Mazi Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्री शिंदेंची प्रचंड मोठी घोषणा, व्हिडीओच केला शेअर!

रोहिणी ठोंबरे

01 Aug 2024 (अपडेटेड: 02 Aug 2024, 09:33 AM)

Mazi Ladki Bahin Yojana date extended cm eknath shinde appeal from video post to fill the application form

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

मुख्यमंत्री शिंदेंचे लाडक्या बहिणींना व्हिडीओतून आवाहन...

point

'लाडकी बहीण' योजनेसाठी फक्त 'या' महिलाच पात्र असणार!

point

कोणत्या महिला ठरणार अपात्र?

Mazi Ladki Bahin Yojana Date Extended : राज्यातील महिलांसाठी सरकारने गुड न्यूज दिली आहे. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत आता वाढवण्यात आली आहे. लाभार्थी महिलांना आता 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहेत. लाभार्थी महिलांचा या योजनेला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद  पाहता ही मुदत वाढवण्यात आल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: याबाबतची माहिती दिली आहे. (Mazi Ladki Bahin Yojana date extended cm eknath shinde appeal from video post to fill the application form 

हे वाचलं का?

महाराष्ट्र सरकारच्या वतीने या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी 31 जुलैपर्यंतची मुदत दिली होती. राज्यभरातील महिलांची गर्दी पाहता आता सरकारने लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. त्यांना 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. सोशल मीडियावर मुख्यमंत्री शिंदेंनी यासंदर्भातला एक व्हिडीओही शेअर केलेला आहे.

हेही वाचा : Maharashtra Weather: राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार? वाचा IMD चा नवा इशारा

मुख्यमंत्री शिंदेंचे लाडक्या बहिणींना व्हिडीओतून आवाहन...

सोशल मीडिया हँडल @CMOMaharashtra वरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, "राज्यातील समस्त माझ्या बहिणींना माझा नमस्कार! ताई तुमच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली. त्याला तुम्हा सर्वांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे, त्याबद्दल मनापासून धन्यवाद... ताई कुणालाही किती विरोधात बोलू देत, तू काळजी करू नकोस, राज्यातील महायुती सरकार तुझ्या पाठीशी भक्कमपणे उभं आहे. 

तुझ्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, आरोग्यासाठी, पोषणासाठी तुला दरमाहा दीड हजार रुपये म्हणजेच, वर्षाला 18 हजार रुपये देण्याचा निर्णय तुझ्या भावाने घेतला आहे. योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहून आणि नाव नोंदणीसाठी झालेली गर्दी पाहून आम्ही अर्ज भरण्याची मुदत वाढवून 31 ऑगस्ट केली आहे. त्यामुळे ज्या बहिणी 31 ऑगस्ट रोजी अर्ज करतील, त्यांनाही जुलै महिन्यापासून लाभ देण्यात येणार आहे." 

हेही वाचा : LPG Price: बजेटनंतर गॅस सिलिंडरच्या दरात मोठा बदल; जाणून घ्या किती रूपयांनी वाढली किंमत?

त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांच्या या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलेलं आहे की, 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद... अर्ज भरण्याची मुदत आता ३१ ऑगस्ट... अंतिम मुदतीत नोंदणी करणाऱ्यांना देखील मिळणार जुलैपासून लाभ.... योजनेचा लाभ घेण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आवाहन केलं आहे.'

'लाडकी बहीण' योजनेसाठी फक्त 'या' महिलाच पात्र असणार!

राज्यातील 18 ते 60 वर्ष वयोगटातील महिलांसाठी ही योजना आहे. या योजनेसाठी महिलांनी अर्ज केल्यास त्यांना महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता मिळेल. याशिवाय, ज्या महिलेने या योजनेचे सर्व पात्रता निकष पूर्ण केले पाहिजेत. त्यांनाच योजनेचा पहिला हप्ता मिळेल. अपात्र महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. 

हेही वाचा : शिंदे सरकारची आणखी एक योजना, आता मुलींना नेमकं काय मिळणार मोफत?

कोणत्या महिला ठरणार अपात्र?

ज्या महिलांचे किंवा त्यांच्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा जास्त आहे त्या या योजनेसाठी अपात्र ठरतील. घरात कोणी Tax भरत असेल, कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असेल किंवा कुटुंबात 5 एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर त्या महिलांनाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
    
  


 

    follow whatsapp