Maharashtra News Live Updates : सध्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधक हे विविध मुद्द्यांवरुन आमने-सामने येत असल्याचं पाहायला मिळत आहे.
केंद्रीय पातळीवर सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनातही महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा केली जात आहे.
राज्याच्या विधान परिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलैला मतदान होणार आहे. ही निवडणूक बिनविरोध होणार की नाही, याचा निर्णय आज होणार आहे. विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शुक्रवारी (5 जुलै) शेवटचा दिवस आहे. विधानपरिषदेच्या रिंगणात उतरलेल्या 12 पैकी एका उमेदवाराने माघार घेतली, तरच ही निवडणूक बिनविरोध होईल.
राज्यात मुंबई, कोकण भागात मौसमी पाउस चालू आहे. काही ठिकाणी पावसाच्या सरी जोमात बरसतायत तर काही ठिकाणी अजूनही चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे.
अशाच राजकीय तसेच इतर विषयाच्या प्रत्येक घडामोडीची माहिती आपण या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
लाइव्हब्लॉग बंद
ADVERTISEMENT
- 01:48 PM • 08 Jul 2024Mumbai Rain Live Update : सांताक्रुझ येथील काही परिसरात घरात पाणी शिरल्याने नागरिक त्रस्त
मुंबईच्या सांताक्रुझ गोळीबार चौथा रस्ता, आनंद सोसायटी आणि परिसर, राजे शिवाजी बालवाडी, अजून पण ३ ते ४ फ़ूट पाणी साचले आहे. घरात पाणी शिरल्याने नागरिक बेहाल झाले असून मनपाकडे मदतीसाठी नागरिकांनी साकडं घातलं आहे. मात्र अद्याप कोणतीच मदत मिळाली नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
- 07:11 PM • 05 Jul 2024महाविकास आघाडीची बैठक संपली, विधानसभेच्या अनुषंगाने काय चर्चा झाली?
विधान परिषद निवडणुकांबाबत बैठकीत चर्चा झाली आहे, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे. आगामी काळात विधानसभा निवडणूक आहे त्याबाबत काही प्राथमिक गोष्टींवरती आजच्या बैठकीत चर्चा झाली. जाहीरनामा असतील किंवा इतर गोष्टी यावर बैठकीत चर्चा झाल्याचे देशमुख यांनी सांगितले.
मविआच्या सर्व नेत्यांना बोलवून एक सभा मुंबईत घेणार आहोत. त्यानंतर शंखनाद करणार आहोत. या सभेची अजून तारीख ठरली नाही,असे नाना पटोले यांनी सांगितले आहे. आमच्या जवळ मत आहेत. आमचे सर्व उमेदवार जिंकून येतील, असा दावा देखील नाना पटोले यांनी विधानपरिषद निवडणुकीबाबत केला. तसेच विधानसभेची जागा वाटप पण लवकर होईल, असे देखील नाना पटोले म्हणाले आहेत.
- 06:27 PM • 05 Jul 2024महाविकास आघाडीची बैठक सुरू, 'या' मुद्यावर होणार चर्चा
मुंबईतील वाय.बी.चव्हाण सेंटरवर महाविकास आघाडीची बैठक सुरु आहे. या बैठकीत आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा जाहीरनामा तयार करण्याबाबत चर्चा होणार आहे. याशिवाय 12 तारखेला होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीवरही बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
या बैठकीत उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, नसीम खान, बाळासाहेब थोरात, रोहित पवार, अनिल देशमुख, संजय राऊत बैठकीला पोहोचले आहेत.
- 05:13 PM • 05 Jul 2024वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूचा महाराष्ट्र सरकारतर्फे सत्कार
महाराष्ट्र सरकारतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते टीम इंडियाच्या चार खेळाडूंचा सत्कार करण्यात आला आहे. कर्णधार रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल या खेळाडूंचा सरकारतर्फे सत्कार करण्यात येत आहे.
- 03:31 PM • 05 Jul 2024Maharashtra News : विधानपरिषदेची निवडणूक अटळ, एकाही उमेदवाराची माघार नाही!
विधानपरिषद निवडणुकीचा संघर्ष अटळ आहे. 12 पैकी एकही उमेदवाराची माघार नाही. शेकापच्या जयंत पाटील आणि मिलिंद नार्वेकर यांच्यात मतांसाठी रस्सीखेच सुरू आहे. काँग्रेस आणि भाजपनं 25 मतांचा कोटा निश्चित केल्याची माहिती आहे
- 10:37 AM • 05 Jul 2024Maharashtra News : वसंत मोरेंचा वंचित पदाधिकाऱ्यांवर हल्लाबोल
वंचित पक्षातील अनेक लोकांनी गेली अनेक वर्ष काम केलं नाही बाळासाहेबांना अपेक्षित असा पक्ष ते उभा करू शकले नाहीत. शिवसेनेचे काम करणार पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही कार्यकर्ता म्हणून काम करणार असल्याचे ते म्हणाले. माझं ऑफिस फोडण्याऐवजी ही ताकद पक्षासाठी लावली असती तर ताकद अजून वाढली असती, असा टोला त्यांनी लगावला.
- 09:45 AM • 05 Jul 2024Nashik News : नाशिकमध्ये डेंग्यूच्या रुग्णांत झपाट्याने वाढ
नाशिक शहरात डेंग्यूच्या रुग्णांत झपाट्याने वाढ झाली आहे. केंद्रीय पथक नाशिकमध्ये असतानाच एका डेंग्यू बधितांचा मृत्यू झाल्याचा अहवाल मनपाला प्राप्त झाला आहे. जून महिन्यात तब्बल 161 जणांना डेंग्यूची लागण झाल्याची नोंद झाली आहे.
- 09:44 AM • 05 Jul 2024Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत अनेक स्वयंसेवी संस्थांची आज बैठक
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अनेक स्वयंसेवी संस्थांची आज बैठक पार पडणार आहे. या संस्थांची बैठक आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये होत असून त्या बैठकीला उद्धव ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत. आदिवासींचा विकास आणि कल्याणासाठी यशवंतराव चव्हाण फाऊंडेशनने आदिवासी विकास केंद्राची स्थापना केली आहे
त्या केंद्राच्या वतीने आदिवासी क्षेत्रातील शिक्षण, आरोग्य, पोषण, उपजीविका, रोजगार, जल, जंगल, जमीन, स्वशासन कायदा यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्वयंसेवी संस्थांची राज्यस्तरीय बैठक आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये होत आहे. दुपारी २ वाजता त्या बैठकीला उद्धव ठाकरे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
या बैठकीत राज्यातील संघटना संस्थांचे प्रतिनिधी आरोग्य, शिक्षण, उपजीविका, नैसर्गिक संसाधनांचा अधिकार या विषयावर आजची स्थिती आणि लोकांचे प्रश्न व त्यावर जनतेचा जाहीरनामा काय असेल याची मांडणी करणार आहेत
- 08:48 AM • 05 Jul 2024Maharashtra News : विधानभवनात आज विधानसभा आणि विधान परिषदेविषयी महत्त्वाची बैठक
आज विधानभवनात विधानसभा आणि विधान परिषदेविषयी महत्त्वाची बैठक होणार आहे. सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत ही बैठक असेल अशी माहिती देण्यात आली आहे. तर दुपारी दोन वाजता विधानभवनात मुख्यमंत्री यांच्या समिती कक्षात राज्य मंत्रीमंडळाची बैठक होणार आहे.
- 08:45 AM • 05 Jul 2024Monsoon Weather Update : कोकणात दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता
कोकणात अनेक ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पुढील दोन दिवस विदर्भ, मध्य महाराष्ट्र, खानदेश आणि कोकणामध्ये सर्वाधिक पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
- 08:34 AM • 05 Jul 2024Maharashtra News : वंचित कार्यकर्त्यांची वसंत मोरे यांना धमकी
पुण्यातील सोशल मीडिया स्टार नगरसेवक वसंत मोरे यांनी वंचितला सोडचिठ्ठी देत ठाकरे यांच्या शिवसेनेची वाट धरली. यामुळे वंचितचे कार्यकर्ते संतापले आहेत. हडपसरच्या सरोदे नावाच्या कार्यकर्त्याने वसंत मोरे यांचे ऑफिस फोडण्याचा इशारा दिला. त्यामुळे खबरदारी म्हणून पोलिसांनी मोरेबागेतील वसंत मोरे यांच्या ऑफिससमोर बंदोबस्त वाढवला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT