मुंबई: राज्यात नव्या सरकारचा शपथविधी झाल्यानंतर विधीमंडळाचं तीन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलविण्यात आलं. मागील दोन दिवस नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडल्या. त्यानंतर अधिवेशनच्या शेवटच्या दिवशी म्हणजे आज (9 डिसेंबर) विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली. यावेळी भाजप नेते राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. याच निवडीनंतर विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेस आमदार आणि माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना चांगलंच डिवचलं.
ADVERTISEMENT
'तुम्ही वाट मोकळी केल्यामुळे मागच्या वेळेस राहुल नार्वेकर अध्यक्ष बनू शकले.' असं म्हणत फडणवीसांनी नाना पटोले यांना डिवचलं.
हे ही वाचा>> Rohit Pawar : "आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेणं किंवा एखाद्या पक्षाला B-team म्हणणं...", रोहित पवार यांचा कुणाला सल्ला?
पाहा देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले...
'अध्यक्ष महोदय.. तुम्ही मी पुन्हा येईन असं म्हटलं नव्हतं. पण तरी देखील आपण परत आलात. याचा मला मनापासून आनंद आहे. या खुर्चीला न्याय देण्याचं काम आपल्या माध्यमातून होईल याबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नाही.'
'राहुल नार्वेकर हे पहिल्याच टर्म अध्यक्ष बनले आणि पुन्हा लागोलाग ते अध्यक्ष बनले. नाना भाऊ तुमचेही विशेष आभार आहेत. तुमच्यापेक्षा तसे ते लहान आहेत. 13-14 वर्षांनी.. माझ्या पेक्षाही ते लहान आहेत. पण तुम्ही वाट मोकळी केल्यामुळे मागच्या वेळेस ते अध्यक्ष बनू शकले.'
हे ही वाचा>> Eknath Shinde : "सगळं क्रेडीट नानांना...", नार्वेकरांचं अभिनंदन करताना शिंदेंनी नाना पटोलेंचं कौतुक का केलं?
'अर्थात त्या आधी त्यांना विधानपरिषदेत काम करण्याची संधी मिळाली होती आणि त्यांनी चुणूक देखील दाखवली होती.'
'मागील 5 वर्ष महाराष्ट्रातील राजकारणाचं संक्रमण काळ होता. या संक्रमण काळात घडलेल्या घडामोडींमुळे पहिल्यांदा विधानसभेच्या अध्यक्षांकडे मीडिया, महाराष्ट्रातील जनतेचं सातत्याने लक्ष असायचं आहे. कदाचित महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वाधिक चर्चेत राहिलेले अध्यक्ष देखील हे राहुल नार्वेकरजीच होते.'
'मला वाटतं त्यांच्या रुपाने एक न्यायप्रिय, अभ्यासू आणि संयमी व्यक्तीमत्व आज विधानसभेच्या अध्यक्ष पदावर निवडलं गेलंय.'
'खरं तर पुन्हा अध्यक्ष होण्याचा मान आजवर चारच लोकांना मिळाला आहे. ज्यामध्ये कुंदनलाल फिरोदिया, सयाजी सिलम, बाळासाहेब भारदे आणि त्यानंतर राहुल नार्वेकर हे आहेत.' असं फडणवीस यावेळी म्हणाले.
ADVERTISEMENT