Rajasthan Assembly Election Poll Of Polls Exit Poll 2023: लोकसभा निवडणुकांआधी पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकींपैकी राजस्थान हे अत्यंत महत्त्वाचं असं राज्य आहे. राज्यस्थानमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये अत्यंत अटीतटीची लढाई असल्याचं एक्झिट पोलमध्ये पाहायला मिळत आहे. इंडिया टुडे-एक्सिस माय इंडियाने केलेल्या सर्वेनुसार, राजस्थानमध्ये काँग्रेसला काठावरचं बहुमत मिळेल. त्यामुळे ते सत्ता स्थापन करू शकतात.
ADVERTISEMENT
इंडिया टुडे- एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल
इंडिया टुडे- एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोलनुसार भाजपला 80 ते 100 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसला 86 ते 106 जागा मिळतील. याशिवाय इतरांना 9 ते 18 जागा मिळतील
पाहा काय आहे राजस्थानचा Poll of Polls
इतर चॅनल आणि सर्वेक्षण संस्थांचा नेमका एक्झिट पोल काय?
- News 18- जन की बातच्या सर्वेनुसार भाजपला राजस्थानमध्ये 100-122 जागा मिळतील. तर काँग्रेसला 62 ते 85 जागा आणि इतरांना 14 ते 15 जागा मिळतील.
- टाइम्स नाऊ ईटीजीच्या सर्वेनुसार भाजपला राजस्थानमध्ये 108-128 जागा मिळतील. तर काँग्रेसला 56 ते 72 जागा आणि इतरांना 13 ते 21 जागा मिळतील.
- PMARQच्या सर्वेनुसार भाजपला राजस्थानमध्ये 105-125 जागा मिळतील. तर काँग्रेसला 69 ते 81 जागा आणि इतरांना 05 ते 15 जागा मिळतील.
- ABP- सी वोटरच्या सर्वेनुसार भाजपला राजस्थानमध्ये 60 जागा मिळतील. तर काँग्रेसला 137 जागा आणि इतरांना 02 जागा मिळतील.
ADVERTISEMENT