Maharashtra news live : शिंदे सरकार 10 लाख तरुण-तरुणींना दरमहा 10 हजार रुपये देणार

मुंबई तक

28 Jun 2024 (अपडेटेड: 28 Jun 2024, 02:47 PM)

Maharashtra Breaking News live : महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून, राज्य सरकारकडून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घोषणा केल्या जाणार आहेत. वाचा महाराष्ट्रातील सर्व लाईव्ह अपडेट्स...

Mumbaitak
follow google news

Maharashtra Live Updates : महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. दुसरीकडे राज्य सरकारकडूनही आज घोषणांचा पाऊस होणार असल्याची शक्यता आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचे हे शेवटचे अधिवेशन असून, यानिमित्ताने सरकारकडून मतांची पेरणी केली जाणार असल्याची बोलले जात आहे. 

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून विविध घटकांतील मतदारांना खूश करण्यासाठी मोठ्या घोषणा केल्या जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. यात महिला, शेतकरी, बेरोजगार तरुण-तरुणी आणि इतर घटकांचाही समावेश असणार आहे. 

महाराष्ट्रातील सर्व राजकीय घटनांसह इतर महत्त्वाच्या बातम्या वाचा लाईव्ह अपडेट्समध्ये...

 


 

लाइव्हब्लॉग बंद

  • 04:13 PM • 28 Jun 2024
    Maharashtra Budget 2024 : दुर्बल घटकांसाठी विविध योजना

    ‘सर्व स्वरुपातील सार्वत्रिक दारिद्रय नाहीसे करणे’ हे शाश्वत विकास ध्येय साध्य करण्याचा निश्चय 
    संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन  योजनेतून निराधार, विधवा, दिव्यांग तसेच वृध्द नागरिकांच्या  दरमहा अर्थसहाय्यात वाढ- एक हजारावरुन दीड हजार रुपये अशी वाढ -  सन 2023-24 मध्ये 45 लाख 60 हजार लाभार्थींना  7 हजार 145 कोटी रुपये अनुदानाचे वाटप 
    पान, पानपिंपरी आणि मुसळीचे उत्पादन करणाऱ्या बारी समाजाच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकासासाठी संत श्री रुपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना 
    नव्याने निर्माण करण्यात आलेल्या तसेच कार्यरत महामंडळांसाठी निधीची पुरेशी तरतूद 
    दिव्यांग व्यक्तींसाठी ‘धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजना’ - पहिल्या टप्प्यात 34 हजार 400 घरकुल बांधणार-  
    दिव्यांग व्यक्तींना इलेक्ट्रीक वाहनाचे वाटप करणार
    तृतीयपंथी धोरण-2024 जाहीर-भरती प्रक्रियेमध्ये तसेच सर्व शासकीय योजनांमध्ये स्त्री-पुरुषांसोबतच ‘तृतीयपंथी’ हा लिंग पर्याय उपलब्ध-तृतीयपंथीयांना राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घेणे सुलभ
    धनगर समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांसाठी  खारघर, नवी मुंबई येथे 4 हजार चौरस मीटरचा भूखंड 
    महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण महामंडळामार्फत नोंदणीकृत घरेलू कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना 
    मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून राबवण्यात येणाऱ्या योजनांकरीता कर्जावरील शासन हमीची मर्यादा ३० कोटी रुपयांवरून ५०० कोटी रुपये 
    महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना राज्यातील सर्व कुटुंबांना लागू
    आरोग्य विमा संरक्षणाची रक्कम प्रतिकुटुंब १ लाख ५० हजार रुपयांवरून ५ लाख रुपये - एक हजार 900 रुग्णालयांमार्फत एक हजार 356 प्रकारचे उपचार उपलब्ध 
    ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’  ३४७ ठिकाणी कार्यान्वित 
    पतसंस्थांच्या स्थिरीकरण व तरलतेसाठी 100 कोटी रुपये निधी 
    प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी, पारधी व आदिम आवास योजना, मोदी आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनांच्या माध्यमातून पुढील 5 वर्षात 35 लाख 40 हजार 491 घरकुल बांधण्यात येणार 
    सन 2024-25 मध्ये विविध घरकुल योजनांकरीता 7 हजार 425 कोटी रुपयांची तरतूद 
    बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गिरणी कामगारांना 12 हजार 954 सदनिका वितरित-उर्वरित सदनिका उपलब्ध करुन देण्याचे नियोजन 
    सन 2024-25 साठी  स्वच्छ भारत अभियान ग्रामीणच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 1 हजार 886 कोटी 84 लाख निधीची तरतूद

  • 04:12 PM • 28 Jun 2024
    Maharashtra Budget 2024 : तरुण मतांवर डोळा! कोणत्या केल्या घोषणा?

    मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना- दरवर्षी 10 लाख तरुण-तरुणींना प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण देण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना’ - प्रति प्रशिक्षणार्थी दरमहा 10 हजार रूपयांपर्यंत विद्यावेतन -दरवर्षी सुमारे 6 हजार कोटी रुपये खर्च 
    शासनाच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी दरवर्षी 50 हजार युवकांना कार्यप्रशिक्षण 
    जागतिक बॅंक सहाय्यित 2 हजार 307 कोटी रुपये किमतीचा ‘मानवी विकासासाठी उपयोजित ज्ञान आणि कौशल्य विकास’ - 500 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची दर्जावाढ, मॉडेल आय.टी.आय, जागतिक कौशल्य केंद्र, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, डेटा सेंटर अशा विविध संस्थांचे बळकटीकरण 
    मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, यवतमाळ, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, कराड जिल्हा सातारा, अवसरी खुर्द जिल्हा पुणे, येथील तंत्रशिक्षण संस्थांमध्ये ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ स्थापन करण्यास मान्यता 
    पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा व नमो महारोजगार मेळाव्यातून सन 2023-24 मध्ये 95 हजार 478 उमेदवारांची नोकरीसाठी निवड 
    ‘स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनी’ मुंबईत गोवंडी येथे कार्यान्वित - ग्रामीण भागात ५११ ‘प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रे’ स्थापन - 15 ते 45 वयोगटातील १८ हजार ९८० उमेदवारांना कौशल्य प्रशिक्षण 
    आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (टीआरटीआय), डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था (सारथी), महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्‍था (महाज्योती),  महाराष्ट्र संशोधन व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) इत्यादी संस्थांमार्फत एकूण 2 लाख 51 हजार 393 विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण- 52 हजार 405 विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी प्राप्त 
    संशोधन व नवउपक्रम केंद्रांसाठी विद्यापीठ व शासनाकडून प्रत्येकी ५० कोटी असा एकूण १०० कोटी रुपयांचा निधी
    शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत स्वयंरोजगार अर्थसहाय्याच्या योजनांसाठी 100 कोटी रुपये निधीची तरतूद 
    अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांसाठीदेखील सन 2024-25 पासून विदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना  लागू
    इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत दरवर्षी 38 ते 60 हजार रुपयांपर्यंत निवासभत्ता 
    गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार विकास महामंडळामार्फत ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी 82 शासकीय वसतीगृहे स्थापन करण्यास मंजूरी 
    राज्यात सध्या असलेले 1 लाख लोकसंख्येमागे 84 डॉक्टरचे प्रमाण  सन 2035 पर्यंत हे प्रमाण 100 हून अधिक करण्यासाठी १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेची नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये  आणि 430 खाटांची संलग्न रुग्णालये  स्थापन करण्यास मान्यता
    मौजे सावर, तालुका म्हसळा, जिल्हा रायगड येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय युनानी महाविद्यालय स्थापन करण्यास मान्यता , बुलढाणा जिल्ह्यात नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय 
    शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ निवासी डॉक्टर यांच्या विद्यावेतनात तसेच मानसेवी अध्यापकांच्या मानधनात भरीव वाढ 
    थ्रस्ट सेक्टरमधे अंदाजे 1 लाख कोटी रुपयांची गुतंवणुक- 50 हजार रोजगार निर्मिती
    हरित हायड्रोजन- २ लाख ११ हजार ४०० कोटी रुपयांची गुंतवणूक- ५५ हजार ९०० रोजगार निर्मिती
    महापे, नवी मुंबई येथे 25 एकर जागेवर ‘इंडिया जेम्स ॲन्ड ज्वेलरी पार्क’ नियोजित- 2 हजार सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग घटकांचा समावेश-50 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक - एक लाख रोजगार निर्मिती
    एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023 ते 2028- पाच वर्षात 25 हजार कोटी रुपयांची भरीव गुंतवणूक-5 लाख रोजगार निर्मिती 
    खासगी गुंतवणूक वाढविण्यासाठी लघु-वस्त्रोद्योग संकुले तसेच टेक्निकल टेक्सटाईल पार्क उभारण्यात येणार
    सिंधुदुर्ग जिल्हयात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कुबा डायव्हींग केंद्र- 20 कोटी रुपये खर्च अपेक्षित - 800 स्थानिकांना रोजगार

  • 04:11 PM • 28 Jun 2024
    Maharashtra Budget 2024 : महिलांसाठी उघडली तिजोरी, पहा घोषणांची यादी

    सन 2023-24 पासून ‘लेक लाडकी’ योजनेची  सुरुवात- मुलीच्या जन्मापासून ती अठरा वर्षाची होईपर्यंत तिला टप्याटप्याने एकूण एक लाख एक हजार रुपये 
    ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ २१ ते ६० वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये-दरवर्षी सुमारे 46 हजार कोटी रुपये निधी 
    दिनांक 1 मे, 2024 नंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्या नावाची नोंद शासकीय दस्तऐवजांमध्ये त्याचे नांव, आईचे नांव, वडिलांचे नांव व आडनांव या क्रमाने करण्याचे बंधनकारक 
    पिंक ई रिक्षा - १७ शहरांतल्या १० हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य - ८० कोटी रुपयांचा निधी 
    "शुभमंगल सामुहिक नोंदणीकृत विवाह" योजनेत लाभार्थी मुलींना देण्यात येणारे अनुदान १० हजार रुपयांवरून २५ हजार रुपये 
    राज्यातील सर्व आरोग्य उपकेंद्रात स्तन व गर्भाशयमुखाच्या कर्करोग तपासणीसाठी उपकरणे व साहित्यासाठी ७८ कोटी रुपये 
    रुग्णांची विशेषतः गरोदर माता व बालकांची आरोग्य संस्थेत मोफत ने- आण करण्यासाठी ३ हजार ३२४ रुग्णवाहिका 
    जल जीवन मिशन कार्यक्रमातून ग्रामीण भागातील 1 कोटी 25 लाख 66 हजार 986 घरांना नळजोडणी पूर्ण- राहिलेल्या 21 लाख 4 हजार 932 घरांसाठीचे काम प्रगतीपथावर 
    ‘मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना’- वर्षाला  घरटी तीन गॅस सिलेंडर मोफत देणार- ५२ लाख १६ हजार ४१२ लाभार्थी कुटुंबांना लाभ 
    लखपती दिदी- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत 7 लाख नवीन गटांची स्थापना-बचत गटांच्या फिरत्या निधीच्या रकमेत 15 हजार रुपयांवरुन 30 हजार रुपये वाढ 
    महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना ‘उमेद मार्ट’ आणि ‘ई-कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म’ याद्वारे आतापर्यंत 15 लाख महिला ‘लखपती दिदी’, या वर्षात 25 लाख महिलांना लखपती करण्याचे उद्दीष्ट
    महिला लघुउद्योजकांसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना’- अखिल भारतीय स्तरावरील महासंमेलनाचे  राज्यात आयोजन
    ‘आई योजनेअंतर्गत’ पर्यटन क्षेत्रातील महिला लघुउद्योजकांना 15 लाख रुपयापर्यंतच्या कर्जावरील व्याजाचा परतावा -10 हजार रोजगार निर्मिती
    मुलींना मोफत उच्च शिक्षण- शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय तसेच कृषि विषयक सर्व व्यावसायिक पदवी-पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेशित ८ लाख रूपयापर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग तसेच, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये १०० टक्के प्रतिपूर्ती 
    या निर्णयाचा अंदाजे २ लाख ५ हजार ४९९ मुलींना लाभ-सुमारे 2 हजार कोटी रुपयांचा भार

  • 04:10 PM • 28 Jun 2024
    Maharashtra Budget 2024 : प्रत्येक दिंडीला 20 रुपये, सरकारची घोषणा

    पंढरपूरच्या वारीचा  जागतिक वारसा नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव
    पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या मुख्य पालख्यातील दिंडींना प्रति दिंडी 20 हजार रूपये
    ‘निर्मल वारी’ साठी 36 कोटी 71 लाख रुपयांचा निधी 
    मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून देहू-आळंदी ते पंढरपूर या दोन्ही मुख्य पालखी  मार्गावरील  सर्व वारकऱ्यांची आरोग्य तपासणी,  मोफत औषधोपचार 

  • 02:46 PM • 28 Jun 2024
    Maharashtra Budget 2024 Updates : तरुणांना मोठा भत्ता, सरकारची घोषणा काय?

    -दरवर्षी 11 लाख विद्यार्थी पदवी, पदविका घेऊन उत्तीर्ण होतात. दरवर्षी 10 लाख तरुण-तरुणींना प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना जाहीर करत आहे. 
    योजनेतंर्गत विद्यार्थ्यांना दरमहा 10 हजार रुपये वेतन देण्यात येईल. त्यासाठी दरवर्षी 10 हजार कोटींचा खर्च अपेक्षित.
    -राज्यात एक लाख लोकसंख्ये मागे 84 डॉक्टर आहेत. 2035 पर्यंत एक लाख लोकसंख्येमागे शंभरपेक्षा अधिक डॉक्टर करण्याचे उद्दिष्ट आहे. 
    त्यासाठी राज्यात विविध ठिकाणी शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेची नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि 430 खाटांचे रुग्णालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. 
    -जालना, हिंगोली, धाराशिव, परभणी, नाशिक, जळगाव, अमरावती, बुलढाणा, वाशिम, वर्धा, भंडारा, गडचिरोली, सातारा, अलिबाग, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, अंबरनाथ या शहरांचा समावेश आहे. 

  • 02:31 PM • 28 Jun 2024
    Maharashtra Budget 2024 Updates : शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा

    -नमो शेतकरी महा सन्मान योजनेतंर्गत 92 लाख 43 हजार शेतकरी कुटुंबांना 5 हजार 318 कोटी 47 लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. 
    -स्थानिक पातळीवर शेतमाल साठवण्यासाठी गाव तिथे गोदाम योजना राबवण्यात येणार. या योजनेतंर्गत पहिल्या टप्प्यात 100 गोदाम बांधले जाणार.
    -आधारभूत किंमतीनुसार नाफेडकडून खरेदीसाठी शंभर कोटींचा फिरता निधी उपलब्ध करून दिला जाईल.
    -2023-24 कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टर पाच हजार रुपये देण्याची घोषणा. 
    -पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महामंडळाच्या भागभांडवलात वाढ करण्यात आली आहे.

    -शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध व्हावी यासाठी मागेल त्याला सौर ऊर्जा पंप योजनेतंर्गत दिले जाणार. 8 लाख 50 हजार शेतकऱ्यांना सौर पंप उपलब्ध करून दिले जाणारे, असे जाहीर करतो. 

  • 02:17 PM • 28 Jun 2024
    Maharashtra Budget 2024: मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा

    -मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेची घोषणा. योजनेतंर्गत प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत देणार.
    -52 लाख 16 हजार 452 कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार.
    -अभियांत्रिकी, वास्तशास्त्र, वैद्यक निर्माणशास्त्र, औषध निर्माण शास्त्र, कृषिविषयक सर्व पदवी, पदविका अभ्यासक्रमासाठी 8 लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागास वर्ग तसेच आर्थिक दुर्बल घटकातील मुलींचे शंभर टक्के शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क सरकार भरेल.
    -2 लाख 5 हजार मुलींना या योजनेचा लाभ होईल. शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून ही योजना सुरू करण्यात येईल.

  • 02:08 PM • 28 Jun 2024
    Maharashtra Budget 2024 : अजित पवारांनी अर्थसंकल्पातून केल्या मोठ्या घोषणा

    पंढरपूर वारी जागतिक वारसा म्हणून युनेस्कोकडे प्रस्ताव
    प्रति दिंडी 20 हजार रुपये सरकार देणार
    मुख्यमंत्री वैद्यकीय सहायत कक्षाच्या माध्यमातून देहू, आळंदी पालखी मार्गावर वारकऱ्यांवर मोफत उपचार केले जाणार
    मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला

    -महिलांना केंद्रस्थानी ठेवून विकासाची वाटचाल करणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे. 
    -मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित करीत आहे.
    -आरोग्य, स्वावलंबनासाठी 21 ते 60 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातील. दरवर्षी 46 हजार कोटींचा निधी देणार. अमलबजावणी जुलै 2024 पासून केली जाईल.

  • 11:31 AM • 28 Jun 2024
    Ajit Pawar News : "तुमच्या माघारी दादा बनणाऱ्यांचा बंदोबस्त करा", पत्र व्हायरल

     बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांच्या झालेल्या पराभवाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वीकारली. मात्र, सुनेत्रा पवारांचा पराभव हा राष्ट्रवादीत असलेल्या अंतर्गत गटबाजीमुळे आणि बारामती परिसरातल्या दुसऱ्या फळीतल्या कार्यकर्त्यांमुळे झाला असल्याची चर्चा होत आहे. 

    त्यातच आता राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याचे पत्र व्हायरल झाले आहे. पत्रात अजित पवारांच्या माघारी  'दादा' बनणाऱ्या कार्यकर्त्यांचा बंदोबस्त करा, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे बारामतीत अजित पवारांची माहिती दादा कोण? अशी चर्चा सध्या सुरू आहे.

    या स्वयंघोषित दादांच्या कर्तृत्वामुळेच सुनेत्रा वहिनींना पराभव स्वीकारावा लागल्याची चर्चा देखील बारामतीत पुन्हा जोर धरू लागली आहे.

    अजित पवारांना लिहिलेले पत्र बारामती व्हायरल झाले आहे.
  • 09:30 AM • 28 Jun 2024
    Shinde Government : महायुतीची महिला मतांवर नजर, मोठ्या घोषणा होणार, चर्चा काय?

    राज्याचा 2024-25 चा अर्थसंकल्प आज (28 जून) विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर होणार आहे. 

    आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पामध्ये मोठ्या घोषणा केल्या जाणार अशी सूत्रांची माहिती आहे. 

    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा केली जाणार असल्याचे समजते. या योजनेतंर्गत 21 ते 60 वर्ष वयोगटातील महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये दिले जातील. 

    मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आणली जाण्याची शक्यता असून, दरवर्षी तीन गॅस सिलिंडर महिलांना मोफत दिले जाणार आहेत. 

    त्याचबरोबर मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेतंर्गत 7.5 अश्वशक्ती पर्यंतच्या कृषी पंपांना मोफत वीज दिली जाण्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. 

    मुख्यमंत्री कौशल्य विकास योजनेतंर्गत 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना महिन्याला 7 हजार रुपये भत्ता देण्याची घोषणा होऊ शकते. 

    आयटीआय, डिप्लोमाधारकांना महिन्याला 8 हजार, तर पदवीधर तरुणांना महिन्याला 10 हजार रुपये सहा महिन्यांसाठी देण्याची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. 18 ते 29 या वयोगटातील तरुणांनाच याचा लाभ मिळू शकेल.

follow whatsapp