Chhagan Bhujbal Exclusive Interview Mumbai tak on Maratha Reservation obc Reservation: मुंबई: मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे आणि कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे आमनेसामने आले असून एकमेकांवर सातत्याने टीका टिप्पणी करत आहेत. याच सगळ्या मुद्द्यावर छगन भुजबळ यांनी मुंबई Tak चे मुख्य संपादक साहिल जोशी यांना दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत अनेक खुलासे केले. याचवेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेबाबतही भाष्य केलं. (maratha reservation was it right that cm eknath Shinde went to antarwali sarati to end jarange hunger strike what did chhagan bhujbal answer in mumbai tak exclusive interview)
ADVERTISEMENT
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास छगन भुजबळ यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. असं असताना छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांवर थेट काहीही विधान केलेलं नसलं तरी काही गंभीर आक्षेप मात्र घेतले आहेत.
हे ही वाचा >> ‘नेपाळी बेडकांना सोडण्याचे कारण काय?’, ठाकरेंच्या सेनेचा पलटवार, बावनपत्ती’ म्हणत…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
प्रश्न- मुख्यमंत्री जरांगेंचं उपोषण सोडवायला गेले होते. मुख्यमंत्र्यांनी ते पाऊल उचललं होतं म्हणून ही सगळी चूक झाली का? म्हणजे तसं तुम्ही म्हणालात की, मंत्री तिकडे गेले त्यांच्यासमोर वाकले वैगरे..
छगन भुजबळ: मी कॅबिनेटमध्येच नाही तर सर्वपक्षीय बैठकीत देखील बोललो.. पोलीस हतबल का झाले? पण त्यावर बैठकीत चर्चाच झाली नाही. फडणवीसांनी उत्तर दिलं असतं.. पण पवार साहेब बोलले नाही, फडणवीस बोलले नाही..
काही मंत्री गेले नाही.. उपमुख्यमंत्री सुद्धा गेले नाहीत. मुख्यमंत्री माझे बॉस आहेत मी त्यांच्यावर कमेंट करू शकत नाही.
मुख्यमंत्र्यांनी मला सुरुवातीला विचारलं.. निजामशाहीत पुरावे आहेत. तिथे जर पुरावे सापडले कुणबींचे तर द्यायला काही हरकत नाही ना? मी म्हटलं हरकत नाही.. आधी काय म्हणाले 5000 हजार पुरावे सापडले. जरांगे म्हणाले मला चालणार.. दोन दिवसांनी साडे अकरा हजार नंतर मंत्रिमंडळ बैठकीत साडे तेरा हजार..
तेही नाही.. मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या.. नंतर त्याच्याही पुढे अख्ख्या महाराष्ट्रातील मराठ्यांना प्रमाणपत्र द्या. मग त्यासाठी शिंदे समिती.. प्रश्न असा आहे की, जे खरोखर कुणबी आहेत.. तुम्ही म्हणता की, ओबीसीला धक्का लागणार नाही.. एकदा कुणबी प्रमाणपत्र मिळालं की, पुढचा भाग हा जातपडताळणी..
आम्ही पण आहोत आमच्याकडे लक्ष ठेवा हे सांगायला लाखो लोक अंबडला आले. रडल्याशिवाय आईपण दूध देत नाही. मग आम्ही पण रडल्याशिवाय आमचं आरक्षण वाचतच नाही. आम्हाला वाटतं आमचं आरक्षण वाचलं पाहिजे.
असं म्हणत छगन भुजबळ यांनी एक प्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत एकप्रकारे नाराजीच व्यक्त केली.
हे ही वाचा >> Manoj Jarange : अजित पवारांना जरांगेंनी सुनावलं; म्हणाले, “तुमच्या माणसाने…”
एकीकडे मराठा समाजाला सरसकट कुणबी आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पाटील प्रयत्नशील आहेत. तर दुसरीकडे भुजबळ हे ओबीसी आरक्षण कायम राहावं यासाठी आता नव्या आघाडीवर लढण्यास सज्ज झाले आहेत. अशावेळी राज्यातील शिंदे सरकार हा संपूर्ण तिढा नेमका कसा सोडवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT