Maharashtra Breaking News Live : शरद पवारांनी अमोल कोल्हेंवर सोपवली मोठी जबाबदारी

मुंबई तक

03 Jul 2024 (अपडेटेड: 03 Jul 2024, 11:05 AM)

Maharashtra Assembly Monsoon Session Live : राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी रंगली आहे. त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडीही सुरू झाल्या आहेत... वाचा सगळ्या बातम्या लाईव्ह अपडेट्समध्ये...

अमोल कोल्हे यांची मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

खासदार अमोल कोल्हे आणि शरद पवार.

follow google news

Maharashtra News Live Updates : लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रात राजकीय घटना घडामोडींना वेग आला आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी गणित जुळवून आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीचीही तयारी सुरू झाली आहे. 

महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. राज्यातील विविध मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचे प्रयत्न विरोधकांकडून होताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालामुळे विरोधकांचा आत्मविश्वास वाढल्याचे दिसत आहे. 

महत्त्वाची बाब म्हणजे विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रात पडद्यामागे मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत. याच यासंदर्भातील सर्व महत्त्वाची माहिती वाचा लाईव्ह अपडेट्समध्ये...

 

 

लाइव्हब्लॉग बंद

  • 11:03 AM • 03 Jul 2024
    Maharashtra News Update : शरद पवारांनी अमोल कोल्हेंवर सोपवली मोठी जबाबदारी

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर शरद पवार यांनी नवी जबाबदारी सोपवली आहे. अमोल कोल्हे यांची पक्षाचे लोकसभेमधील चिफ व्हीप अर्थात मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

    याबद्दल अमोल कोल्हे यांनी एक पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

    अमोल कोल्हेंनी म्हटलं आहे की, "एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा कधीतरी लोकसभेत पक्षाचा उपनेता, मुख्य प्रतोद होऊ शकतो अशी कल्पनाही कोणी केली नसेल, परंतु आदरणीय पवार साहेब आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्वसमावेशक धोरणामुळे हे शक्य झाले." 

    "ही मोठी जबाबदारी आहे याची मला जाणीव आहे. ही जबाबदारी पेलण्याचं बळ माझ्या शिरुर लोकसभा मतदारसंघातील जनतेचे आशिर्वाद आणि शुभेच्छांमुळे मिळतेय ही माझ्यासाठी मोलाची बाब आहे." 

    "लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात माझ्या नावाची पाटी लागली. हा माझ्यासह शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेचा, महाराष्ट्रातील तमाम शेतकरी कामगार कष्टकरी जनतेचा सन्मान आहे. माझ्यावर हा विश्वास दर्शवल्याबद्दल आदरणीय शरदचंद्रजी पवार, सुप्रियाताई सुळे आणि माझे संसदेतील सर्व सहकारी यांचे मनापासून आभार", अशा भावना कोल्हेंनी व्यक्त केल्या आहेत. 

     

  • 08:51 AM • 03 Jul 2024
    Vidhan Parishad Election : काँग्रेसची मते नार्वेकरांना मिळणार

    काँग्रेसचे विधानसभेत ३७ आमदार आहेत. काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना उमेदवार दिली आहे. त्यामुळे त्यांना निवडणूक आणण्यासाठीची मते वगळून उर्वरित मते ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार नार्वेकर यांना मिळणार हे स्पष्ट झाले आहे. 

    काँग्रेसने मिलिंद नार्वेकर यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे. मिलिंद नार्वेकर यांनी ट्विट करून याबद्दलची माहिती दिली.

     

  • 08:32 AM • 03 Jul 2024
    Maharashtra News : नार्वेकर मैदानात, शिंदेंची शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी झाली सावध

    विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीने तिसरा उमदेवार उतरवण्याचे धाडस केले आहे. त्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली असून, ५ जुलै रोजी निवडणूक होणार की नाही, हे स्पष्ट होईल. 

    12 जुलै रोजी विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांची उमेदवारी मागे घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी दिसत आहे. 

    गुप्त मतदान असल्याने मतांची फाटाफूट मोठ्या प्रमाणात होऊ शकते. महाविकास आघाडीला तिन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी ६९ मतांची आवश्यकता आहे. मिलिंद नार्वेकर यांचे शिंदेंच्या शिवसेनेतील आमदारांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे फाटाफूट होऊ शकते. दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अजित पवारांचे काही आमदार परण्याच्या मार्गावर असल्याचाही दावा केला जात आहे. त्यामुळे अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेंची शिवसेना सावध झाली असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. 

     

follow whatsapp