Maharashtra Breaking News : मोठी बातमी!  MPSC परीक्षा आता पुढे ढकलण्याचा निर्णय

मुंबई तक

22 Aug 2024 (अपडेटेड: 22 Aug 2024, 01:17 PM)

Maharashtra Live News : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स तसंच हवामानाचा अंदाज 'मुंबई Tak'च्या या लाइव्ह ब्लॉगमध्ये जाणून घ्या सर्व फक्त एका क्लिकवर...

Mumbaitak
follow google news

Maharashtra breaking news in marathi : बदलापूर प्रकरणाची मुंबई हाय कोर्टाकडून दखल घेण्यात आली आहे. याप्रकरणी कोर्टाने सुमोटो याचिका करून घेतली दाखल आहे. आज सकाळी या प्रकरणाची तातडीची सुनावणी होणार आहे. बदलापूरमध्ये घडलेल्या प्रकरणाची हाय कोर्टाच्या देखरेखीखाली एसआयटीमार्फत चौकशीची मागणी केली जात आहे. न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजूषा देशपांडे यांच्या खंडपीठापुढे याप्रकरणी सुनावणी होणार आहे.

लाइव्हब्लॉग बंद

  • 01:14 PM • 22 Aug 2024
    Pune MPSC Protest : मोठी बातमी!  MPSC परीक्षा आता पुढे ढकलण्याचा निर्णय

    गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आंदोलन करत होते. त्यामध्ये त्यांच्या अनेक मागण्या होत्या. त्यातील एक प्रमुख मागणी म्हणजे 25 ऑगस्टची महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची होती. कारण यादिवशी एमपीएससीची परीक्षा आणि आयबीपीएसची परीक्षा दोन्ही एकाच दिवशी होत्या. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना एका परीक्षेला मुकावे लागणार होते. आता आयोगाने याबद्दलचे नोटिफिकेशन काढून ही परीक्षा पुढे ढकलल्याचे जाहीर केले आहे.
     

  • 12:58 PM • 22 Aug 2024
    Uddhav Thackeray : मुली सुरक्षित नसतील तर मुलगी शिकली प्रगती झाली या वाक्याला काय अर्थ?- उद्धव ठाकरे

    'कोरोनात महाराष्ट्र एका कुटुंबाप्रमाणे लढला. आपण कसं जगतोय, प्रत्येकाच्या मनात खंत आहे. संपूर्ण महाराष्ट्रानं व्यक्त होण्याची गरज आहे. मुली जर का सुरक्षित नसतील तर मुलगी शिकली प्रगती झाली या वाक्याला अर्थ काय राहणार. त्यासाठी राज्याने व्यक्त होण्याची गरज आहे. राजकारण म्हणून नाही तर माता भगिनी सुरक्षित राहिली पाहिजे. याचा भान सर्वांना हवं. त्यानंतर राजकारण येतं, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

     
     

  • 12:57 PM • 22 Aug 2024
    Pune MPSC Protest : रोहित पवार विद्यार्थी आंदोलनात

    पुण्यातील एमपीएससीच्या आंदोलनात गोंधळ झाला आहे. पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये बाचाबाची झाली आहे. यावेळी विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्याचं पाहिजेत, असं रोहित पवार म्हणाले.

     

  • 11:48 AM • 22 Aug 2024
    Badlapur Breaking News : बदलापूर प्रकरणातील सुमोटो याचिकेवर सुनावणी सुरू!

    बदलापूर प्रकरणी हायकोर्टात सुनावणी सुरू

    तुमच्याकडून कारवाई का झाली नाही? - न्यायमूर्ती चव्हाण

    मुंबई उच्च न्यायालयात सुमोटो सुनावणी सुरू

    प्रकरणाचा तपास जलदगतीने सुरू - महाधिवक्ता

    बदलापूर प्रकरणातील काही गोष्टी FIR मध्ये नमूद का नाहीत - न्यायमूर्ती 

    शाळेने या प्रकरणात कारवाई करायला हवी होती - सराफ

    सरकारी वकील बिरेंद्र सराफ यांचा सवाल

    'बदलापूर पोलिसांकडून कागदपत्र का दाखवले जात नाही?'

    न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल

    'पोक्सो अंतर्गत गुन्हा येतो मग FIR दाखल का झाला नाही?'

    'पोलिसांनी योग्य काम केलं नाही म्हणून पोलिसांचं निलंबन'

    'एका पीडितेचं स्टेटमेंट घेतलं दुसऱ्या पीडितेचं का घेतलं नाही'

    हायकोर्टाने केली सरकारची कानउघडणी

    घटना लपवल्याबद्दल शाळेवर कारवाई करणार 

    सुनावणीदरम्यान हायकोर्टात माहिती

  • 10:53 AM • 22 Aug 2024
    Badlapur: बदलापूर स्टेशनवर लोकल ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड

    बदलापूर स्टेशनवर लोकल ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड झालेला. बदलापूर येथे सकाळी 7.33 मिनिटाच्या लोकल ट्रेनमध्ये झाला होता तांत्रिक बिघाड. मात्र लगेचच रेल्वे प्रशासनाकडून त्या लोकल ट्रेनचे रॅक बदलत ट्रेन कल्याणच्या दिशेने सोडण्यात आली. या दरम्यान काही लोकल बदलापूर स्थानकावर 5 ते 10 मिनिटे थांबवण्यात आल्या होत्या. सध्या बदलापूरकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्सच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेन सेवा सुरळीत सुरू आहेत.

     

  • 08:46 AM • 22 Aug 2024
    Maharashtra News : केंद्र सरकारकडून शरद पवार यांना 'झेड प्लस' सुरक्षा

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना केंद्र सरकारने आता महाराष्ट्रासह इतर राज्यांतही ‘झेड प्लस’ सुरक्षा प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवार यांना केवळ महाराष्ट्रातच ‘झेड प्लस’ सुरक्षा देण्यात आली होती; परंतु विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांना आता महाराष्ट्रासह दिल्ली व इतर राज्यांतही झेड प्लस सुरक्षा देण्यात येणार आहे. या संदर्भात नुकतीच केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ)अधिकाऱ्यांनी शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली.

  • 08:45 AM • 22 Aug 2024
    Kolhapur News: उद्योगमंत्र्यांच्या उपस्थितीत आज ‘इग्नाईट’ कार्यशाळा

    उद्योग संचालनालय आणि जिल्हा उद्योग केंद्रातर्फे आयोजित ‘इग्नाईट महाराष्ट्र’ कार्यशाळेचे उद्‍घाटन आज, गुरुवारी सकाळी दहा वाजता उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. येथील रोटरी समाज सेवा केंद्राच्या सभागृहात दुपारी दोन वाजेपर्यंत कार्यशाळा होणार आहे. त्यामध्ये उद्योग, बँकिंग, निर्यात, आदी क्षेत्रांतील तज्‍ज्ञ मार्गदर्शन करणार असल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजयकुमार पाटील यांनी दिली.

  • 08:44 AM • 22 Aug 2024
    Maharashtra News : अल्पवयीन मुलीवर 21 वर्षाच्या मुलाने केला अत्याचार

    एका 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर 21 वर्षीय नराधमाने बलात्कार केला होता. आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून पीडितेला भेटला. आरोपीने तिला अंधेरीतील एका ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर गुजरातला नेऊन पुन्हा तिच्यावर बलात्कार केला. काही दिवसांनी मुलगी घरी परतली आणि घरच्यांना घडलेला प्रकार सांगितला. मुलीने त्या व्यक्तीचा फोटो इंस्टाग्रामवर दाखवला आणि कुटुंबीयांनी वाकोला पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. आरोपींविरुद्ध पोक्सो कायद्याच्या कलम 4, 8 आणि 12 अंतर्गत अपहरण आणि बलात्काराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे, असे मुंबई पोलिसांनी सांगितले.

follow whatsapp