Maharashtra News Live : पक्ष सोडून गेलेल्यांना अजिबात परत घेणार नाही- उद्धव ठाकरे

मुंबई तक

15 Jun 2024 (अपडेटेड: 15 Jun 2024, 03:43 PM)

Maharashtra news live : विधान परिषद आणि विधानसभा निवडणुकीमुळे महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे... वाचा सगळ्या घटनांचे लाईव्ह अपडेट्स...

Mumbaitak
follow google news

Maharashtra News Live Updates : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या २७ जूनपासून सुरू होणार असून १२ जुलैपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात २८ जूनला अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. तर, अनेक ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.  

सर्व घडामोडींची माहिती आणि इतर महत्त्वाच्या घटनांबद्दल जाणून घ्या लाईव्ह अपडेट्समध्ये....

 

लाइव्हब्लॉग बंद

  • 04:01 PM • 15 Jun 2024
    पक्ष सोडून गेलेल्यांना अजिबात परत घेणार नाही- उद्धव ठाकरे

    'पक्ष सोडून गेलेल्यांना अजिबात परत घेणार नाही', असं महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे स्पष्ट बोलले आहेत.

  • 03:27 PM • 15 Jun 2024
    Maharashtra News : केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी दहिसर विधानसभेत कार्यकर्त्यांची घेतली भेट

    उत्तर मुंबईतील ऐतिहासिक विजयानंतर मोदी मंत्रिमंडळात सलग तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्री बनलेले पीयूष गोयल यांनी दहिसर विधानसभेत कार्यकर्त्यांची भेट घेतली. उत्तर मुंबई आणखी स्वच्छ कशी केली जाईल याबाबत बीएमसी अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

     

  • 03:25 PM • 15 Jun 2024
    Maharashtra News : उदय सामंत आणि संजय शिरसाट घेणार जरांगेंची भेट

    मंत्री उदय सामंत आणि शिवसेना प्रवक्ते आमदार संजय शिरसाट थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये जाणार आहेत.

     

  • 03:01 PM • 15 Jun 2024
    मविआच्या पत्रकार परीषदेत ठाकरेंचा भाजपवर हल्ला

    भाजपचा अजिंक्यपणा किती फोल आहे, हे जनतेने दाखवले आहे. हा विजय अंतिम नाही. लढाई आता सुरु झाली आहे. मोदी सरकार आता एनडीए सरकार झालं आहे. हे सरकार किती दिवस चालेल हा मोठा प्रश्न आहे. 

  • 02:00 PM • 15 Jun 2024
    किशोर दराडे महायुतीचे उमेदवार- दादा भुसे

    किशोर दराडे हेच नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार आहेत. तर महायुतीचे सर्व नेते त्यांच्यासाठी काम करतील असे मत दादा भुसे यांनी व्यक्त केले. छगन भुजबळ बैठकीला अनुपस्थित असले तरी ते जेष्ठ नेते आहेत आणि आमच्या सोबत आहेत, असे पण ते म्हणाले.

     

  • 01:59 PM • 15 Jun 2024
    Maharashtra News : भाजपकडून अजित पवारांना डावलण्याचा प्रयत्न- जितेंद्र आव्हाड

    'भाजपकडून अजित पवारांना बाजूला करण्याचा प्रयत्न सुरू आहे', असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. 

  • 11:42 AM • 15 Jun 2024
    Maharashtra News : 'मुख्यमंत्र्यांनी दाढी वाढवणं चांगलं पण...', मनसे नेत्याची शिंदेंवर टीका!

    राज्य सरकारने वक्फ बोर्डाला 10 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली होती. आता या मुद्द्यावरून शिंदे-फडणवीस यांना टार्गेट केलं जात आहे. 'मुख्यमंत्र्यांनी दाढी वाढवणं चांगलं पण दाढीवाल्यांना मदत करणे योग्य नाही', अशी टीका मनसे नेते प्रकाश महाजन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे. 

  • 11:31 AM • 15 Jun 2024
    Maharashtra News : शरद पवारांच्या नादी लागून बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसणारे भुजबळ– प्रकाश महाजन

    "छगन भुजबळ राज ठाकरे यांच्या वरती का घसरले हे मला कळलं नाही.  भुजबळ यांना मानसिक त्रास झालेला आहे.  राज ठाकरे बाहेर पडले मात्र त्यांनी पक्ष फोडला नाही. भुजबळ राजकीय स्वार्थासाठी पक्ष बदलत राहिले.  भुजबळ स्वतःचा इतिहास विसरत आहेत.  शरद पवारांच्या नादी लागून बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसणारे भुजबळ आहेत," अशी टीका मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केली.

     

  • 09:35 AM • 15 Jun 2024
    'एखाद्या नेत्याला पक्षात घ्यायचं आणि त्याला संपवायचं...', वड्डेटीवार यांचा भाजपवर निशाणा!

    'जर तुम्हाला माहिती होते की त्यांच्यामुळे पराभव होईल मग त्यांना कशाला पक्षात घेतलं.. एखाद्या नेत्याला पक्षात घ्यायचं आणि त्याला संपवायचे ही भाजपची परंपरा असून अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश त्याचाच भाग आहे... इतर पक्षातील नेत्यांना पक्षात घेऊन त्यांच्या भरवश्यावर समोर जायचं आणि मग त्यांना संपवायचे ही भाजपची जुनी पद्धत आहे.' असं म्हणत  काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी भाजपवर निशाणा साधला. तसंच, 'खोटारडेपणा कोणी केला आहे.. दहा वर्षे फसगत कोणी केली आहे.. संविधान बदलविण्याची भाषा कोणत्या पक्षाची होती... शेतकरी उध्वस्त झाले त्याला कोण जबाबदार आहे... महागाई वाढली, उद्योगपतींचे कर्ज माफ केले हा अपप्रचार कसा होऊ शकतो... याचा त्यांनी उत्तर द्यावं.. त्याला उत्तर देण्यासाठी आम्हीही यात्रा काढू.. जिथे जिथे ते खोटं सांगतील तिथे आम्ही खरं सांगू.' असंही यावेळी वड्डेटीवार म्हणाले. 

  • 09:26 AM • 15 Jun 2024
    Maharashtra News : आजपासून किलबिलाट झाली सुरू, शाळा गजबजल्या

    सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक व प्राथमिक शाळा तब्बल दीड महिन्याच्या उन्हाळी सुट्टीनंतर आजपासून सुरू झाल्या....दीड महिन्यानंतर शांत असलेल्या शाळामधून आजपासून किलबिलाट पहायला मिळाल.शाळांची आजपासून घंटा वाजली असल्याने विद्यार्थी वर्गासह शिक्षक वर्गात आनंदाचे वातावरण पहायला मिळाले.नविन शाळा,नविन दप्तर यासह नविन शिक्षक आणी आईचा हात धरून नविन मुलांनी शाळा गाठली.नविन प्रवेशाबरोबर काही जुने सवंगडी पण शाळेत आज तब्बल दीड महिन्यानंतर भेटले...मे महिन्याच्या सुट्टीतील  गमतीजमती बरोबर विद्यार्थी नविन वर्गाच्या २०२४-२५ च्या शैक्षणिक वर्षाची सुरूवात झाली आहे....पहिली आणी पाचवीच्या विद्यार्थ्याचे वाजत गाजत स्वागत हे प्राथमिक शाळेतून झाले.तर पाचवी आणी आठवीच्या नवीन मुलांचे सिंधुदुर्गातील माध्यमिक शाळातून झाले.आज मोफत पुस्तके शाळांमधून वाटण्यात असल्याने विद्यार्थी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले होते.या पहिल्याच दिवशीच्या स्वागतासाठी शाळा प्रशासने जोरदार तयारी करत स्वागत केले. 
     

  • 09:24 AM • 15 Jun 2024
    kolhapur News : रस्त्यावरील वळणाचा अंदाज न आल्याने दाजीपूर बस स्टॅण्डजवळ बस पलटी

    मालवणहून पुण्याला जाणारी एस टी बस, वळणाचा अंदाज आला नसल्यानं, पलटी झाली. हा अपघात आज सकाळी दाजीपूर बस स्टॅण्डजवळ झाला. त्यामध्ये पाच प्रवासी जखमी झाले असून, सुदैवानं कसलीही जीवितहानी झाली नाही. पण एस टी बसचं मोठया प्रमाणात नुकसान झालं.

    मालवणहून पुण्याला निघालेली एसटी बस देवगड निपाणी रस्त्यावरून दाजीपूर बस स्टॅन्ड जवळ आली. चालकाला वळणाचा अंदाज आला नाही आणि ती बस पलटी झाली. या अपघातात वैभवी सचिन पाटील, प्रिया प्रकाश पाटील, लता भरत मांजरेकर या तीन महिला किरकोळ जखमी झाल्या. तर अन्य दोन प्रवाशांना मुका मार बसला. या अपघातात जखमी झालेल्यांना राधानगरी ग्रामीण रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचारासाठी पाठवण्यात आलं.

  • 09:03 AM • 15 Jun 2024
    Maharashtra News : लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल होण्याची शक्यता

    लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. अनेक राज्यांचे प्रदेशाध्यक्ष आणि प्रभारी बदलले जाणार आहेत. आगामी राज्यांच्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन काँग्रेस मोठे फेरबदल करणार. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि हरियाणा या चार राज्यात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश. या राज्यात प्रदेशाध्यक्ष बदलले जाणार नाहीत. 

  • 09:02 AM • 15 Jun 2024
    Maharashtra News : लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर नाशिक मध्ये शिवसेनेची बैठक

    लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर नाशिक मध्ये शिवसेनेची बैठक आहे. पालकमंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन केले आहे. नाशिक मध्ये झालेल्या पराभवची जबाबदारी स्वीकारल्यानंतर दादा भुसे शिवसेना पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार, लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे हेमंत गोडसे यांचा पराभव झाला होता. लोकसभा निवडणुकीचा पराभव आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने बैठक महत्त्वाची असेल.

     

follow whatsapp