Ajit Pawar आणि आव्हाडांमधील वाद विकोपाला, पवारांबाबतच्या 'त्या' विधानावरुन राडा

मुंबई तक

• 09:32 PM • 05 Feb 2024

Ajit Pawar vs Jitendra Awhad: अजित पवारांनी बारामतीत शरद पवारांबाबत केलेल्या एका विधानावरून आमदार जितेंद्र आव्हाड हे फारच संतापले आहेत. त्यावरून दोघांमध्ये सध्या ट्विटर वॉर रंगलं आहे.

अजित पवार आणि आव्हाडांमधील वाद विकोपाला

Awhad Criticized ajit pawar

follow google news

बातम्या हायलाइट

point

अजित पवारांवर आव्हाड संतापले

point

अजित पवारांनी दिलं स्पष्टीकरण

point

अजितदादा वि. आव्हाड.. ट्विटर वॉर

Ajit Pawar vs Jitendra Awhad NCP Politics: मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत भाषणात केलेल्या एका वक्तव्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात वाद सुरु आहे. अजित पवार यांनी भाषण करताना कार्यकर्त्यांना आवाहन केलं होतं की, 'शेवटची निवडणूक आहे असं सांगतील आणि भावनिक आवाहन करतील. पण तुम्ही त्याला बळी पडू नका. तसेच शेवटची निवडणूक कधी येईल हे मला माहिती नाही,' असं अजित पवार म्हणाले होते. (ncp politics controversy between ajit pawar and jitendra awhad broke out criticism on ajit pawar after his statement about sharad pawar)

हे वाचलं का?

नेमका वाद काय?

अजित पवारांनी नाव न घेता ही टीका शरद पवार यांच्यावर केली होती. त्यानंतर आता या वक्तव्याचे पडसाद उमटू लागले आहेत. 'मला अजित पवारांबरोबर काम केल्याची लाज वाटते' असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

'आज अजित पवारांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना हद्द ओलांडली आहे. एखाद्या माणसाच्या मृत्यूची प्रार्थना करणं, याचना करणं हे माणुसकीला शोभणारं आहे काय? याचा विचार अजित पवार यांनी जरुर करावा.' असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर टीका केली.

'आपल्या काकाच्या मृत्यूची वाट बघताय, हे राजकारण आहे का अजित पवार? भावनिक आवाहन करतील, ही शेवटची निवडणूक असेल. काय माहीत शेवटची निवडणूक कधी असेल? शरद पवार आहेत ते अजरामर राहतील, त्यांचं योगदान अजरामर असणार आहे हे विसरु नका. आज अजित पवारांनी सगळी हद्दच ओलांडली.' असं म्हणत आव्हाडांनी त्यांना उत्तर दिलं आहे.
 
जितेंद्र आव्हाड म्हणाले होते की, 'आपली उंची ओळखा कुठे शरद पवार आणि कुठे तुम्ही? अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंह हे देखील नावं काढतात. लाज वाटते मला तुमच्या सोबत काम केल्याची आधी पण वाटतच होती. शरद पवार देशाचे नेते तुम्हाला महाराष्ट्रात कोण ओळखत नाही. ज्या कुटुंबाने तुम्हाला सर्व दिले, ज्या माऊलीने तुम्हाला सर्व दिले तिचं कुंकू कधी पुसलं जाईल याची आज तुम्ही वाट बघता असल घाणेरडं राजकारण महाराष्ट्राने कधी बघितलं नाही.'

यावर ट्वीट करत अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी काय म्हटलंय बघा...

'काल माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे. माझं पहिल्यापासून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असल्यापासून एवढंच म्हणणं होतं की, ज्येष्ठ नेत्यांनी शारीरिक दगदगीचा विचार करावा आणि प्रकृतीची काळजी घ्यावी. हे मत मी पूर्वी देखील मांडलेलं आहे. मात्र, काही लोक स्वतःच्या राजकारणासाठी ज्येष्ठ नेत्यांचा वापर करू पाहतात. त्यांना ह्या गोष्टी कळणार नाहीत. माझ्या त्यांच्याबद्दलच्या भावना मी वेळोवेळी मांडलेल्या आहेत. पण काही लोकांना 'ध' चा 'मा' करायची सवयच असते, अशा नाटकीबाज लोकांना मी महत्त्व देत नाही. मात्र सर्वसामान्य लोकांना माझ्या भावना कळाव्यात, म्हणून मी हे म्हणणं मांडत आहे.'

आव्हाडांनी याच ट्विटला कोट करत प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले.. 'नाटकी लोकांना किमत देत नाही तर खुलासा कश्याला करता आहात. साहेबांच्या नावाचा फायदा तुम्हाला किती झाला हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा.. तुमच्या मनातले तोंडात आले आणि महाराष्ट्राला सत्य कळले.. जाऊ द्या कधी तरी खरा चेहरा बाहेर येतोच.. नाहीतर तुम्ही इतकी सारवासारव केली नसती
आणि हो कावळ्याच्या शापानी गाय मरत नसते..'

आता अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यातील हा वाद  कुठवर जाऊन पोहोचतोय ते पाहणं महत्वाचं आहे.

    follow whatsapp