Shivsena-Congress: आगामी काळात लोकसभा (Loksabha) आणि विधानसभेच्या निवडणुका होत असल्याने त्यासाठी राज्यासह देशातील पक्ष तयारीला लागले आहेत. त्यातच लोकसभा निवडणुकांसाठी जागावाटपावर आता चर्चा होऊ लागल्याने महाविकास आघाडीसोबोतच महायुतीतूनही जोरदार हालचाली चालू झाल्या आहेत. त्यावरून आज खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ठाकरे गटाची शिवसेना 23 जागावरच निवडणुका लढविणार असल्याचे स्पष्ट केले. महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) ही तिन्ही पक्ष एकत्र असले तरी काँग्रेसने टीका केली होती. त्यामुळे त्यांनाही स्पष्ट शब्दात उत्तर देत शिवसेनेकडून ज्या जागा लढविल्या जातात त्या जागावर शिवसेना ठाम असल्याचेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
ADVERTISEMENT
शिवसेना फुटली
खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसवर टीका करताना म्हटले आहे की, शिवसेना फुटली की नाही हे काँग्रेसने आम्हाला सांगू नये. पक्षातून आमदार खासदार निघून जात असले तरी त्यांना निवडून देणारी ही जनताच असल्याचेही त्यांनी सांगितले. शिवसेनेकडून कायमच 23 जागा लढवल्या गेल्या आहेत, व त्यातील 18 जागांवर शिवसेनेचेच उमेदवार आहेत. मात्र आता जरी शिवसेनेतून काही खासदार निघून गेले असले तरी 23 जागांवर शिवसेना लढणार असल्याचे ठामपणे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा >> ‘मोदी देवाचा मुद्दा घेऊन तुमच्यासमोर…’, मल्लिकार्जुन खरगेंनी पंतप्रधानांचे काढले वाभाडे
शून्यातून सुरुवात
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी काँग्रेसवर टीका करत त्यांच्या तुमच्याकडे विजयी झालेल्या कोणत्या जागा आहेत. त्यातच आता राज्यात काँग्रेसला शून्यातून सुरुवात करायची असली तरीही आम्हाला आता काँग्रेसबरोबर चर्चा करावी लागेल असंही त्यांनी सांगिते.
निर्णय वरिष्ठ नेत्यांवर
ठाकरे गटाकडून 23 जागावर ठामपणे सांगण्यात आले आहे कारण आम्ही वरिष्ठ नेत्यांबरोबर चर्चा केली आहे. दिल्लीतील नेत्यांबरोबर चर्चा करून हे आम्ही ठामपणे सांगत असल्याचेही त्यांनी सांगितले. तरीही काही नेते आमच्यावर टीका करत आहेत मात्र त्याकडे आम्ही दुर्लक्ष करत असल्याचा टोला लगावला आहे.
अजून चर्चा नाही
शिवसेना आणि काँग्रेसमध्ये पश्चिम मुंबईच्या जागेबाबत अजून चर्चा झाली नाही. मात्र काही नेते त्यावर दावा करत असले तरी आम्ही त्याकडे लक्ष दुर्लक्ष केले आहे कारण ज्या वरिष्ठ नेत्यांबरोबर जागांवाटपाबाबत चर्चा करायची आहे, त्यांच्याबरोबर अजून पश्चिम मुंबईच्या जागेबाबच बोलणी झाली नाहीत. त्यामुळे कोणीही दावे प्रतिदावे करत असले तरी त्यावर काँग्रेसकडून अधिकृतपणे काही भूमिका स्पष्ट केली जात नाही तोपर्यंत त्या गोष्टीवर चर्चा करण्यात काही अर्थ नाही असा टोला त्यांनी संजय निरुपण यांना लगावला.
निरुपमांचा आक्षेप
काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांच्याकडून शिवसेनेने 23 जागांवर केलेल्या दाव्यावर त्यांनी आक्षेप नोंदविला आहे. त्यावर बोलताना संजय निरुपम यांनी म्हटले आहे की, शिवसेनेकडून जर 23 जागांवर दावा केला तर मग आम्ही कोणत्या जागा लढवाव्या असा सवाल त्यांनी शिवसेनेला केला आहे.
जास्त जागांचा आग्रह
यावेळी संजय निरुपम यांनी एक पाऊल मागे घेत सांगितले की, राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस व भविष्यात वंचित बहुजन आघाडी एकत्रित आली तर आघाडीची शक्यता आहे. त्यामुळे एखाद्या महाविकास आघाडीतील घटक पक्षाकडून जास्त जागांचा आग्रह धरण्यात आला तर मात्र नुकसान होण्याची शक्यता असल्याचेही निरुपम यांनी सांगितले.
ADVERTISEMENT