Congress: नागपुरमधून काँग्रेसने पक्षाच्या स्थापना दिनाची सभा घेत सत्ताधारी भाजपवर जोरदार निशाणा साधत नरेंद्र मोदी यांच्यासर आरएसएसवर खासदार राहुल गांधी (MP Rahul Gandhi) यांनी हल्लाबोल केला. राहुल गांधी यांनी बोलताना सांगितले की, सध्या देशात विचारधारेची लढाई सुरू आहे. ही विचारधार दोन पद्धतीची आहे. यावेळी त्यांनी संसदेत भेटलेल्या एका भाजपच्या खासदाराचा किस्सा सांगत भाजपमध्ये (BJP) राजेशाहीसारखी व्यवस्था असल्याचे सांगत त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. सभेत बोलताना त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले (State President MLA Nana Patole) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नामुळेच पटोले आऊट झाल्याचेही त्यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
भाजप संविधान विरोधी
राहुल गांधी यांनी भाजपवर आणि राष्ट्रीय स्वयंसवेक संघावर टीका करताना पारंपरिक भारत, राजेशाहीच्या काळातील भारत, संविधान विरोधी भारत पुन्हा आणण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. भाजप सरकार हे भाजपविरोधी असून ज्या महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरू यांनी इंग्रजांविरुद्ध लढून आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून त्यांनी देशाला संविधान दिले आहे. त्यांच्यामुळे देशातील सामान्य माणसाला अधिकार प्राप्त झाल्याचेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
हे ही वाचा >> Maharashtra Politics : ठाकरेंकडे उमेदवारच कुठेय? कांग्रेस नेत्याचा पवारांनाही सल्ला
जीएसटीचा फायदा काय?
खासदार राहुल गांधी यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा किस्सा सांगितला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीएसटीवरून प्रश्न उपस्थित केला. तुम्ही चालू केलेल्या जीएसटीचा शेतकऱ्यांना काय फायदा होणार हा प्रश्न नरेंद्र मोदींना विचारण्यात आला आणि नाना पटोले आऊट झाले असल्याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली.
शरीर भाजपचं, मन काँग्रेसचं
नाना पटोले यांच्याबरोबरच त्यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या खासदाराचाही त्यांनी किस्सा सांगितला. आता भाजपमध्ये असलेले एक खासदार जे पूर्वी काँग्रेसमध्ये होते. ते घाबरलेल्या अवस्थेतच भेटले होते, ते म्हणाले की मी आता भाजपमध्ये आहे मात्र फक्त शरीराने भाजपमध्ये आहे तर मनाने मी काँग्रेसमध्येच असल्याची भावना त्यांनी माझ्याजवळ व्यक्त केल्याची आठवणही त्यांनी यावेळी सांगितले.
ADVERTISEMENT