Sanjay Raut has made a controversial comment on CM Shinde: मुंबई: मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीचे (NCP) तळवे चाटले अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी काल (18 फेब्रुवारी) पुण्यातील एका भाषणात केली. ज्याला उत्तर देताना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर त्याच भाषेत टीका केली. पण याचवेळी टीका करताना संजय राऊतांची पुन्हा एकदा जीभ घसरली आहे. (sanjay rauts tongue slipped while criticizing the chief minister eknath shinde and amit shah)
ADVERTISEMENT
मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंनी विरोधकांचे तळवे चाटले अशी टीका अमित शाहा यांनी केली. असं जेव्हा संजय राऊतांना पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं तेव्हा राऊत चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले. ते यावर तात्काळ म्हणाले की, ‘आता काय चाटतायेत सध्याचे मुख्यमंत्री.. आता काय चाटतायेत, XXX चाटतायेत का?.. काय चाटतायेत? ही चाटूगिरी महाराष्ट्रात कधीच झाली नव्हती.’ असं वादग्रस्त वक्तव्य राऊतांनी यावेळी केलं.
Amit Shah: मुख्यमंत्री पदासाठी ठाकरेंनी काँग्रेस-NCPचे तळवे चाटले: शाह
पाहा संजय राऊत नेमकं काय म्हणाले:
‘अमित शाह काय बोलतात हे महाराष्ट्राने कधीही गांभीर्याने घेतलेलं नाही. आता काय चाटतायेत सध्याचे मुख्यमंत्री.. आता काय चाटतायेत, XXX चाटतायेत का?.. काय चाटतायेत? ही चाटूगिरी महाराष्ट्रात कधीच झाली नव्हती. चाटूगिरीचं टोक आहे सध्याचं महाराष्ट्रात. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. इतकी टोकाची चाटूगिरी या महाराष्ट्रात चालली आहे. आणि ज्यांची चाटली जातेय ते आम्हाला ज्ञान देतायेत.’
‘जो पक्ष आणि जो नेता.. शाखाप्रमुख आणि नगरसेवकांना विकत घेण्यासाठी 50-50 लाख रुपये देत आहे. आमदारांना विकत घेण्यासाठी 50 कोटी आणि खासदारांना विकत घेण्यासाठी 100 कोटी देतायेत. तो पक्ष शिवसेना हे नाव आणि चिन्ह विकत घेण्यासाठी किती मोठा सौदा करून बसला असले. याचा हिशोब तुम्हाला जमणार नाही. यासाठी 100 ऑडिटर्स लावावे लागतील. माझ्याकडे पक्की माहिती आहे. माझ्यासह अनेकांकडे माहिती आहे. आतापर्यंत चिन्ह आणि शिवसेना हा नाव विकत घेतलं गेलं. हा न्याय नाहीए. हा निर्णय विकत घेतलाय. हा सौदा आहे. हे डील आहे. आतापर्यंत 2000 कोटी खर्च झाले आहेत.’
‘माझ्या मतावर मी ठाम आहे. हा निर्णय विकत घेतलेला आहे. कारण हे सरकार जे खोक्यातून झालं आहे. आमदार-खासदार विकत घेऊन झालं आहे. आजही नगरसेवकांचे भाव शहरांनुसार ठरवले गेले आहेत. त्यांनी चिन्ह आणि नाव विकत घेण्यासाठी किमान 2000 कोटी खर्च केल्याची माहिती त्यांच्याच मित्र परिवाराने, बिल्डरांनी दिली आहे.’ अशी घणाघाती टीका संजय राऊतांनी यावेळी केली आहे.
Shiv Sena: संजय राऊतांचा गंभीर आरोप; “शिवसेना नाव आणि चिन्हासाठी 2 हजार कोटी..”
अमित शाहांनी साधलेला उद्धव ठाकरेंवर टीका
‘कालच एक मोठा विजय आमच्या युतीला मिळाला आहे. शिंदेंच्या शिवसेनेला खरी शिवसेना आणि धनुष्यबाण या दोन्ही गोष्टी मिळाल्या आहेत. एकदा टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करा. जी लोकं खोटेपणाच्या आधारावर हुंकार भरत होते त्यांना आज माहित पडलं की, सत्य कोणासोबत आहे.’
‘2019 च्या निवडणुकीत मी पक्षाचा अध्यक्ष होतो. निवडणूक आम्ही युतीत लढलो. स्वत:च्या फोटोपेक्षा मोदींचा मोठा फोटो लावला. देवेंद्रजींना नेता मानून निवडणूक लढली आणि नंतर मुख्यमंत्री बनणण्यासाठी विरोधी विचारधारा असलेल्यांचे तळवे चाटू लागले. आज त्यांनाच सत्य काय आहे ते कळलं आहे.’ अशी जहरी टीका अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर केली होती.
ADVERTISEMENT