ही जे काम करू ते संविधानानुरुप करू.' असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
- 09:29 AM • 06 Dec 2024Mahaparinirvan Diwas: संविधानाचा सर्वात जास्त सन्मान मोदी यांच्या काळात झाला: एकनाथ शिंदे
Maharashtra Breaking live updates: 'बाबासाहेबांचे विचार त्यांचं संविधान आपल्यासोबत आहे. आम्ही सत्तेचा वापर गोरगरिबांच्या कल्याणासाठी केला. सरकारने दुर्बल घटकांना सशक्त करण्याचा प्रयत्न केला. बहुमत मिळाल्याने आमची जबाबदारी वाढली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सोबत टीम म्हणून राज्याला एक क्रमांकाचं राज्य करण्यासाठी प्रयत्न करू.'
'संविधानाच्या आधारावर आपल्या देशाचा, राज्याचा कारभार चालतो. संविधानाचा सर्वात जास्त सन्मान मोदी यांच्या काळात झाला. आपण इंदू मिल येथे स्मारक साकारतो आहे.' असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
- 09:28 AM • 06 Dec 2024Mahaparinirvan Diwas: संविधानाला अनुसरून काम करेल: अजित पवार
Maharashtra Breaking live updates: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केल्यानंतर अजित पवार यांनी आपल्या भाषणात असं म्हटलं की, 'कालच महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. जनतेने प्रचंड बहुमत दिलं. सरकार संविधानाला अनुसरून काम करेल हे मी स्पष्ट पणे सांगू इच्छितो. आमचा प्रत्येक निर्णय बाबासाहेबांच्या विचारांना समोर ठेवून घेतला जाईल.'
- 09:23 AM • 06 Dec 2024Mahaparinirvan Diwas: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वाहिली भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली!
Maharashtra Live News Update Mahaparinirvan Diwas: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम पार पडला. ज्यासाठी राज्यापाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि इतर नेते हे हजर होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
