लाइव्ह

Maharashtra News Live: वन नेशन वन इलेक्शनचं विधेयक मांडताना सभागृहात अनुपस्थित राहणाऱ्या भाजप खासदारांना नोटीस

महाराष्ट्रातील परभणी हिंसा आणि बीडमधील हत्या ही प्रकरणं सध्या गाजत आहे. त्यातच नागपुरात राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू असून दुसरीकडे राजधानी दिल्लीतील हिवाळी अधिवेशनात आज (17 डिसेंबर) वन नेशन-वन इलेक्शन हे विधेयक लोकसभेत आणलं जाणार आहे. या आणि इतर महत्त्वाच्या अपडेट पाहा फक्त मुंबई Tak च्या या लाईव्ह अपडेटमध्ये.

Mumbai Tak

मुंबई तक

17 Dec 2024 (अपडेटेड: 18 Dec 2024, 09:50 AM)

follow google news

Maharashtra News Live Updates: राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू असून सध्या विरोधक परभणी आणि बीडच्या घटनांवरून फडणवीस सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आता या मुद्द्यांना फडणवीस सरकार कसं सामोरं जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे मोदी सरकारचं महत्त्वाकांक्षी वन नेशन-वन इलेक्शन हे विधेयक आज (17 डिसेंबर) लोकसभेत आणलं जाणार आहे. त्यामुळे लोकसभेत नेमकं काय घडणार याकडेही आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. या सगळ्या महत्त्वाच्या घटनांसह राज्य आणि देशातील प्रत्येक घडामोडी आपल्याला या LIVE BLOG मध्ये पाहायला मिळतील. (maharashtra live news updates parbhani beed crime state legislature winter session cm devendra fadnavis bjp lok sabha one nation one election constitution amendment bill)

 

लाइव्हब्लॉग बंद

  • 06:36 PM • 17 Dec 2024
    One Nation one Election : सभागृहात अनुपस्थित राहणाऱ्या भाजप खासदारांना नोटीस

    लोकसभेत आज वन नेशन वन इलेक्शनचं विधेयक मांडण्यात आलं. यावेळी सभागृहात अनुपस्थित राहिलेल्या खासदारांना भाजपने नोटीस पाठवली आहे. भाजपचे 20 पेक्षा जास्त खासदार आज सभागृहात 'वन नेशन वन इलेक्शन'चं विधेयक मांडताना गैरहजर होते. विशेष म्हणजे आज सभागृहात उपस्थित राहण्यासाठी व्हिप जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे आता या 20 खासदारांची धाकधूक वाढल्याची चर्चा आहे. 

  • 11:25 AM • 17 Dec 2024
    Maharashtra Live News: छगन भुजबळ नाराज, समर्थक 'भुजबळ फार्म' येथे जमायला सुरुवात

    Chhagan Bhujbal: मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने छगन भुजबळ हे नाराज झाले आहेत. हिवाळी अधिवेशन सोडून ते थेट नाशिक येथे आपल्या भुजबळ फार्म येथे गेले आहेत. ज्यानंतर आता तिथे समर्थक जमण्यास सुरुवात झाली आहे. भुजबळ नाशिक आणि येवला येथे कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत. भुजबळ यांचे खंदे समर्थक आणि राष्ट्रवादी प्रदेश चिटणीस दिलीप खैरे यांनी राजीनाम्याची तयारी केली आहे. दुसरीकडे नाशिकमध्ये छगन भुजबळांच्यां समर्थनार्थ जे बॅनर लावण्यात आले आहेत. त्यावरून अजित पवारांचा फोटो गायब झाला आहे.

  • 10:15 AM • 17 Dec 2024
    Maharashtra Live News: परभणी येथील घटनेचे पडसाद, सोलापूर आगारातील शिवशाही बस अज्ञात व्यक्तीकडून पेटवण्यात आली

    Solapur: परभणी येथील घटनेचे पडसाद सोलापूरात उमटले असून काल दोन बसवर दगडफेक तर रात्री शिवशाही बस पेटविण्यात आली आहे.

    मध्यरात्रीच्या सुमारास सोलापूर आगारातील शिवशाही बस अज्ञात इसमाकडून पेटवून देण्यात आली. बस जळून जवळपास 18 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. याबाबत सुरक्षा रक्षकाने दिलेल्या फिर्यादीनुसार फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परभणी येथील घटनेचे पडसाद सोलापुरात बघायला मिळाले.

    काल सोलापूर आगाराच्या दोन एसटी बसवर दगडफेक केल्याची घटना घडली होती. त्या अनुषंगाने सोलापूर आगार परिसरात पोलिसांचा तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. मात्र, रात्री दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीकडून शिवशाही बस पेटवून देण्यात आली आहे. 

    बसवर झालेली दगडफेक आणि रात्री शिवशाही बस पेटल्याची घटना ही परभणी येथील घटनेचे पडसाद असल्याची चर्चा सुरू आहे.

     

  • 09:12 AM • 17 Dec 2024
    One Nation-One Election Update: एक देश-एक निवडणूक... घटना दुरुस्ती विधेयक आज लोकसभेत मांडणार, जेपीसीच्या मार्गाने सरकार जाणार

    Modi Government One Nation-One Election: वन नेशन वन इलेक्शनशी संबंधित विधेयक आज (17 डिसेंबर) म्हणजेच मंगळवारी लोकसभेत मांडले जाणार आहे. केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल हे विधेयक सभागृहात मांडणार आहेत. या विधेयकाला 'संविधान (129 वी सुधारणा) विधेयक 2024' असे नाव देण्यात आले आहे. हे विधेयक मांडल्यानंतर सरकार ते संसदेच्या संयुक्त समितीकडे (जेपीसी) पाठवण्याची शिफारस करेल. या विधेयकाची प्रत खासदारांना देण्यात आली आहे. भाजपने आपल्या खासदारांसाठी व्हीप जारी केला आहे.

  • 09:09 AM • 17 Dec 2024
    Maharashtra Live News: नागपुरात फडणवीस यांच्या स्वागत रॅलीत चोरांचा सुळसुळाट, अनेकांच्या मौल्यवान वस्तूंची चोरी

    Nagpur: महायुतीच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्य सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी रविवारी नागपुरात पार पडला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासाठी रॅली काढली होती.

    या काळात अनेक लोकांसोबत अनुचित घटना समोर आल्या आहेत. एजन्सीच्या म्हणण्यानुसार, एका अधिकाऱ्याने सांगितले की, रविवारी शपथविधी समारंभाच्या आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागत रॅलीमध्ये 30 हून अधिक लोकांनी त्यांचे पाकीट आणि इतर सामान हरवल्याची तक्रार दाखल केली आहे.

  • 09:06 AM • 17 Dec 2024
    Maharashtra Live News: परळीतील अमोल दुबे अपहरण प्रकरणात पोलिसांची कारवाई; पाच आरोपींना अटक

    Beed: परळीतील अमोल दुबे अपहरण प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या घटनेतील पाच आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपींकडून मुद्देमाल, दोन चार चाकी, एक पिस्टल आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.

    मागील आठवडाभरापूर्वी परळी शहरातील अमोल दुबे या व्यापाराचे अपहरण करून दोन कोटींच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती. या दरम्यान व्यापाराकडून तीन लाख रुपये आणि दहा तोळे सोनं अपहरणकर्त्यांनी घेतलं होतं. दरम्यान, घटनेच्या दिवसापासून आरोपी हे फरार होते. अखेर विशेष पथकाच्या माध्यमातून पोलिसांनी आता अटकेची कारवाई केली आहे.

follow whatsapp