Maharashtra Breaking News : राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर शिवसेना युबीटीचं आंदोलन, 'सुपारीबाज'च्या दिल्या घोषणा

मुंबई तक

09 Aug 2024 (अपडेटेड: 09 Aug 2024, 05:59 PM)

Maharashtra Live News : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स तसंच हवामानाचा अंदाज 'मुंबई Tak'च्या या लाइव्ह ब्लॉगमध्ये जाणून घ्या सर्व फक्त एका क्लिकवर...

raj thackeray, beed

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे बीडमध्ये आगमन झाले आहे.

follow google news

Maharashtra breaking news in marathi : सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची धामधूम पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तयारीला सुरुवात केली आहे. तसेच राजकीय पक्षही जोमाने कामाला लागले आहेत.

मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या कोल्हापुरात आज क्रांतिदिनी होणाऱ्या मराठा आरक्षण जनजागृती व शांतता फेरीची जय्यत तयारी करण्यात आलीये. 

तसेच महाराष्ट्रात सध्या अनेक ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

या महत्त्वाच्या मुद्द्यांबरोबरच महाराष्ट्र आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडींचे ताजे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

लाइव्हब्लॉग बंद

  • 05:59 PM • 09 Aug 2024
    राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर शिवसेना युबीटीचं आंदोलन

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे बीडमध्ये आगमन झाले आहे. यावेळी शिवसेना ठाकरे गटाकडून सुपारीबाज चले जावच्या घोषणा देण्यात आल्या होत्या. त्यानंतर यावेळी मनसे सैनिक आणि शिवसैनिकांमध्ये घरपकड झाली...

  • 02:33 PM • 09 Aug 2024
    Amol Kolhe 'गुलाबी रंगाची पुंगी काढून जनता डोलते की काय?'; अमोल कोल्हेंची अजितदादांवर टीका

    अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेवरून अमोल कोल्हेंनी निशाणा साधलाय...नागपंचमी आपण का साजरी करतो? याची सर्वांना कल्पना आहे...पण सध्या गुलाबी रंगाची पुंगी काढून जनता डोलते की काय? हे पाहण्यासाठी एक यात्रा निघालीय...जनता स्वाभिमानी आहे. ती हे सगळं जाणून आहे...असा टोला कोल्हेंनी अजित पवारांना लगावलाय...
     

  • 10:17 AM • 09 Aug 2024
    Sanjay Raut : 'मविआचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार?', संजय राऊत म्हणाले...

    'महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार हे भविष्यात कळणार आहे. कोणताही पक्ष मुख्यमंत्रीपदाचा चेहरा सांगणार नाही', असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

     

  • 10:11 AM • 09 Aug 2024
    Manoj Jarange : मनोज जरांगे यांची आज पुण्यात रॅली

     

     

    पुण्यात रविवारी मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली आज सकाळी ११ वाजता सुरु होणार  आहे. पुण्यातील सारसबाग या ठिकाणाहून रॅलीला सुरुवात होणार आहे. डेक्कन भागातील छत्रपती संभाजी महाराज स्मारकास अभिवादन करून रॅलीची सांगता होईल.

     

     

  • 10:09 AM • 09 Aug 2024
    Pooja Khedkar : पूजा खेडकरचे वडिल दिलीप खेडकरांविरोधात गुन्हा दाखल!

    पूजा खेडकरांचे वडिल दिलीप खेडकरांविरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सरकारी कामकाजात अडथळा आणल्याच्या तक्रारीनंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुण्यातील बंदगार्डन पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय,. दिलीप खेडकर यांच्याविरुध्द सरकारी कामकाजात अडथळा आणल्याची तक्रार तहसीलदार दिलीप आकडे यांनी बुधवारी पोलिसांकडे केली होती. दिलीप खेडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पूजाला स्वतंत्र केबिन द्यावं, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांवर दबाव आणला होता असं तक्रारीत नमुद करण्यात आलंय. 

  • 09:24 AM • 09 Aug 2024
    Barvi Dam: ठाण्याला पाणीपुरवठा करणारे बारवी धरण भरले

    संपूर्ण ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारे बदलापूरचे एमआयडीसीच बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले आहे. बारवी धरणाच्या 11 स्वयंचलित दरवाजांमधून पहाटेपासूनच 40 क्यूसेक प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू झालाय..बारवी धरणातून ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, मीरा-भाईंदर, उल्हासनगर या महानगरपालिका, तसंच अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिका, त्याचप्रमाणे एमआयडीसी आणि स्टेम या प्राधिकारणांना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे बारवी धरण भरल्यानं ठाणे जिल्हावासीयांना मोठा दिलासाय.. ठाणे जिल्ह्याची पूर्ण वर्षभराची पाण्याची चिंता आता मिटली आहे.

  • 09:23 AM • 09 Aug 2024
    Sharad Pawar NCP : शरद पवार यांच्या शिवस्वराज्य यात्रेला आजपासून सुरुवात

    आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्षांची खलबत सुरु आहेत. शरद पवार आज पुण्यातून विधानसभेचे रणशिंग फुंकणार आहेत. पवार गटाच्या शिव स्वराज्य यात्रेची सुरुवात शिवनेरीवरुन केली जाणार आहे.

  • 08:23 AM • 09 Aug 2024
    Neeraj Chopra : भालाफेकीत नीरज चोप्राची रौप्य पदकाची कमाई

    भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने सिल्वर मेडल जिंकत भारताला पॅरिस ऑलिम्पिकमधील 5वे पदक मिळवून दिलंय. नीरज चोप्राने भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत 89.45 मीटर थ्रो करत सिल्वर मेडल मिळवले. यंदाच्या ऑलिम्पिकमधील भारताचं हे पहिले रौप्य पदक ठरले. नीरज चोप्राचे अंतिम फेरीत पाचपैकी 4 थ्रो फाऊल गेले. पण त्याने दुसऱ्याच थ्रोमध्ये 89 मीटरचा टप्पा गाठला. तर अर्शद नदीम वगळता इतर कोणताही खेळाडू या क्रमांकापर्यंत पोहोचू शकला नाही. पाकिस्तानचा अर्शद नदीम प्रथम तर भारताचा नीरज चोप्रा दुसऱ्या स्थानी आला आहे. तर तिसरा क्रमांक ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने 88.54 मीटरसह मिळवला. यात अर्शद नदीमला गोल्ड मेडल मिळालं.

follow whatsapp