‘शिव्या देणं ही महाराष्ट्राची परंपरा नाही’, कथित ऑडिओ क्लिपवर लोणीकर स्पष्टच बोलले

मुंबई तक

14 Dec 2023 (अपडेटेड: 14 Dec 2023, 05:31 PM)

जालना मध्यवर्ती बँकेची निवडणूक ही बिनविरोध झाली आहे, त्यामुळे आमदार राजेश टोपे आणि माझे त्यासंदर्भात कधीच बोलणे झाले नसल्याचे स्पष्टीकरण आमदार बबनराव लोणीकर यांनी दिले आहे.

Mumbaitak
follow google news

Babab Lonikar : जालना मध्यवर्ती बँकेची (Jalana District Bank) 15 दिवसांपूर्वी निवडणूक झाली होती. त्या निवडणुकीच्या काळातील एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. ती ऑडिओ क्लिपमध्ये भाजपचे आमदार बबनराव लोणीकर (Baban Lonikar) यांनी आमदार राजेश टोपे (MLA Rajesh Tope) यांना अर्वाच्य शिवीगाळ केली होती. त्या क्लिपबद्दल बबनराव लोणीकरांना पत्रकारांनी प्रश्न विचारले असता ती ऑडिओ क्लिप माझी नसल्याचे सांगत राजेश टोपे आणि माझे फोनवर बोलणंच झालं नसल्याचे स्पष्टीकरण आमदार बबनराव लोणीकर यांनी दिले आहे.

हे वाचलं का?

फोनवर बोलणंच झालं नाही

आमदार बबनराव लोणीकर यांना व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपवर स्पष्टीकरण देतान सांगितले की, जालना मध्यवर्ती बँकेची निवडणूक ही बिनविरोध झाली आहे. तसेच बँकेच्या निवडणुकीविषयी आमदार राजेश टोपे आणि माझे कधी फोनवर बोलणेच झाले नाही. त्यामुळे जी व्हायरल झालेली क्लिप आहे, ती माझी नाही, आणि ती ऑडिओ क्लिप खरीही नाही असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

हे ही वाचा >>कार चालवतानाच फुटली श्वासनलिका, जगातील पहिलीच घटना

शिव्या देणारी परंपरा नाही

आमदार बबनराव लोणीकर यांनी त्या क्लिपविषयी बोलताना ही शिव्या देण्याची महाराष्ट्राची परंपरा नाही. महाराष्ट्राची परंपरा ही विश्वासघाताची नाही तर शाहू, फुले, आंबेडकरांची विचारधारा आहे. त्याच बरोबर राजकारणात दिलेले शब्द पाळले पाहिजेत असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या क्लिपबाबत जर राजेश टोपेंनी ट्विट केले असेल तर त्याविषयी तुम्ही त्यांनाच विचारा असंही त्यांनी पत्रकारांना सांगितले.

शंका असेल त्यांनी चौकशी करावी

शिवीगाळ करणे ही महाराष्ट्राची परंपरा नाही. त्यामुळे जी व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप आहे, ती माझी नसून बँकेच्या निवडणुकीची चर्चा ही कधीच आम्ही फोनवर केली नाही. त्यामुळे जर राजेश टोपेंना त्याबद्दल काही शंका असेल तर त्यांनी त्यांची चौकशी करावी असंही लोणाकर यांनी सांगितले आहे. राजेश टोपे यांनीही याबाबतचे एक ट्विट त्यांनी केले आहे.

    follow whatsapp