Sharmila Thackeray Criticize Uddhav Thackeray : दिशा सालियन मृत्यू प्रकरणी एसआयटी चौकशी वरून मनसे प्रमुख राज ठाकरे(Raj thackeray) यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची पाठराखण केली होती.यानंतर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शर्मिला ठाकरे यांचे आभार मानले होते. ठाकरेंनी आभार मानल्यानंतर आता शर्मिला ठाकरे यांनी त्यांना चांगलचं सुनावलं आहे. ‘मी माझ्या पुतण्यावर (आदित्य) विश्वास दाखवला’. ‘पण तुम्ही भावावर थोडा तरी विश्वास दाखवायला हवा होता’. ‘तुम्ही संधी मिळेल तेव्हा किणी केसवरून टोमणे मारायचे सोडले नाहीत’, अशा कठोर शब्दात शर्मिला ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना खडेबोल सुनावले आहेत.(raj thackeray wife sharmila thackeray criticize uddhav thackeray on dharavi development aditya thackeray maharashtra politics mns)
ADVERTISEMENT
आदित्य ठाकरेंची पाठराखण केल्यानंतर ठाकरेंनी शर्मिला ठाकरेंचे आभार मानले होते. यावर माध्यमांनी प्रश्न विचारला असता, शर्मिला ठाकरे म्हणाल्या, ‘मी माझ्या पुतण्यावर विश्वास दाखवला’. ‘आदित्य असं करेल असं मला वाटत नाही’. ‘पण तुम्ही ज्या भावाबरोबर लहानाचे मोठे झालात, त्या भावावर थोडा तरी विश्वास दाखवायला हवा होता’. ‘तुम्ही संधी मिळेल तेव्हा किणी केसवरून टोमणे मारायचे सोडले नाहीत’.’त्या भावावर विश्वास ठेवून मदत करायला हवी होती’.’मग आम्हीही त्यांचे आभार मानले असते’, अशा शब्दात शर्मिला ठाकरे यांनी ठाकरेंना टोला लगावला.
हे ही वाचा : Crime : यवतमाळमध्ये जावयाने घातला रक्ताचा सडा! पत्नी, सासरा, दोन मेहुण्यांची केली हत्या
शर्मिला ठाकरे यांनी धारावी पुर्नविकास आणि मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन देथील ठाकरेंना घेरले होते.धारावीचा पुनर्विकास करायचाच होता तर तुमचं सरकार असताना करून टाकायचा, कोणी तुमचे हात धरले होते, असा सवाल शर्मिला ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला. राज्यात मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी विरोधक करत आहेत. मात्र, तुमचं सरकार असताना तुम्ही आरक्षणाचे विधेयक विधानसभेत का मंजूर केलं नाही? हा प्रश्न तर कोरोना काळात सुरू झाला नव्हता. मराठा समाजाच्या आरक्षणाचे मोर्चे वर्षानुवर्षे निघत आहेत. मग तुम्ही त्यांना आरक्षण का दिलं नाही? असा सवाल शर्मिला ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला विचारला.
ADVERTISEMENT