Sanjay Raut : एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्सच्या विलीनीकरण प्रकरणात सीबीआयने (CBI) क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. आता शिवसेना उद्धव गटाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, 'ज्यांनी एअर इंडिया घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित केला त्यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर आरोप केले होते. त्यांनी माजी पंतप्रधानांची माफी मागावी, कारण आता या प्रकरणात सर्वांना क्लीन चिट मिळाली आहे.'
ADVERTISEMENT
'आता इक्बाल मिर्चीलाही...', राऊतांचा केंद्र सरकारवर पलटवार!
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधत संजय राऊत पुढे म्हणाले की, 'आरोप करणाऱ्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतरांचा समावेश होता. आता त्यांनी या प्रकरणी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची माफी मागावी, कारण आता त्यांना या प्रकरणात क्लीन चिट मिळाली आहे. सध्या अनेक लोक रांगेत उभे आहेत. यानंतर इक्बाल मिर्चीलाही क्लीन चिट मिळणार आहे.'
प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधातील कथित घोटाळप्रकरण नेमकं आहे तरी काय?
इंडियन एअरलाइन्स आणि एअर इंडियाच्या विलीनीकरण प्रकरणात 840 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी अजित पवार गटाचे नेते आणि राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधात सीबीआयने गुरुवारी (28 मार्च) तपास बंद केला. प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधात कोणताही पुरावा सापडला नसल्याने सूत्रांचे म्हणणे आहे.
सीबीआयने हा तपास बंद केला आहे. एअर इंडिया विमानाच्या भाडेतत्त्वावर 840 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याशी संबंधित प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) करत होते.
सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल करत दिली महत्त्वाची माहिती
सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल करून सांगितले की, बराच तपास आणि अभ्यास करून ही कारवाई करण्यात आली असून हा अहवाल प्रामाणिकपणे दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT