Maharashtra News Live Updates: राज्यात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस. नागपुरात सुरू असलेल्या या अधिवेशनात विरोधक परभणी आणि बीडच्या घटनांवरून फडणवीस सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आता या मुद्द्यांना फडणवीस सरकार कसं सामोरं जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे मोदी सरकारचं महत्त्वाकांक्षी वन नेशन-वन इलेक्शन हे विधेयक काल (17 डिसेंबर) लोकसभे मांडण्यात आलं. त्यामुळे लोकसभेत नेमकं काय घडणार याकडेही आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. या सगळ्या महत्त्वाच्या घटनांसह राज्य आणि देशातील प्रत्येक घडामोडी आपल्याला या LIVE BLOG मध्ये पाहायला मिळतील. (maharashtra live news updates parbhani beed crime state legislature winter session cm devendra fadnavis bjp lok sabha one nation one election constitution amendment bill)
लाइव्हब्लॉग बंद
ADVERTISEMENT
- 06:42 PM • 21 Dec 2024Maharashtra New Live:"जोपर्यंत न्याय मिळणार नाही, तोपर्यंत...", संतोष देशमुख हत्या प्रकरणावर 'या' आमदाराचं मोठं विधान
"कुटुंबाची जी काही जबाबदारी असेल, ती आम्ही आमदार, खासदार म्हणून स्वीकारू. वाल्मिक कराडच मास्टरमाईंड आहेत. हा जिल्हा एकदम पुरोगामी विचारांचा आहे. या माणसाने (वाल्मिक कराड) सगळी काशी करून टाकली आहे. या माणसाने दोन समाजात तेढ निर्माण केलं आहे. रडून चालणार नाही. आपल्याला घाबरायची गरज नाही. जोपर्यंत न्याय मिळणार नाही, लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही गप्प बसणार नाहीत. उद्या आम्ही सर्वच पक्षाची बैठक बोलवत आहोत. खंडणीच्या विषयात वाल्मिक कराडचं नाव टाकलं आहे", असं खळबळजनक विधान आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलं आहे.
- 06:08 PM • 21 Dec 2024Maharashtra New Live : संतोष देशमुख हत्या प्रकरणावर खासदार निलेश लंकेंचं मोठं विधान! नेमकं काय म्हणाले?
"एखाद्या व्यक्तीकडून क्रूर पद्धतीने घटना घडत असेल, तर कधी कधी त्या भागात वातावरण एकदम दुषित झालेलं असतं. या घटनेत ज्या आरोपींचा प्रत्यक्षरित्या संबंध आहे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्यांना तर फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. बीड आणि त्या परिसरात वातावरण दुषित झालं आहे, ते वातावरण शांत झालं पाहिजे. वाल्मिक कराडला सरकार अटक का करत नाही? या प्रश्नाचं उत्तर देताना निलेश लंके म्हणाले, घटना होऊन इतके दिवस लोटले तरीही सरकारने ठोस पाऊल उचललं नाही. याचा अर्थ सरकार कुठेतरी कमी पडत आहे. परभणी, बीडमध्ये दुर्देवी घटना घडल्या आहेत", अशी मोठी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी माध्यमांशी बोलताना दिलीय.
- 12:39 PM • 21 Dec 2024Maharashtra New Live : मृत संतोष देशमुख यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार : शरद पवार
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणानंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर राज्याच्या विधानसभा अधिवेशनातही हा मुद्दा चांगलाच गाजला होता. त्यानंतर आता शरद पवार यांनी आज मस्साजोगमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीमध्ये शरद पवार यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं आणि संतोष देशमुख यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे.
- 11:14 AM • 21 Dec 2024Maharashtra New Live : अजित पवार, धनंजय मुंडे एकाच वाहनातून फडणवीसांच्या निवासस्थानी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी मंत्री आणि आमदारांची रांग लागली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, धनंजय मुंडेही फडणवीसांना भेटायला पोहोचले. फडणवीसांच्या निवासस्थानी आज मंत्र्यांच्या खातेवाटपावर चर्चा होऊ शकते. तसंच अजित पवार आणि धनंजय मुंडे एकाच गाडीतून निघाल्यामुळे वेगवेगळ्या चर्चा होत होत्या.
- 10:48 AM • 21 Dec 2024Maharashtra New Live : बीडमध्ये अजित पवारांच्या माजी नगरसेविकेच्या मुलाचा प्रताप...
बीडमध्ये गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या घडामोडींमुळे कायदा व सुव्यवस्थेबद्दलचा प्रश्न निर्माण झाला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमधील कायदा सुव्यवस्थेचे लख्तरं वेशीवर टांगले आहेत. अशातच आता आणखी एक प्रकार समोर आला आहे. परळी नगरपरिषद कार्यालयात शासकीय कामकाज करत असताना एका माजी नगरसेवकासह अन्य तीन जणांनी येऊन कर्मचाऱ्याशी हुज्जत घातली आणि जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण केली अशा प्रकारची फिर्याद नगर परिषद कर्मचाऱ्याने दिली असुन याप्रकरणी तीन जण व अन्य अनोळखींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचं सीसीटीव्ही सध्या चांगलंच व्हायरल होतंय.
- 10:47 AM • 21 Dec 2024Maharashtra New Live : Sharad Pawar आज मस्साजोग आणि परभणीत भेट देणार
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय असणाऱ्या वाल्मिक कराड याच्यावरून सध्या विरोधक रान उठवत आहेत. अशातच आज (20 डिसेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात बोलताना थेट वाल्मिक कराडचं नाव घेत मास्टर माईंडवर कारवाई केली जाईल असं विधान केलं. त्यानंतर आज आता शरद पवार बीडमध्ये जाऊन मस्साजोगच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. तसंच शरद पवार परभणीमध्येही जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे ते तिथे काय बोलणार यावर सर्वांचं लक्ष असणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT