Maharashtra breaking news in marathi : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. महाराष्ट्रातील सर्वच मोठे, छोटे पक्ष निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. त्यातच आता सर्व पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. तसेच महायुती आणि महाविकासआघाडीतील जागावाटपाच्या चर्चाही होताना दिसत आहेत.
अशाच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर...
लाइव्हब्लॉग बंद
ADVERTISEMENT
- 03:17 PM • 26 Aug 2024PM मोदींच्या हस्ते लोकार्पण झालेला छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला
नौदल दिनानिमित्त छञपती शिवाजी महाराजांच्या कार्याचं कौतुक करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मधील राजकोट किल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर शिवप्रेमीमधून नाराजी व्यक्त होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 डिसेंबर 2023 ला मालवणमध्ये नौदल दिनानिमित्त येऊन छञपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण केलं होते. या घटनेने आता शिवप्रेमींमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. तसेच उबाटाचे आमदार वैभव नाईक यांनी घटानास्थळाला भेट देऊन निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ही घटना घडल्याचा केला आरोप केला आहे.
- 11:44 AM • 26 Aug 2024Badlapur News : बदलापूर प्रकरणातील आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी!
बदलापूर येथील शाळेतील अत्याचाराच्या गंभीर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला आज कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायाधिशांनी त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
यापूर्वी 21 ऑगस्ट रोजी आरोपी शिंदेला कल्याण न्यायालयात हजर केले असता तत्कालीन न्यायाधीश व्ही.ए. पत्रावळे यांनी 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. आज पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर आरोपीला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले.
न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव कल्याण न्यायालयाच्या बाहेर आणि आत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आता आरोपीला 14 दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात येणार असून, या प्रकरणाचा पुढील तपास SIT कडून सुरू आहे.
- 10:25 AM • 26 Aug 2024Ajit pawar: अजित पवार घेणार पिंपरी चिंचवडमधील विकास कामांचा आढावा, बैठकीला सुरुवात
अजित पवारांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांच्या बैठकीला सुरुवात
बैठकीला जिल्हाधिकारी सुहास दिवसे, महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले, पिंपरी चिंचवड महपालिका आयुक्त शेखर सिंह, यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित
जिल्ह्यातील सर्व विकास कामांचा आणि प्रकल्पांचा अजित पवार घेणार आढावा
- 09:05 AM • 26 Aug 2024Maharashtra News : नांदेडचे कॉंग्रेस खासदार वसंत चव्हाण यांच दुःखद निधन
नांदेड जिल्ह्याचे कॉंग्रेस पक्षाचे खासदार वसंत चव्हाण याचे आज हैद्राबाद येथे निधन झाले.त्यांच्यावर हैद्राबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. गेल्या काही दिवसांपूर्वी खा चव्हाण यांना श्वास घेण्यास त्रास होतं होता. त्यामुळे त्यांना नांदेडच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु त्यांची प्रकृती खालावल्याने पुढील उपचारासाठी हैद्राबाद येथील किम्स रुग्णालयात भरती करण्यात आले होते.अखेर आज सकाळी साडेपाच वाजता त्यांचं दुःखद निधन झाले. खा .वसंत चव्हाण यांच्या निधनामुळे नांदेड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
- 09:02 AM • 26 Aug 2024Maharashtra News : 'खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनाची वार्ता अत्यंत धक्कादायक'- नाना पटोले
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार वसंतरावजी चव्हाण यांच्या निधनाची वार्ता अत्यंत धक्कादायक आहे. प्रतिकूल परिस्थितीत देखील त्यांनी काँग्रेस पक्षाशी सदैव एकनिष्ठ राहून काँग्रेस पक्षाचा विचार घरोघरी पोहोचवला. वसंतरावजी चव्हाण साहेबांना जड अंतःकरणाने श्रद्धांजली अर्पण करतो. चव्हाण कुटुंबीयांवर कोसळलेल्या या दुःखात संपूर्ण काँग्रेस पक्ष त्यांच्या सोबत आहे, असे ट्विट करत नाना पटोले यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT