राम मंदिराच्या (Ram Mandir) निमंत्रणावरून सध्या भाजप शिवसेनेमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. राम मंदिराच्या उभारणीत उद्धव ठाकरेंचे योगदान काय? असा सवाल भाजप नेत्यांनी उपस्थित केला होता.भाजपच्या या आरोपावर आता ठाकरेंनी सामना अग्रलेखातून प्रत्युत्तर दिले आहे. ‘राम अंहकारी नव्हता, पण मंदिराचे उद्घाटन करणारे अहंकारी आणि ढोंगी आहेत, अशी टीकेची तोफ ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Pm Narendra Modi) डागली आहे. श्रीरामाने पिताश्री दशरथाचा सन्मान राखून वनवास पत्करला होता. मात्र येथे पिताश्री आडवाणी यांनाच वनवासी करून अयोध्येचा सातबारा आपल्या नावावर करून घेतल्याचा आरोप ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मोदींवर केला आहे. (ram mandir inaugration samanaa editorial criticized pm narendra modi and devendra fadnavis maharashtra politics)
ADVERTISEMENT
अग्रलेखात काय?
राम मंदिराच्या लढ्यानंतर मुंबईत भडकलेल्या दंगलीत हिंदूंचे रक्षण करणाऱ्या शिवसेनेचे राममंदिरात योगदान काय? असे विचारणारी अवलाद शुद्ध हिंदू असू शकत नाही. तसेच बाबरीचे घुमट कोसळत असताना जे पलायनवादी झाले तेच आज हिंदुत्ववादी म्हणून मिरवत आहेत, अशी टीका देखील ठाकरेंनी भाजपवर केली आहे.प्रभू श्रीराम हे सामान्यांचे होते, पण आता भाजपने जाहीर केले आहे राममंदिर फक्त व्हीव्हीआयपी लोकांचे आहे. त्यांनाच आमंत्रित केले जाईल, असे सांगणारे हे रावणाचे आणि विभीषणाचे वशंज असल्याची टीकाही ठाकरेंनी मोदींवर केली आहे.
हे ही वाचा : ‘RBI सह मुंबईतील 11 ठिकाणं बॉम्बने उडवून देऊ’, धमकीच्या ई-मेलमुळे पोलीस अलर्ट
रामचरित्र मानस म्हणजे भाजपची जुमलेबाजी नाही व अयोध्या म्हणजे अदानींची प्रॉपर्टी नाही. राममंदिराचा उद्घाटन सोहळा हे पवित्र मंगलमय कार्य आहे. मात्र भाजपने राजकीय चिखल निर्माण करीन त्यांचे मांगल्य व पाविंत्र्य संपविल्याचीही टीका ठाकरेंनी केली आहे.
हे ही वाचा : ‘अजित पवार चार महिन्यात तुरुंगात जाणार’, शालिनीताईंनी थेट दावाच केला
देवेंद्र फडणवीसांवर टीका
शिवसैनिक बाबरीवर घाव घालत असताना मैदान सोडून गेलेले रणछोडदास आता ‘हिंमत दाखवा’ वगैरे आव आणतात तेव्हा आश्चर्य वाटते, राम मंदिर तुमची खाजगी संपत्ती आहे काय? असा प्रश्न विचारताच फडणवीसांना मिरची लागायचे कारण नाही, पण प्रश्न खरा असल्यामे त्यांना झोंबला आहे, अशी टीकाही ठाकरेंनी केली.
प्रभू श्रीरामाचे बोट धरून विष्णूचे तेरावे (भाजपा कृत) अवतार मोदी हे राममंदिरात निघाले आहेत अशी पोस्टरबाजी हिंदूंना मान्य नाही. मोदी हे रामापेक्षा मोठे झाले काय? असे पोस्टर दुसऱ्या कोणी छापले असते तर ‘हिंदुत्वाचा अपमान झाला होss’ अशा आरोळ्या ठोकत भाजपाने रस्त्यांवर घंटानाद व थाळीवादन केले असते. पण राममंदिरात मोदी निघाले आहेत व रामाने त्यांचे बोट धरले आहे हे चित्र भाजपास अस्वस्थ करीत नाही,” अशी टीका ठाकरेंनी केली आहे.
ADVERTISEMENT