Marathi News Live Update : 'स्वतंत्र आरक्षण टीकणार नाही. सरकारने दिलेलं आरक्षण रद्द झालं तर काय? मराठा तरूणांना पुन्हा लढा द्यावा लागेल. सरकारने ओबीसीतूनच मराठा समाजाला आरक्षण द्यावं. मोठ्या घरण्यांनी काही मागितलं तरी मिळतं आणि आमच्यासारख्या गरीबांना 5 महिने लढावं लागतं. 20 फेब्रुवारीपर्यंत मराठा आरक्षण मिळतं का त्याची वाट पाहणार आरक्षण मिळालं नाही तर, 21 फेब्रुवारीपासून पुढील आंदोलन करणार. अधिसूचनेवर सरकारने हरकती मागवायला नको होत्या. सरकारने सगेसोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करावी,' असं मनोज जरांगे म्हणाले.
लाइव्हब्लॉग बंद
ADVERTISEMENT
- 09:29 PM • 18 Feb 2024'पेपर फोडणारे तरुणांची स्वप्न चिरडतात', आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर घणाघात
ठाण्यातून, पुण्यातून महाराष्ट्रातील अनेक ठिकाणांहून नोकरभरतीसाठी युवावर्गातून परीक्षा दिल्या जातात. मात्र शिंदे सरकारमुळे पेपर फोडले जातात आणि तरुणांची स्वप्न चिरडली जात असल्याचा घणाघात आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केला.
- 09:11 PM • 18 Feb 2024'ठाणे जिंकणार म्हणजे जिंकणारच' आदित्य ठाकरेंनी पुन्हा दिलं आव्हान
ठाणे म्हणजे शिंदे नव्हे तर ठाकरे म्हणजे शिवसेना हे नाते आहे आणि ते पुन्हा दाखवण्याची संधी आपल्याला 2024 मिळणार असल्याचा विश्वास आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. ठाण्यामध्ये आदित्य ठाकरे यांनी सभा घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट आव्हान दिले आहे.
- 08:39 PM • 18 Feb 2024'मंत्रालयादेखील गुजरातमध्ये हलवतात काय अशी शंका', आदित्य ठाकरेंचा घणाघात
आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका मंत्रालयादेखील गुजरातमध्ये हलवतात काय अशी शंका व्यक्त केली. स्वतःच्या स्वार्थासाठी एकनाथ शिंदे हे दिल्लीसमोर लोटांगण घालतात असाही गंभीर आरोप त्यांनी त्यांच्यावर केला आहे.
- 07:43 PM • 18 Feb 2024'हिम्मत असले तर राजीनामा द्या,मी ठाण्यातून लढायला तयार', आदित्य ठाकरेंचा शिंदेंना इशारा
आदित्य ठाकरे यांनी ठाण्यातील आनंदनगरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात सभा घेत 'हिम्मत असेल तर राजीनामा द्या मी तुमच्या मतदार संघात येऊन लढायला तयार असल्याचे सांगत त्यांना आव्हान दिले आहे. आदित्य ठाकरे यांनी यावेळी स्वतःच्या फायद्यासाठी दिल्लीसमोर लोटांगण घालतात अशीही टीकाही त्यांनी यावेळी केली.
- 07:26 PM • 18 Feb 2024'खोटं बोला पण रडून बोला', आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल करत खोटं बोला पण रेटून बोला अशी परिस्थिती नाही तर खोटं बोला पण रडून बोला असा जोरदार टीका त्यांनी केली. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात सभा घेत त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
- 07:17 PM • 18 Feb 2024'ओबीसीतून सरसकट आरक्षण मिळाले तर रक्ताचे सडे पडतील', ल्हाद कीर्तने यांचे उपोषण
मनोज जरांगे पाटील यांच्या जन्मभूमी मातोरी गावापासून हाकेच्या अंतरावरच ओबीसी समाजाचे मागील पाच दिवसांपासून उपोषण सुरू आहे. मराठा समाजाला ओबीसीमधुन आरक्षण देण्यास ओबीसी समाजाचा विरोध असल्याची किर्तनवाडीमध्ये आंदोलक प्रल्हाद कीर्तने यांनी सांगितले.
- 06:07 PM • 18 Feb 2024कांदा निर्यात बंदी उठवून केंद्र सरकारचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा
कांदा निर्यात बंदी उठवून केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा आहे. केंद्राच्या निर्णयाचे स्वागत केलं असून सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभे आहे हेच आजच्या निर्णयातून स्पष्ट झाले झाले असल्याची प्रतिक्रिया महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीबाबत गांभीर्याने विचार करण्याची विनंती केली होती. निर्यात बंदी केल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली नाराजी तसेच शेतकऱ्याचे होत असलेले अर्थिक नूकसांन याकडे मंत्री विखे पाटील यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले होते.
- 04:59 PM • 18 Feb 2024नारी शक्तीसाठी येत्या काळात अनेक योजना - नरेंद्र मोदी
महिलांसाठी आपले सरकार अनेक योजना आणीत आहे. आता निमलष्करी दलात महीलांची भरती होणार आहे. देशातील 25 कोटी पेक्षा महिलांची बॅंक खाती काढली. तीन दशकानंतर महिलांना संसदेत आरक्षण दिले असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना सांगितले.
- 04:58 PM • 18 Feb 2024आम्ही राज्यनीतीसाठी नाही राष्ट्रनीतीसाठी जगतोय - नरेंद्र मोदी
आम्ही राज्यनीतीसाठी जगत नाही आम्ही राष्ट्रनीतीसाठी जगत आहोत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना सांगितले.
- 04:57 PM • 18 Feb 2024प्रत्येक घरात आपल्या पोहचायचं आहे - नरेंद्र मोदी
भाजपाला कार्यकर्त्यांना प्रत्येक घरात पोहचायचं आहे. सर्व मतदारांचा विश्वास जिंकायचा आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना सांगितले.
- 04:21 PM • 18 Feb 2024नॉर्थ ईस्टच्या विकासाकडे आमच्या सरकारनेच लक्ष दिले – नरेंद्र मोदी
'आधीचे सरकार नॉर्थ ईस्टच्या विकासाकडे लक्ष देत नव्हते. कारण तिथे लोकसभेच्या जास्त जागा नाहीत. परंतू आम्ही नॉर्थ-ईस्टलाही विकासाची संधी दिली, जी राज्ये देशाची शेवटची राज्ये मानली त्यांना देशाच्या पहिल्या क्रमांकावर आणले. नॉर्थ ईस्टचे अनेक मंत्री संसदेत आणले', असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना सांगितले.
- 03:36 PM • 18 Feb 2024'आम्ही शिवाजी महाराजांना माननारे लोक'; पंतप्रधान मोदींचं दिल्लीत भाषण!
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या भाजपच्या राष्ट्रीय शिबिराला संबोधन करत आहेत. यावेळी ते म्हणाले की, 'आज भारत देश प्रगतीपथावर आहे. आम्ही शिवाजी महाराजांना माननारे लोक आहोत, आणि आज विरोधक देखील NDA 400 पार जाईल अशी घोषणा देत आहेत;' असं मोदी दिल्लीतल्या भाषणात म्हणाले.
- 01:07 PM • 18 Feb 2024'राजकारणात नाती येत नाहीत'; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या!
'माझी लढाई वैयक्तिक नाही. मी विचारांची लढाई लढत आहे. त्यामुळे माझ्या विचारासाठी लढा देईन. नाती माझ्यासाठी कायम राहतील. पण, राजकारणात नाती येत नाहीत,' असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
- 12:27 PM • 18 Feb 2024मागच्या काळात काही गोष्टी वेदना देणाऱ्या झाल्या - अजित पवार
मागच्या काळात काही गोष्टी वेदना देणाऱ्या झाल्या... आधी अडीच वर्ष आम्ही मविआसोबत होतो... मविआच्या नंतर मी वेगळी भूमिका घेतली... महाराष्ट्राचे प्रश्न आम्हाला सोडवायचे आहे... लोकांच्या मनातील निर्णय घेणार... असं अजित पवार म्हणाले आहेत.
- 11:04 AM • 18 Feb 2024भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक
दिल्लीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक होणार आहे. राष्ट्रीय अधिवेशन संपल्यानंतर दुपारी बैठक होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब बैठकीत होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीला उपस्थित असणार आहेत. या महिन्याच्या शेवटी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यावर भाजपचा प्रयत्न आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT