Maharashtra Breaking News : मी लोकांसमोर मुद्दा आणला, अब्रुनुकसान कुठे केलं?- संजय राऊत

मुंबई तक

26 Sep 2024 (अपडेटेड: 26 Sep 2024, 01:07 PM)

Maharashtra Live News : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स तसंच हवामानाचा अंदाज 'मुंबई Tak'च्या या लाइव्ह ब्लॉगमध्ये जाणून घ्या सर्व फक्त एका क्लिकवर...

Mumbaitak
follow google news

Maharashtra breaking news in marathi : मुंबईसह महाराष्ट्राच्या काही भागांना काल मुसळधार पावसाने झोडपून काढलं. मुंबईत काल संध्याकाळपासून कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं होतं. मुंबईची लाईफलाइन म्हटली जाणारी रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती.

आज पहाटेपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. मध्य रेल्वेची सेवा अजूनही सुरळीत झालेली नाही. काही मिनिटं उशिराने ट्रेन धावत आहेत. काल रात्रीपर्यंत सखल भागात जमा झालेलं पाणी आता ओसरलं आहे.

अशाच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर...

लाइव्हब्लॉग बंद

  • 01:11 PM • 26 Sep 2024
    Maharashtra Breaking News : आम्ही आवाज उठवला तर आम्हाला जेलमध्ये टाकतात- संजय राऊत

    ज्या देशाच्या सरन्यायाधीशांच्या घरी पंतप्रधान गणपतीत मोदक खायला जातात, तिथे आमच्यासारख्या अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या लोकांना न्याय कसा मिळणार? आम्ही आवाज उठवला तर आम्हाला जेलमध्ये टाकतात. असं संजय राऊत म्हणाले.

  • 12:09 PM • 26 Sep 2024
    Maharashtra News : अब्रुनुकसानीच्या खटल्यात संजय राऊत दोषी

    भाजप नेते किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. या प्रकरणी  संजय राऊत यांना 15 दिवसांची कैद सुनावण्यात आला आहे.  25 हजारांचा दंडही आकारण्यात आला आहे. शिवडी कोर्टाने  निकाल दिला आहे.  2022 सालचे हे प्रकरण आहे.  मीरा भाईंदर शौचालय प्रकरणात मेधा सोमय्यांवर आरोप केला होता.  

    संजय राऊत यांनी मेधा सोमय्या या मुलुंडमधील एका शौचालय घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप केला होता. याविरोधात मेधा सोमय्या यांनी शिवडी कोर्टात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. याप्रकरणाची सुनावणी पूर्ण होऊन न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. या निकालाची आज सुनावणी झाली. तेव्हा न्यायालयाने संजय राऊत दोषी असल्याचा निकाल दिला.

  • 12:03 PM • 26 Sep 2024
    Maharashtra Breaking News : संजय राऊतांना मोठा झटका! तुरूंगात जावं लागणार?

    अब्रुनुकसानीच्या खटल्यात संजय राऊत दोषी आढळले आहेत. मेधा किरीट सोमय्यांनी त्यांच्याविरूद्ध याचिका दाखल केली होती. त्याचबरोबर मुंबईतील माझगाव कोर्टाने राऊतांना 15 दिवसांची कैद आणि 25 हजारांचा दंड ठोठावला आहे.  

  • 10:52 AM • 26 Sep 2024
    Maharashtra Breaking News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द

    पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी पुणे दौरा करणार होते. या दौऱ्यामध्ये ते पुणे मेट्रोच्या ( Pune Breaking News) सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या मेट्रो मार्गाचे उद्घाटन करणार होते. त्यासोबतच देशभरातील 22 हजार 600 कोटी रुपयांच्या विकास कामांचे लोकार्पण तसेच पायाभरणी त्यांच्या हस्ते होणार होती. यासाठी पुण्यातील एस पी कॉलेज मैदानावर मोठ्या सभेचे आयोजन देखील करण्यात आले होते.

    मात्र, हवामान विभागाने पुणे जिल्ह्याला रीड अलर्ट दिला आहे. खराब हवामानामुळे विमान लँडिंग मध्ये अडचणी निर्माण होण्याची शक्यता होती. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे.

  • 10:15 AM • 26 Sep 2024
    Maharashtra News : उपमुख्यमंत्री अजित पवार आज अमरावती दौऱ्यावर

    उपमुख्यमंत्री अजित पवार आज अमरावती दौऱ्यावर आहेत. काँग्रेसच्या आमदार सुलभा खोडके यांनी  अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर लावले आहेत. अजित पवारांच्या बॅनरमुळे शहरात एकच चर्चा होत आहे. काँग्रेसचे आमदार सुलभा खोडके ह्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा दर्शवली होती. आता या बॅनर मुळे काँग्रेसचे आमदार सुलभा खोडके या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश करणार असल्याचं निश्चित होत आहे. आमदार सुलभा खोडके यांच्या अमरावती विधानसभा मतदारसंघातील आज अनेक कामांच्या भूमिपूजनासाठी अजित पवार उपस्थित राहणार आहेत.

     

  • 10:14 AM • 26 Sep 2024
    Maharashtra News : मध्य रेल्वे आज पुन्हा विस्कळीत

    मध्य रेल्वे आज पुन्हा विस्कळीत. कालच्या मुसळधार पावसाचा परिणाम कायम. कल्याणहून CSMT कडे जाणाऱ्या गाड्या 10 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. धिमी लोकल 5 ते 10 मिनिटे उशिराने; लांब पल्ल्याच्या गाड्यांमुळे जलद लोकल्स 10 ते 15 मिनिटे उशिराने. पहाटे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल. कल्याणसह अंबरनाथ बदलापूर व इतर स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी.

follow whatsapp