Maharashtra CM : फडणवीसांना पहिली पसंती! उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंना ठरले भारी

मुंबई तक

16 Jul 2023 (अपडेटेड: 16 Jul 2023, 06:41 AM)

‘2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी आपण कुणाला पसंती द्याल?’, असा प्रश्न या सर्व्हेक्षणात विचारण्यात आला.

sakal survey for maharashtra chief minister in 2024, eknath shinde devendra fadnavis uddhav thackeray

sakal survey for maharashtra chief minister in 2024, eknath shinde devendra fadnavis uddhav thackeray

follow google news

Sakal survey : काही दिवसांपूर्वी एका जाहिरातीने भाजप-शिवसेना युतीत वादाची ठिणगी पडली होती. एका सर्व्हेक्षणाचा हवाला देत केलेल्या या जाहिरातबाजीवरून बरंच नाट्य रंगलं होतं. एकनाथ शिंदेंना देवेंद्र फडणवीसांपेक्षा जास्त पसंती असल्याचा दावा या सर्व्हेच्या आधारे केला गेला होता, पण आता शिंदेंना नव्या ओपिनियन पोलने धक्का दिला आहे. देवेंद्र फडणवीसांना लोकांनी कशासाठी पसंती दिलीये, नेमका हा सर्व्हे काय आहे आणि उद्धव ठाकरे शिंदेंना कसे भारी ठरलेत, हेच समजून घेऊयात… (sakal survey 2024 maharashtra)

हे वाचलं का?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडानंतर सकाळ माध्यम समूहाकडून महाराष्ट्रातील 288 मतदारसंघात एक सर्व्हे करण्यात आला. यात 74 हजार 330 मतदारांशी संवाद करण्यात आला. काही प्रश्नांवर त्यांची मते जाणून घेण्यात आल्यानंतर जे निष्कर्ष समोर आले. ते काहींना सुखद धक्का, काहींची चिंता वाढणारे आहेत.

वाचा >> Mumbai Bandstand : ‘मुलगी ओरडत राहिली, लाट आली अन्…’, फोटोच्या नादात गेला जीव

मुख्यमंत्रीपदासाठी कुणाला पसंती?

‘2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी आपण कुणाला पसंती द्याल?’, असा प्रश्न या सर्व्हेक्षणात विचारण्यात आला. सर्वाधिक पसंती देवेंद्र फडणवीस यांना मिळाली आहे. कुणाला किती टक्के?

वाचा >> Sangram Thopte : “अजित पवारांचा होता विरोध, आता विरोधी पक्षनेता करा”, खरगेंना पत्र

1) देवेंद्र फडणवीस 21.9 टक्के
2) उद्धव ठाकरे 19.4 टक्के
3) अजित पवार 9.5 टक्के
4) एकनाथ शिंदे 8.5 टक्के
5) सुप्रिया सुळे 8.5 टक्के
6) अशोक चव्हाण 6.6 टक्के
7) बाळासाहेब थोरात 4.2 टक्के
8) जयंत पाटील 3.3 टक्के
9) सांगता येत नाही 17.8

सर्व्हेतील आकडेवारी एकनाथ शिंदेंचं टेन्शन वाढवणारी

काही दिवसांपूर्वी सर्व वर्तमानपत्रांमध्ये ‘राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ अशी एक जाहिरात प्रसिद्ध झाली होती. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्यबाणासह ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीत असा दावा केला होता की, पुन्हा मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रातील जनतेची एकनाथ शिंदेंना सर्वाधिक पसंती (26.1 टक्के), तर देवेंद्र फडणवीस यांना 23.2 टक्के पसंती आहे.

वाचा >> “राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे”, देवेंद्र फडणवीसांना इशारा?

त्यावरून बरंच वाद झाला होता. आता ‘सकाळ’ने केलेल्या सर्व्हेक्षणातून जे निष्कर्ष समोर आले आहेत, ते एकनाथ शिंदेंचं टेन्शन वाढवणारे आहेत. एकनाथ शिंदेंना 8.5 टक्के लोकांचीच पसंती आहे. पसंती क्रमवारीत ते चौथ्या स्थानी असून, त्यांच्या इतकीच पसंती सुप्रिया सुळेंना आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदेपेक्षा जास्त पसंती (9.5 टक्के) लोकांनी अजित पवार यांना दिली आहे. तर देवेंद्र फडणवीसांनंतर दुसऱ्या क्रमांकावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री होऊन वर्ष झाले तरी मतदारांमध्ये सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्यात एकनाथ शिंदे अपयशी ठरलेत का? अशी चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.

    follow whatsapp