Maharashtra breaking news in marathi: छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळ्याच्या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढवण येथील कार्यक्रमात माफी मागितली. परंतु, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदींची माफी राजकीय असल्याचं म्हणत विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. "(पंतप्रधान नरेंद्र मोदी) त्यांना काळे झेंडे दाखवले. त्यांचा निषेध केला. मोदी गो बॅक...मोदी गो बॅक...मोदी परत जा, अशा घोषणा दिल्या.
मोदींनी पाहिलं असेल की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सिंधुदुर्गच्या राजकोट किल्ल्यावरून ज्या पद्धतीनं कोसळला आणि संतापाचा लाव्हा महाराष्ट्रात उसळला. त्यामुळे आपण जर माफी मागितली नाही, तर भविष्यात महाराष्ट्राच्या संतापाला तोंड द्यावं लागेल. त्यामुळे त्यांनी काल राजकीय माफी मागितली. प्रधानमंत्र्यांची माफी राजकीय आहे, असं म्हणत संजय राऊतांनी मोदींवर हल्लाबोल केला.
लाइव्हब्लॉग बंद
ADVERTISEMENT
- 12:37 PM • 31 Aug 2024Sanjay Raut: 'मोदी गो बॅक...मोदी गो बॅक...मोदी परत जा...', संजय राऊतांचा PM मोदींवर घणाघात
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळ्याच्या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढवण येथील कार्यक्रमात माफी मागितली. परंतु, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदींची माफी राजकीय असल्याचं म्हणत विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. "(पंतप्रधान नरेंद्र मोदी) त्यांना काळे झेंडे दाखवले. त्यांचा निषेध केला. मोदी गो बॅक...मोदी गो बॅक...मोदी परत जा, अशा घोषणा दिल्या. मोदींनी पाहिलं असेल की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सिंधुदुर्गच्या राजकोट किल्ल्यावरून ज्या पद्धतीनं कोसळला आणि संतापाचा लाव्हा महाराष्ट्रात उसळला. त्यामुळे आपण जर माफी मागितली नाही, तर भविष्यात महाराष्ट्राच्या संतापाला तोंड द्यावं लागेल. त्यामुळे त्यांनी काल राजकीय माफी मागितली. प्रधानमंत्र्यांची माफी राजकीय आहे.
- 03:57 PM • 24 Aug 2024पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून मोठी दुर्घटना
पुणे जिल्ह्यातील पौड गावाजवळ खासगी कंपनीचे हेलिकॉप्टर कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. एएनआय वृत्तसंस्थेने एक्सवर याची माहिती दिली आहे. दुर्घटनास्थळी बचाव कार्य सुरू असून हेलिकॉप्टरमधील वैमानिकासह तीनही प्रवाशी सुखरुप असल्याची प्राथमिक माहिती हाती येत आहे.
ग्लोबल व्हेक्ट्रा या कंपनीचे AW 139 हेलिकॉप्टर हे मुंबईहून हैदराबादला जात होते. या दरम्यान पौड गावाजवळ हेलिकॉप्टर कोसळून मोठी दुर्घटना झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत चार जण जखमी झाले आहेत. यातील कॅप्टन आनंद यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हरिण भाटिया, अमरदीप सिंग आणि एसपी राम या तिघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
- 12:25 PM • 24 Aug 2024Maharashtra Bandh LIVE: काळी पट्टी बांधून उद्धव ठाकरेंचं दादरमध्ये आंदोलन, शिंदे सरकार तुफान टीका
Uddhav Thackeray Badlapur Case: आजचं आंदोलन संपता कामा नये.. आपण निषेध केलाय, राज्यातील जनतेला आवाहन करतोय. पुढचे काही दिवस शहर, गावात स्वाक्षऱ्यांची मोहीम घ्या. बहीण सुरक्षित तर घर सुरक्षित.. आम्हाला सुरक्षित बहीण हवी.
हे सगळे कंस मामा राख्या बांधत फिरतायेत, बहिणीवर अत्याचार होतायेत आणि हे निर्लज्ज राख्या बांधतायेत.. राख्या बांधून घेण्यामध्ये कुठेही अडचण येऊ नये म्हणून तुम्ही आमच्या आंदोलनामध्ये आडकाठी करतायेत.. अरे एवढं निर्लज्ज सरकार या महाराष्ट्राने कधी पाहिलं नव्हतं.
हा महाराष्ट्र साधूसंताचा आहे. संस्कारक्षम महाराष्ट्र आहे. पण एका बाजूला विकृत, नराधम.. आणि त्यांच्यावर पांघरुण घालणारं विकृत सरकार त्या नराधमाची बाजू मांडणारे विकृत याचिकाकर्ते यांच्याविरुद्ध हा लढा आहे.
- 10:45 AM • 24 Aug 2024Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंही शिवसेना भवनाच्या चौकात बसून करणार आंदोलन
Uddhav Thackeray on Maharashtra Bandh: शरद पवार यांच्या पाठोपाठ शिवसेना (UBT)चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील थोड्याच वेळात शिवसेना भवन येथील मुख्य चौकात निषेध आंदोलन करणार आहेत. त्यावेळी ते देखील काळी फित तोंडाला बांधून निदर्शन करणार आहेत.
- 10:44 AM • 24 Aug 2024Sharad Pawar: तोंडाला काळी पट्टी बांधून शरद पवार उतरले रस्त्यावर
Sharad Pawar on Maharashtra Bandh: महाराष्ट्र बंद मागे घेतल्यानंतर बदलापूरमधील घटनेचा निषेध करण्यासाठी स्वत: शरद पवार हे रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी तोंडाला आणि हाताला काळी फित बांधून आपला निषेध व्यक्त केला आहे.
- 10:44 AM • 24 Aug 2024Maharashtra Bandh News: 'महाराष्ट्र बंद' मागे पण मविआकडून निषेध आंदोलन
Maharashtra Bandh: महाविकास आघाडीने पुकारलेला बंद मागे घेण्यात आलं असलं तरी आज (24 ऑगस्ट) राज्यभरात निषेध, मूक आंदोलनाचं आयोजन विरोधकांकडून करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT