Maharashtra Live News : राज ठाकरेंनी भेट नाकारली, मराठा आंदोलक भडकले

मुंबई तक

05 Aug 2024 (अपडेटेड: 05 Aug 2024, 06:41 PM)

Maharashtra news live Today : महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज, मुंबई-पुण्यातील पावसाचे अपडेट आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भातील राजकीय घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स वाचा...

 raj thackeray, maratha reservation, maratha protestor

मराठा आंदोलक आक्रमक झाल्याची घटना घडली आहे.

follow google news

Maharashtra News Live Marathi : महाराष्ट्रातील काही भागात पावसाचे थैमान सुरू आहे. तर दुसरीकडे ऑक्टोबरमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वर्तुळात घडामोडी वाढल्या आहेत.

महायुती (भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस), महाविकास आघाडीतील (शिवसेना यूबीटी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, काँग्रेस) राजकीय पक्षांबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनीही पक्ष बांधणी आणि निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. 

सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी महाराष्ट्र पिंजून काढण्यास सुरूवात केली आहे. राज ठाकरे, उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर, शरद पवार, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, जयंत पाटील, सुनील तटकरे, संजय राऊत, नाना पटोले, बाळासाहेब थोरात हे प्रमुख नेते विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने फिरताना दिसत आहेत. 

महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स वाचा 

 

 

लाइव्हब्लॉग बंद

  • 06:42 PM • 05 Aug 2024
    राज ठाकरेंनी भेट नाकारली, मराठा आंदोलक भडकले

    महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही, असे विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले होते. या विधानाचा जाब विचारण्यासाठी मराठा कार्यकर्त्यांनी वेळ मागितली होती. मात्र भेट नाकारल्याने मराठा आंदोलक आक्रमक झाल्याची घटना घडली आहे.

  • 06:08 PM • 05 Aug 2024
    उच्च न्यायालयाच्या आदेशाला केजरीवाल सर्वोच्च न्यायालयात देणार आव्हान

    उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सर्वोच्च न्यायालयात जाणार आहेत. अरविंद केजरीवाल यांना ईडी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळाला आहे. अशा परिस्थितीत आता सीबीआयकडून अटक आणि जामीन घेण्याबाबत ते सर्वोच्च न्यायालयात जाणार आहेत.

     

  • 06:07 PM • 05 Aug 2024
    Maharashtra News : आरोग्य आणि जीवन विम्यावरील जीएसटीविरोधात उद्या विरोधकांचे आंदोलन

     

    आरोग्य आणि जीवन विम्यावरील 18 टक्के जीएसटी मागे घेण्याच्या मागणीसाठी इंडिया अलायन्समध्ये समाविष्ट असलेल्या विरोधी पक्षांचे नेते मंगळवारी सकाळी 10.30 वाजता आंदोलन करणार आहेत. विरोधी पक्ष सरकारकडे जीएसटी पूर्णपणे हटवण्याची मागणी करत आहेत.

     

  • 03:24 PM • 05 Aug 2024
    Maharashtra News live : एकनाथ शिंदेंचं कौतुक, ठाकरेंना टोला; आंबेडकर काय बोलले?

    वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंचं कौतुक केले. 

    "शिवसेनेची पारंपरिक मते एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आहेत. लोकसभा निवडणुकीत शिवसैनिक आणि शिवसेनेच्या मतदारांनी एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास दाखवला. शिवसैनिक एकनाथ शिंदे यांनाच खरे शिवसेनाप्रमुख मानत आहेत. शिवसेनेची मते शिंदे यांच्या गटाला मिळत आहेत", अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी शिंदेंचे कौतुक केले. 

    "उद्धव ठाकरे यांचा स्ट्राईक रेट वाढल्याचे आपण पाहत आहोत. मात्र, आरक्षणवादी लोक आणि मुस्लिमांमुळे उद्धव ठाकरेंचा स्ट्राईक रेट वाढला आहे", असे म्हणत आंबेडकरांनी ठाकरेंच्या यशाचे श्रेय मुस्लिम मतदारांना दिले आहे. 

  • 01:46 PM • 05 Aug 2024
    Maratha Reservation : "मनोज जरांगे पाटील यांची EWS बद्दलची मागणी योग्य"

    मनोज जरांगे यांच्या मागणीला भाजप आमदार प्रसाद लाड यांनी सकारात्मक भूमिका मांडली आहे. 

    "महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकू शकले नव्हते. या आरक्षणाला पर्याय म्हणून EWS ची मागणी महायुती सरकारने केली होती. ज्याचा हजारो विद्यार्थ्यांना लाभ झाला. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी केलेली EWS बद्दलची मागणी योग्य असल्याची आमची देखील भूमिका आहे", असे प्रसाद लाड म्हणाले.

     

  • 01:37 PM • 05 Aug 2024
    Maharashtra News Live : "तुम्हाला शेवटची संधी देतो, माझ्या...", जरांगेंचा राणेंना इशारा

    "मी नारायण राणे यांच्यावर टीका केली नाही. त्यांनी आरक्षण दिले होते. त्यामुळे आम्ही त्यांचा आदर करतो. पण, त्यांना शेवटचे सांगतो, माझ्या नादी लागू नका. वळवळीची भाषा मला शिकवू नका. तुम्हाला शेवटची संधी देतो, नीट शहाणे व्हा", असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दिला. 

    जरांगे पाटील असेही म्हणाले की, "राणे पिता-पुत्राला दोष द्यायचे काही कारण नाही. हे सर्व देवेंद्र फडणवीस करत आहे. फडणवीस मराठ्यांच्या काही लोकांना रोज तुकडे फेकतो. मी जातीचे काम करतो म्हणून माझ्यावर हे लोक सोडले आहेत. फडणवीसांना मराठ्यांमध्ये वाद घडवायचे आहेत", अशी टीका जरांगेंनी फडणवीस यांच्यावर केली.

     

  • 12:24 PM • 05 Aug 2024
    Maharashtra Breaking news live : राज ठाकरेंचे मोदींना खडेबोल

    सोलापूर दौऱ्यात माध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला. बजेटमधील तरतूदीचा मुद्दा मांडत ठाकरेंनी मोदींना खडेबोल सुनावले. "नेहमी सांगत आलोय की, महाराष्ट्रातील मुला-मुलींना नोकऱ्यांमध्ये प्रथम प्राधान्य द्या. उरल्या तर बाहेरच्यांना बोलवा. मी काही देश तोडायचा विचार करत नाहीये."

    "साधी गोष्ट आपण लक्षात घेऊ... आता नरेंद्र मोदी... स्पोर्ट्सच्या संदर्भात बजेट आले. या राज्याला इतके कोटी, या राज्याला इतके कोटी... सर्वाधिक पैसे हे गुजरात आणि उत्तर प्रदेशला आहेत."

    "माझा आक्षेप याच गोष्टींसाठी आहे. तुम्ही माझी अगोदरची भाषणं ऐकली, तर माझं हेच म्हणणं होतं की, या देशातील प्रत्येक राज्य, हे नरेंद्र मोदींनी पंतप्रधान म्हणून समान पद्धतीने पाहिलं पाहिजे. उद्या ते म्हणतात ऑलिम्पिक आणायचे... गुजरातमध्ये. देशातील सर्वात मोठे स्टेडियम बांधायचे, गुजरातमध्ये. असं करून कसं चालेल? उद्या समजा मराठी पंतप्रधान झाला. त्याने अशा प्रकारे महाराष्ट्रात गोष्टी आणल्या तर मी त्यालाही विरोधच करेन. कारण तुमच्यासाठी प्रत्येक राज्य समाज राज्य असले पाहिजे. ती गोष्ट आपल्याकडे होताना दिसत नाही", अशा शब्दात राज ठाकरेंनी मोदींना सुनावले.

follow whatsapp