Maharashtra News Live : NEET-PG ची परीक्षा अचानक पुढे ढकलली!

मुंबई तक

22 Jun 2024 (अपडेटेड: 22 Jun 2024, 10:26 PM)

Maharashtra News Live Updates : वाचा महाराष्ट्र आणि देशातील सर्व महत्त्वाच्या बातम्या, राजकीय घडामोडींबद्दलची माहिती, हवामान अपडेट्स लाईव्ह...

Neet PG exam

NEET पेपर लीकच्या वादात आणखी एक परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे

follow google news

Maharashtra Live Updates : ओबीसी आंदोलकांच्या भेटीसाठी आज राज्य सरकारचं शिष्ठमंडळ वडीगोद्री आणि पुणे या ठिकाणी सकाळी 11.30 वाजता पोहोचणार आहे.

राज्य सरकारचे शिष्ठमंडळ आधी छत्रपती संभाजीनगरला जाणार, नंतर वडीगोद्रीला शेवटी पुणे आणि मुंबई असा त्यांचा दौरा आहे. या शिष्ठमंडळात छगन भुजबळ , गिरीश महाजन, अतूल सावे, ऊदय सामंत, धनंजय मुंडे , प्रकाश अण्णा शेंडगे आणि गोपीचंद पडळकर असतील.

तसेच आदित्य ठाकरे आज राज्यपाल दुपारी रमेश बैस यांची भेट घेणार. राज्यातील विद्यार्थ्यांचा प्रश्नासंदर्भात ही भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी मनसे तयारीला लागली आहे. पुणे जिल्ह्यातील 21 जागांवर विधानसभा निवडणुक लढण्यासाठी मनसेची तयारी सुरू आहे.

या सगळ्या संदर्भातील ताजे अपडेट्स आणि विश्लेषण वाचा लाईव्ह ब्लॉगमध्ये....

लाइव्हब्लॉग बंद

  • 10:26 PM • 22 Jun 2024
    NEET-PG ची परीक्षा अचानक पुढे ढकलली!

    NEET पेपर लीकच्या वादात आणखी एक परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. राष्ट्रीय परीक्षा मंडळाकडून घेण्यात येणारी NEET-PG प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा उद्या म्हणजेच 23 जून रोजी होणार होती. पण परीक्षेच्या तारखेच्या फक्त एक दिवस आधी, NEET-PG प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. राष्ट्रीय परीक्षा मंडळाकडून लवकरच प्रवेश परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली जाईल.

  • 08:46 PM • 22 Jun 2024
    मनोज जरांगेंची प्रकृती खालावली

    मराठा आरक्षणावर उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांची तब्येत अचानक खालावली आहे. डॉक्टरांकडून जरांगे यांची तपासणी सुरू असून त्यांना पुन्हा एकदा सलाईन लावली आहे. तसेच जरांगे यांच्या हृदयाची तापासणीही करण्यात येत आहे. शुक्रवारी बीड दौऱ्यापासून जरांगे यांना अस्वस्थ वाटत असल्याची माहिती आहे. 

  • 06:07 PM • 22 Jun 2024
    Maharashtra News : अजित पवार-प्रकाश आंबेडकर एकत्र यावे- अमोल मिटकरी

    अजित पवार-प्रकाश आंबेडकर एकत्र यावे, असं कार्यकर्ता म्हणून माझी इच्छा आहे, असं आमदार अमोल मिटकरी म्हणाले आहेत. तसेच महायुतीतील नेत्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना लहान समजू नये, असं म्हणत टीकाही केली आहे.

     

  • 03:57 PM • 22 Jun 2024
    Maharashtra News : शिष्टमंडळाच्या हातून पाणी पिऊन हाकेंनी उपोषण सोडलं!

    10 दिवसांपासून सुरू असलेलं हाकेंचं उपोषण स्थगित झालं आहे. शिष्टमंडळाच्या हातून पाणी पिऊन लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी उपोषण सोडलं आहे. 

  • 03:32 PM • 22 Jun 2024
    Maharashtra News: लढाई संपलेली नाही, आमचं आरक्षण आमच्याच ताटात राहूद्या- मंत्री छगन भुजबळ

    आरक्षण म्हणजे गरिबी हटाव कार्यक्रम नाही. आमचं आरक्षण आमच्याच ताटात राहूद्या. मराठा समाजाला दुसरं ताट द्या. गरिबांना अधिक देण्याचं काम केलं पाहिजे. आमच्यावर अन्याय, कधीपर्यंत सहन करणार? जे गरीब आहेत, मागास आहेत त्यांवा आरक्षणाची गरच  आहे. लढाई संपलेली नाही. आम्ही कुणालाही धमक्या देत नाही. कुणाच्या बापाला भीत नाही. जातीय जनगणनेला फडणवीसांनी पाठिंबा दिला आहे. राज्याच्ये शिष्टमंडळ हाके, वाघमारेंच्या भेटीला गेले असता छगन भुजबळ त्यांच्या भाषणात हे बोलले. 'विधानसभा आणि लोकसभेत आरक्षण पाहिजे लढण्यासाठी 2 वाघ परत मैदानात हवेत.' असंही ते म्हणाले. तसंच, 'तो बसलाय तिकडे तो जातीवाद करतोय. जरांगे काय बोलतो हे सुद्धा त्याला कळत नाही. ', अशा शब्दात त्यांनी जरांगेंना टोला लगावला.  

  • 02:59 PM • 22 Jun 2024
    ओबीसी आरक्षणाचे संरक्षण सरकार करणार- धनंयज मुंडे

    'आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपोषणाच्या मागण्या कालच्या बैठकीत मांडल्या. जे जे विषय कालच्या बैठकीत मांडले ते शासनाने गांभीर्याने घेतले आहे. सरकारची काय भूमिका आहे, ते मंत्री छगन भुजबळ सांगतील. 9 महिन्यांपासून महाराष्ट्रातल्या ओबीसी समजाच्या मनामध्ये शासनाने एका विशिष्ट आंदोलनाच्या घेतलेल्या निर्णयाचा परिपक्व आहे या वडी गोद्रित झाला. आपल्या भावनांच्या आदर सरकारने केला... शासनाची भूमिका मंत्री छगन भुजबळ मांडतील... ओबीसी आरक्षणाचे संरक्षण सरकार करणार.' असं धनंयज मुंडे यावेळी म्हणाले.

  • 02:43 PM • 22 Jun 2024
    Maharashtra News : कॉंग्रेसने दडपशाही करून कार्यालय उघडले- अनिल बोंडे

    राज्यसभा खासदार म्हणून मला देखील ते कार्यालय मिळावं यासाठी मी पत्र दिल आहे अशी मागणी भाजपा खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी केली आहे. दोघांमिळून कार्यालय दिल्यास मला हरकत नाही. दडपशाही करून काँगेसने कार्यालयाचे कुलूप उघडले आहे. जो पर्यत तोडगा निघत नाही तो पर्यत कार्यलय सील केले पाहिजे अशी मागणी खासदार अनिल बोंडे यांनी केली आहे.

     

  • 01:18 PM • 22 Jun 2024
    Maharashtra News: सरकारचे शिष्टमंडळ संभाजीनगरमध्ये दाखल

    सरकारचे शिष्टमंडळ संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहे. लक्ष्मण हाके यांना भेटण्यासाठी अवघ्या काही वेळातच पोहचणार.

     

  • 10:30 AM • 22 Jun 2024
    'भुजबळांना धनगर-मराठा भांडणं लावायची आहेत', जरांगेंचा पलटवार!

    'आमच्या एकही कुणबी नोंदी खोट्या नाहीत. नोंदी सापडूनही खोट्या ठरवल्या. मराठ्यांच्या मुलांवर केसेस टाकल्या. मंडल आयोगावरही कारवाई करा. कुणबी नोंदी रद्द करणं तुम्हाला पेलणार नाही. मी वेळ पडल्यास बलिदान देण्यास तयार आहे.', असं म्हणत जरांगेंनी सरकारवर निशाणा साधला. तसंच, 'त्या छगन भुजबळला धनगर बांधवातून मराठ्यात भांडण लावायचं आहे. ' अशा शब्दात त्यांनी भुजबळांवर पलटवार केला.  

  • 10:17 AM • 22 Jun 2024
    Maharashtra News: राजेश टोपेंनी घेतली OBC उपोषणकर्ते लक्ष्मण हाकेंची भेट

    ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचे आमरण उपोषण सुरू आहे. जालन्यातल्या  वडीगोद्री येथे सुरू असलेल्या ओबीसी आरक्षण बचाव आमरण उपोषणाचा आजचा दहावा दिवस आहे. आज उपोषणाच्या दहाव्या दिवशी घनसावंगी मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री राजेश टोपे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. हा प्रश्न सामंजस्याने सुटावा कुठे ही तेढ निर्माण होऊ नये अशी प्रतिक्रिया माजी मंत्री आमदार राजेश टोपे यांनी भेटीनंतर दिली आहे.
     

  • 10:07 AM • 22 Jun 2024
    Maharashtra News : नाना पटोले घेणार लोकसभा निवडणुकीचा आढावा

    काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुण्यात घेणार लोकसभा निवडणुकीचा आढावा घेणार आहेत. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांना देणार लोकसभेचा अहवाल सादर करतील. आज दुपारी काँग्रेस भवन मध्ये नाना पटोले सर्व स्थानिक नेत्यांची बैठक घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आढावा घेण्यात येत आहे.

  • 09:53 AM • 22 Jun 2024
    Maharashtra News : तानाजी सावंत यांना अश्रू अनावर

    मराठा समाजातील आत्महत्याग्रस्त कुटूंबाशी संवाद साधताना आरोग्यमंत्री तानाजी सावंतांना अश्रू अनावर झाले. बार्शी तालुक्यातील मराठा आहोरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या युवकाच्या कुटुंबीयांची आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी भेट घेतली. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी बार्शीतील देठे कुटुंबांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.


     

follow whatsapp