Maharashtra News Live Updates : डी. गुकेशनं गाठलं यशाचं उंचं शिखर! बुद्धिबळाच्या पटावरचा ठरला नवा 'राजा'

मुंबई तक

12 Dec 2024 (अपडेटेड: 12 Dec 2024, 06:44 PM)

Maharashtra Politics Live : मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी महायुतीच्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी शिंदे यांना दिल्लीत बोलावण्यात आले नसल्याचे आता सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे शरद पवार यांचा वाढदिवस असल्यानं त्यांना सर्वच क्षेत्रातून शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Gukesh Defeats Liren In Fide World Championship Match

Gukesh Defeats Liren In Fide World Championship Match

follow google news

Maharashtra Politics Live : मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी महायुतीच्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी शिंदे यांना दिल्लीत बोलावण्यात आले नसल्याचे आता सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे शरद पवार यांचा वाढदिवस असल्यानं त्यांना सर्वच क्षेत्रातून शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Ajit Pawar meets Sharad Pawar Delhi : पवारांची भेट, अर्ध्या तासानंतर बाहेर, अजितदादा, भुजबळ, पटेल काय म्हणाले?
 

विशेष अधिवेशन आणि राज्यातील सर्व ताज्या घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी वाचत राहा 'मुंबई Tak'


 

  • 06:47 PM • 12 Dec 2024
    Maharashtra News Live Updates: विश्वनाथ आनंदनंतर डि. गुकेश भारताचा दुसरा विश्वविजेता

    भारतीयांसाठी अभिमानास्पद बातमी समोर आलीय. भारताचा डी. गुकेश जागतिक बुद्धीबळ अजिंक्यपद स्पर्धेत विजेता ठरला आहे. गुकेशने चायनीज ग्रँडमास्टर डिंग लिरेनला चेक मेट (पराभव) करून नवा विक्रम रचला आहे. विश्वनाथ आनंदनंतर आता डि. गुकेश भारताचा दुसरा विश्वविजेता ठरला आहे. 

     

  • 05:21 PM • 12 Dec 2024
    Maharashtra Politics Live Updates : अमित शाहा घेणार शरद पवारांची भेट! वाढदिवसाच्या शुभेच्छा की आणखी काही...

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज 85 वा वाढदिवस आहे. पवारांच्या वाढदिवसानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांसह दिग्गज नेत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. "आदरणीय श्री. शरद पवार साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस उत्तम स्वास्थ्य व दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा", असं ट्वीट अजित पवार यांनी केलं होतं. अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा आज शरद पवारांची भेट घेणार आहेत. परंतु, शाहांची ही भेट वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी असणार आहे की राजकीय चर्चा रंगणार आहेत? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित झाला आहे.

  • 02:25 PM • 12 Dec 2024
    Maharashtra Politics Live Updates: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रघुनाथ मोरेंना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले...

    "माजी जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेत एक पोकळी निर्माण झाली आहे, यावर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मोरे साहेबांना आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना मिळाली. हे आमचं भाग्य आहे. मोरे साहेबांच्या जाण्याने शिवसेनेची मोठी हानी झालीय". शरद पवारांना वाढदिवसानिमित्त ट्वीटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्याचंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. 
     

  • 12:30 PM • 12 Dec 2024
    Maharashtra Politics Live Updates | Sharad Pawar Birthday : पवारांनी तलवारीने कापला केल

    शरद पवार यांचा आज वाढदिवस असून, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी वेगवेगळे नेते सध्या त्यांच्या दिल्लीतीन निवासस्थानी भेट देत आहेत. आज सकाळी अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीही भेट दिली. त्यानंतर काही वेळानच शरद पवार यांच्या वाढदिवसासाठी खास केक आणण्यात आला. यावेळी तिथे उस्थितांनी पवारांच्या हातात एक छोटी तलवार दिली. पवारांनी डोक्याला हात लावला, तलवार हातात घेतली आणि केक कापला. अनेकदा राजकीय नेत्यांकडून तलवारीने केक कापल्यानंतर त्यांच्यावर टीका होत असते. त्यामुळे आता शरद पवार यांच्या तलवारीने केक कापण्यावर काय प्रतिक्रिया येणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

  • 12:12 PM • 12 Dec 2024
    Maharashtra Politics Live Updates : पवारांनतंर आता अजितदादा अमित शाहांच्या भेटीला

    राज्यात सद्या मंत्रिमंडळ विस्तारावर सर्वांचं लक्ष लागून आहे. त्यातच एकनाथ शिंदे हे फडणवीस आणि अजितदादांसोबत दिल्लीला गेले जाणार नसल्याच्या चर्चेनं सस्पेन्स अजूनच वाढला आहे. तर दुसरीकडे अजित पवार हे काहीवेळापूर्वीच अमित शाह यांच्या भेटीसाठी पोहोचल्याची माहिती आहे. आज सकाळी अजित पवार यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत जाऊन शरद पवार यांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर आता अजित पवार आणि अमित शाहांमध्ये काय चर्चा होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

  • 10:51 AM • 12 Dec 2024
    Maharashtra Politics Live Updates : शरद पवार यांचा वाढदिवस, 85 व्या वर्षात पदार्पण

     ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांचा आज वाढदिवस. राजकारण, समाजकारण, उद्योग, साहित्य, कला, क्रीडा यांसारख्या सर्वच क्षेत्रात आपल्या कामामुळे आणि लोकांसोबतच्या मैत्रीपूर्ण संबंधांमध्ये शरद पवार हे नेहमीच राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम करणारे नेते म्हणून पाहिले गेले आहेत.  शरद पवार यांचा जन्म 12 डिसेंबर 1940 रोजी झाला असून, यंदा ते 85 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यामुळे आज त्यांना कोण कोण शुभेच्छा देणार आणि विशेषत: विरोधक त्यांना काय शुभेच्छा देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 

  • 10:48 AM • 12 Dec 2024
    Maharashtra Politics Live Updates : पवारांच्या भेटीनंतर भुजबळ, पटेल काय म्हणाले?

    शरद पवार यांच्या भेटीनंतर प्रफुल्ल पटेल म्हणाले, शरद पवार यांचं आरोग्य चांगलं राहो, त्यांचं नेतृत्व महाराष्ट्राला आणि देशाला मिळत राहो या सदिच्छा देण्यासाठी इथे आलो. छगन भुजबळ म्हणाले, आम्ही कायम त्यांना शुभेच्छा देत असतो. मी त्यांच्यासोबत तीस वर्षांहून अधिक दिवस काम केलं आहे, त्यामुळे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आहे, पण स्नेहसंबंध आहेतच ना असं छगन भुजबळ म्हणाले आहेत.
     

  • 10:46 AM • 12 Dec 2024
    Maharashtra Politics Live Updates : अजित पवार-शरद पवारांमध्ये काय चर्चा झाली?

    शरद पवार यांची साथ सोडून भाजपसोबत जाऊन सत्तेत बसलेल्या अजित पवार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. अजित पवार, पार्थ पवार, सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ या सर्व नेत्यांनी आज दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी भेटीसाठे गेले आहेत. शरद पवार यांचा जन्म 12 डिसेंबर 1940 रोजी झाला असून, यंदा ते 85 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. वाढदिवसाच्या दिवशी ही भेट घेतल्यानंतर अजित पवार काय म्हणाले यावर सर्वांचं लक्ष होतं. साधारणत: साडेनऊ वाजता शरद पवार यांच्या निवासस्थानी गेलेले अजित पवार आणि त्यांचे सहकाहीरी 10 वाजता बाहेर आलेत. 

follow whatsapp