Maharashtra Breaking News : महायुतीत रंगलं महाभारत! रवींद्र चव्हाण-रामदास कदम यांच्यात चांगलीच जुंपली

मुंबई तक

19 Aug 2024 (अपडेटेड: 19 Aug 2024, 03:20 PM)

Maharashtra Live News : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स तसंच हवामानाचा अंदाज 'मुंबई Tak'च्या या लाइव्ह ब्लॉगमध्ये जाणून घ्या सर्व फक्त एका क्लिकवर...

Mumbaitak
follow google news

Maharashtra breaking news in marathi : विदर्भात शिंदेच्या शिवसेनेला 12 जागा हव्या आहेत. नागपुरातील 2 जागांसाठी शिंदे सेना आग्रही आहे. जळगावात संतप्त ग्रामस्थांनी गाड्यांची तोडफोड करत तिसऱ्या रेल्वे लाईन चे काम बंद पाडले आहे. 

आज रक्षाबंधनाच्या निमित्तने सैनीक नारिशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने 4000 पेक्षा जास्त राख्या ह्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी पाठवण्यात आल्या आहेत.

आज रक्षाबंधनाचा सण असून संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आपल्या भावांना ओवाळून राखी बांधत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील रक्षाबंधनाचा सण साजरा केलाय. त्यांनी दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांना राखी बांधली आहे. यासंदर्भातला व्हिडीओ देखील सुप्रिया सुळे यांनी पोस्ट केलाय.

लाइव्हब्लॉग बंद

  • 02:24 PM • 19 Aug 2024
    Mahayuti News : महायुतीत रंगलं महाभारत! रवींद्र चव्हाण-रामदास कदम यांच्यात चांगलीच जुंपली

    विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना महायुतीत आता महाभारत रंगताना दिसत आहे. शिवसेने शिंदे गटाचे नेते रामदास कदम आणि भाजप नेते रवींद्र चव्हाण यांच्यात चांगलीच जुंपल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आधी शिवसेना नेते रामदास कदम एका कार्यक्रमात म्हणाले की, 'मी दिल्लीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र पाठवलं आहे. तुमचा सार्वजनिक मंत्री त्याला आवर घाला. तो युती तोडण्याचं काम करत आहे. नितीन गडकरींनी स्वत: लक्ष घालावे यासाठी शिष्टमंडळाला घेऊन भेट देणार आहे. आम्ही काय पाप केलं आहे, रवींद्र चव्हाण चमकोगिरी करतात. काम करत नाहीत. ते कुचकामी मंत्री त्यांचा राजीनामा घ्या.' 

    आता यावर भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, 'कधीतरी रस्त्यावर समोरासमोर या... कशा भाषेत मला बोलता येते कुणी वाचवायला राहणार नाही लक्षात ठेवा. रवी चव्हाण आहे मी... रामदास कदम अडाणी माणूस आहे. 15 वर्ष स्वत: मंत्री होते, 30 वर्ष शिवसेनेत होते काय केलं? युती धर्म पाळतोय याचा अर्थ कुणीही काहीही बोलेल आणि ऐकून घेऊ असं नाही. तोंड सांभाळून बोलचं, तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही.'

  • 02:01 PM • 19 Aug 2024
    Amruta Fadnavis : सरकार लाडकी बहीण योजना पुढेही सुरू ठेवणार- अमृता फडणवीस

    लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांना कोट्यवधी बहिणी लाभल्या आहेत. तर, मलाही तेवढ्याच नणंदा लाभल्या आहेत. आमचं नवीन नणंद भावजयचं नातं सुरू झालं आहे, असं वक्तव्य अमृता फडणवीस यांनी केलं. 

    देवेंद्र फडणवीस यांच्या पारदर्शकपणावर, प्रामाणिकपणावर त्यांनी याआधी सुरू केलेल्या जलयुक्त शिवार सारखेय चांगल्या योजनांवरही विरोधकांनी टीका केली होती. त्यामुळे ते आताही टीका करत आहेत. सरकारने चांगल्या हेतूने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. ही योजना पुढेही सुरू राहील आणि त्यात आवश्य वाढ करतील अशी अपेक्षा आहे. असंही यावेळी अमृता फडणवीस म्हणल्या 

  • 11:00 AM • 19 Aug 2024
    राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कार्यकर्त्यांवर संतापले!

    राष्ट्रवादी शरद पवार गटाची शिवस्वराज यात्रा जालना जिल्हा दौऱ्यावर असताना जालन्यातील भोकरदन येथे सभे दरम्यान काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला त्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कार्यकर्त्यांवर चांगलेच संतापले. तुमच्यात काही शिस्त दिसत नाही. तुमच्यासमोर भाषण करायची इच्छा नाही असं म्हणत तुम्ही यिथे दादागिरी करायला आलात का असा प्रश्न त्यांनी कार्यकर्त्यांसमोर उपस्थित केला. तर रावसाहेब दानवेंना मदत करायचा धंदा चाललाय तुमचा असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांवर नाराजी देखील व्यक्त केलीय. 

  • 10:55 AM • 19 Aug 2024
    Sanjay Raut : देशातील संविधान धोक्यात आहे – संजय राऊत

    'देशातील संविधान धोक्यात आहे. राज्यात डिसेंबरमध्ये निडणुका होणार असतील तर ती सरकारची सोय आहे. सत्ताधाऱ्यांना पराभवाची भीती आहे. हरियाणा, काश्मीरसोबत महाराष्ट्राची निवडणूक घ्यायला हवी होती,' असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

  • 09:41 AM • 19 Aug 2024
    ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पँथर दीपक केदार यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट!

    ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पँथर दीपक केदार यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतलीय. राजरत्न आंबेडकरांनंतर आता पँथर दीपक केदार यांनी जरांगे यांची भेट घेतलीय. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी दलित नेत्यांचा कल वाढत चालला आहे. राजरत्न आंबेडकर यांनी नुकतीच जरांगे यांची भेट घेतली, त्यानंतर आता ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पँथर दीपक केदार यांनी देखील जरांगे यांची आगामी विभानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भेट घेतलीय.

  • 09:35 AM • 19 Aug 2024
    Maharashtra News : अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस

     

    अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात काही भागात पुन्हा ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. शनिवारी रात्री झालेल्या मध्यरात्रीच्या मुसळधार पावसानंतर रात्री पुन्हा मुसळधार पाऊस बरसला. पावसामुळे अकोट तालुक्यातल्या रुईखेड गावात अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं. त्यामुळं येथील ग्रामस्थांच्या प्रचंड हाल झाले.

     

  • 09:28 AM • 19 Aug 2024
    Maharashtra News : माजी पोलीस आयुक्त संजय पांडे उतरणार विधानसभा निवडणूकीच्या मैदानात! 

    मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी नाशिकमध्ये मोठी घोषणा केली. राष्ट्रीय जनहित पक्षाच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी नाशिकमधून चार उमेदवारांची घोषणा केली. ते स्वत: मुंबईतून निवडणूक लढणार आहे.

follow whatsapp