RSS Vivek on Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला. या निकालाबद्दलचे विश्लेषण करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्नित साप्ताहिक विवेकमधून भाजपला आरसा दाखवण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेणे भाजप कार्यकर्त्यांना आवडलेले नाही, असे म्हणत भाजप नेतृत्वाला सुनावण्यात आले आहे. (Weekly Vivek said that BJP workers did not like Ajit Pawar's NCP to join the Mahayuti)
ADVERTISEMENT
'आरएसएस'शी संबंधित विवेक साप्ताहिकात नेमके काय?
'साप्ताहिक विवेक'च्या निमेश वहाळकर यांनी लिहिलेल्या लेखात अजित पवारांबद्दल स्पष्ट मते मांडण्यात आली आहेत.
"लोकसभेतील अपयशाची कारणे सांगताना वा आपापली नाराजी, अस्वस्थता सांगताना जवळपास प्रत्येक कार्यकर्ता आज पहिली सुरूवात करतो ती राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेल्या युतीपासून."
हेही वाचा >> Ladka bhau yojana: 12 वी पास तरुणांना 6 हजार रुपये, तर पदवीधरांना...; शिंदे सरकार देणार प्रचंड पैसे!
"राष्ट्रवादीला सोबत घेणे भाजपच्या कार्यकर्त्याला आवडलेले नाही, हे स्पष्ट आहे. याची जाणीव भाजपा नेत्यांना नाही असे नाही. अलीकडेच स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीही एका मुलाखतीत याबाबत भाष्य केले होतेच."
शिवसेनेत अंतर्गत बंड घडवले
"शिवसेनेने पुन्हा युतीत येणे, त्यासाठी शिवसेनेत घडवलेले अंतर्गत बंड, एकनाथ शिंदे यांचा शपथविधी आदी घटना कार्यकर्त्यांनी स्वीकारल्या. हिंदुत्व हा सामायिक दुवा असल्याने आणि या युतीला मागील अनेक दशकांचा इतिहास असल्याने बारीकसारीक कुरबुरी असल्या तरी ही युती नैसर्गिक असल्याचे मतदारांना पटले होते."
हेही वाचा >> "मग, दोष एकनाथ शिंदेंना कशाला द्यायचा?", आव्हाडांचे अजित पवारांवर टीकेचे 'बाण'
पुढे या लेखात म्हटले आहे की, "मात्र हीच भावना राष्ट्रवादीसोबत आल्यानंतर अगदी दुसऱ्या टोकाला जाऊ लागली आणि लोकसभेमुळे या नाराजीत आणखी भर पडल्याचे चित्र आहे. अर्थात राजकीय नेत्यांची वा पक्षाची स्वतःची अशी काही गणिते व आडाखे असतात", असेही या लेखात म्हटले आहे.
"राष्ट्रवादीचा महायुतीत समावेश हे हिमनगाचे टोक"
"निवडणुकीच्या राजकारणाचे आकलन वेगळे असते; परंतु जर ही गणिते चुकताना दिसत असतील, तर त्याचे काय करायचे, हा प्रश्न उपस्थित होतोच. तसेच कार्यकर्त्यांमधील अस्वस्थतेमागे राष्ट्रवादीचा समावेश हे वरकरणी मुख्य कारण दिसत असले तरी तेवढेच एक मुख्य कारण आहे, असे मुळीच नाही. ते केवळ हिमनगाचे टोक आहे", असे निरीक्षण साप्ताहिक विवेकमधील या लेखात मांडण्यात आले आहे.
ADVERTISEMENT