Maharashtra Breaking News Live : राऊतांनी शेअर केला मोदी-गांधींचा फोटो; म्हणाले, "ये तो..."

मुंबई तक

26 Jun 2024 (अपडेटेड: 26 Jun 2024, 01:27 PM)

Maharashtra News Live : महाराष्ट्र आणि देशातील महत्त्वाच्या घटनांचे लाईव्ह अपडेट्स...

संजय राऊत यांनी फोटो शेअर करत मोदींना डिवचले.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी.

follow google news

Maharashtra Breaking news live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचे शेवटचे अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी हे अधिवेशन होत असून, मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. 

पुण्यातील ड्रग्ज प्रकरणे, शेतकरी, बेरोजगारी आणि महागाई सारखे मुद्दे विरोधकांच्या भात्यात आहे. त्यामुळे उद्यापासून सुरू होणारे अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे आहेत. 

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय हालचाली सुरू आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे.

राजकीय घटनांचे ताजे अपडेट्स आणि महाराष्ट्रातील दिवसभरातील घटनांची माहिती वाचा लाईव्ह अपडेट्समध्ये...

लाइव्हब्लॉग बंद

  • 01:48 PM • 26 Jun 2024
    Maharashtra News Updates : उद्धव ठाकरेंनी बोलावली आमदारांची बैठक, विषय काय?

    शिवसेना UBT पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. रात्री ८ वाजता मुंबईतील ताज लॅण्ड हॉटेलमध्ये ही बैठक होणार आहे. 

    उद्यापासून (27 जून) राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे. 

    आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाचे हे अधिवेशन अत्यंत महत्त्वाचे आहे. लोकसभा निवडणुकीनंतर हे अधिवेशन होत असून, सरकारला कोंडीत पकडण्याची रणनीती विरोधकांकडून सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर ठाकरे पक्षाच्या आमदारांना मार्गदर्शन करणार असल्याचे समजते.

  • 01:23 PM • 26 Jun 2024
    Modi vs Gandhi News : राऊतांनी शेअर केला मोदी-गांधींचा फोटो; म्हणाले, "ये तो..."

    १८व्या लोकसभेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते बनले आहेत. त्यांचे अभिनंदन सध्या इंडिया आघाडीकडून केले जात आहे. 

    दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात कौन राहुल म्हणत राहुल गांधींची खिल्ली उडवली होती. त्याचीच आठवण करून देत शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी मोदींना डिवचले आहे. 

    संजय राऊतांनी लोकसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पदभार स्वीकारल्यानंतरचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना राऊतांनी म्हटले आहे की, "हा हा हा हा... कौन राहुल? ये है राहुल! ये तो ट्रेलर है. आगे आगे देखो होता है क्या?"

     

     

  • 12:50 PM • 26 Jun 2024
    MLC Election 2024 updates : मुंबईत किती टक्के झाले मतदान?

    विधान परिषदेच्या चार जागांसाठी मतदान होत आहे. सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. 

    ११ वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. 

    मुंबई पदवीधर मतदारसंघ -२७.०१ टक्के
    मुंबई शिक्षक मतदारसंघ - १८.३१ टक्के
    कोकण पदवीधर मतदारसंघ - २०.१५ टक्के

    मुंबई पदवीधर मतदारसंघ, मुंबई शिक्षण मतदारसंघ आणि कोकण मतदारसंघात झालेले मतदान.
  • 09:44 AM • 26 Jun 2024
    Maharashtra News : नाशिक शिक्षक मतदारसंघात दोन तासांत 8.91 टक्के मतदान

    विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघात मतदान प्रक्रिया सुरू असून, पहिल्या दोन तासांतील मतदानाची टक्केवारी समोर आली आहे. पहिल्या दोन तासात 8.91 टक्के मतदान झाले आहे.  

    एकूण मतदान - 69368
    7 ते 9 वाजे दरम्यान झालेले मतदान - 6182

     

  • 09:21 AM • 26 Jun 2024
    Vidhan Parishad Election : विधान परिषदेच्या चार जागांसाठी मतदान

    महाराष्ट्र विधान परिषदेच्या चार जागांसाठी मतदान होत आहे. मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघात निवडणूक होत आहे. आज मतदान होत असून, या निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीतील पक्षच काही ठिकाणी आमने-सामने आहेत. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे लक्ष आहे.

  • 08:50 AM • 26 Jun 2024
    Maharashtra News Updates : वर्षा गायकवाडांची काँग्रेसाध्यक्षांकडे तक्रार?

    लोकसभा निवडणुकीआधीपासून सुरू असलेली मुंबई काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. मुंबई काँग्रेसमधील वर्षा गायकवाड यांच्या विरोधातील गटातील नेत्यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस पक्षश्रेष्ठींची भेट घेतली. 

    काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांची या नेत्यांनी भेट घेतली. त्याचबरोबर काँग्रेसाध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनाही हे नेते भेटले. या नेत्यांनी वर्षा गायकवाड यांच्याबद्दलची खदखद पक्ष नेतृत्वाकडे मांडल्याचे सूत्रांनी सांगितले. 

    चेन्निथला आणि खरगे यांनी या नेत्यांना त्यांच्या तक्रारीची दखल घेण्यात येईल, असे आश्वासन दिल्याचे समजते. त्यामुळे वर्षा गायकवाड यांना पक्षातीलच विरोधी गटाचा नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार असे दिसत आहे. 

     

follow whatsapp