”बेईमानी करणाऱ्यांना घरी बसवलं”,ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावर CM शिंदेंची ठाकरेंवर टीका

प्रशांत गोमाणे

06 Nov 2023 (अपडेटेड: 06 Nov 2023, 12:34 PM)

ग्रामपंयाचत निवडणूकीच्या निकालावर प्रतिक्रिया देताना मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, खऱ्या अर्थाने मतदारांनी शिवसेना, भाजपा युतीला आणि आता अजित दादा पवार आमच्या सोबत आलेत, त्यामुळे आमच्या महायुतीला कौल दिल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.

maharashtra gram panchayat election result 2023 cm eknath shinde reaction criticize uddhav thackeray

maharashtra gram panchayat election result 2023 cm eknath shinde reaction criticize uddhav thackeray

follow google news

Cm Eknath Shinde Reaction on Gram Panchayat Election Result 2023 : राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायत निवडणूकीत महायुतीने खुप मोठी आघाडी घेतली आहे. तर महायुतीतला भाजप हा पक्ष सर्वांधिक ग्रामपंचायत जिंकणारा पहिला पक्ष ठरलाय. तर अजित पवार (Ajit Pawar) गट दुसऱ्या स्थानी आहे. याच महायुतीतल्या शिंदे गटाने देखील मोठं यश मिळालं आहे. राज्यातील ग्रामपंचायत निवडणूकीच्या निकालावरच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देत ठाकरे गटावर टीका केली आहे. मतदारांशी बेईमानी करणाऱ्यांना घरी बसवलं. तसही त्यांना घरी बसण्याची सवय होतीच, असा टोला मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाकरेंना लगावला आहे. (maharashtra gram panchayat election result 2023 cm eknath shinde reaction criticize uddhav thackeray )

हे वाचलं का?

ग्रामपंयाचत निवडणूकीच्या निकालावर प्रतिक्रिया देताना मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, खऱ्या अर्थाने मतदारांनी शिवसेना, भाजपा युतीला आणि आता अजित दादा पवार आमच्या सोबत आलेत, त्यामुळे आमच्या महायुतीला कौल दिल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. तसेच ज्या लोकांनी मतदारांशी प्रतारणा केली. त्यांनाच आता मतदारांनी घरी बसवलं. घरी बसण्याची सवय नाहितरी त्यांना होतीच, असा टोला देखील मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना मारला.

हे ही वाचा : Gram Panchayat Election Results Live : महायुतीकडे 600 हून अधिक ग्रामपंचायती, महाविकास आघाडीकडे किती ग्रामपंचायती?

ग्रामपंचायत निवडणूकीत शिंदे गटाने ठाकरे गटापेक्षा ग्रामपंचायतीवर यश मिळवले आहे. यावर शिंदे म्हणाले की, मतदारांचे प्रेम आणि विश्वासामुळेच दुप्पट जागा भेटल्याने शिंदे यांनी सांगितले. आता आमची जबाबदारी आता वाढली आहे. आता आम्ही आणखीण काम करू, राज्याचा विकास करू, उद्योगधंदे, नोकऱ्या आणू,असे देखील शिंदे यांनी म्हटले.

टोमणे, आरोप-प्रत्यारोप इतक्यावर वर्ष घालवंल, एकही दिवस असा सोडला नाही. सुरुवातीपासूनच टीकाटीपण्णी, टोमणे हे लोकांनी नाकारलं आहे. या लोकांनी मतदारांशी बेईमानी, बाळासाहेबांशी गद्दारी केल्याचीही टीका एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर केली.

महाविकास आघाडीने थांबवलेले प्रकल्प आम्ही चालना देण्याचे काम केले. सर्वांना न्याय देण्याचा काम आमच्या सरकारने केले. शासन आपल्या दारी खरोखर लोकांपर्यंत पोहोचला आहे. आमचे प्रतिनिधी लोकांपर्यंत पोहोचले म्हणून हा निकाल आपण पाहतोय,असे शिंदे म्हणाले आहेत.

हे ही वाचा : Gram Panchayat election Result : हर्षवर्धन पाटलांना अजित पवार गटाकडून धक्का!

सर्व समाजाने पाठबळ दिला आशीर्वाद दिला म्हणून हे शक्य झालं. घरी बसून राज्य चालवता येत आहे हे लोकांनी दाखवून दिलं असे म्हणत शिंदेनी ठाकरेंनी डिवचलं. तसेच आगामी प्रत्येक निवडणुकांमध्ये महायुतीचा असच यश राहील. 45 पेक्षा जास्त जागा आम्ही जिंकू आणि मोदींचे हात अजून बळकट करू,असा विश्वास शिंदेंनी यावेळी व्यक्त केला.

    follow whatsapp