‘सावरकर म्हणायचे की बलात्कार हे एक…’, ‘या’ बड्या नेत्याच्या मुलीचं खळबळजनक वक्तव्य

मुंबई तक

15 Apr 2023 (अपडेटेड: 15 Apr 2023, 07:46 AM)

‘सावरकर म्हणायचे की बलात्कार हे एक राजकीय हत्यार आहे’, असं विधान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी हे विधान केलं आहे.

'Savarkar used to say that rape is a political weapon'. said Shivani Wadettiwar

'Savarkar used to say that rape is a political weapon'. said Shivani Wadettiwar

follow google news

चंद्रपूर: ‘सावरकर म्हणायचे की बलात्कार हे एक राजकीय हत्यार आहे, ते आपल्या विरोधकांच्या विरोधात वापरा’, असं विधान काँग्रेस नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार (Shivani Wadettiwar) यांनी केलं आहे. ज्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. एका जाहीर कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. ज्यावरून आता त्यांच्यावर टीकाही केली जात आहे. पण त्याकडे दुर्लक्ष करत शिवानी यांनी थेट सावरकरांच्या एका पुस्तकातच हे विधान असल्याचा दावा केला आहे. आता हे संपूर्ण प्रकरण काय हे आपण सविस्तर जाणून घेऊया. (savarkar used to say that rape is a political weapon vijay wadettiwar daughter shivani wadettiwar made a controversial statement)

हे वाचलं का?

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या काही विधानानंतर राज्यातील भाजप नेत्यांनी राहुल गांधींचा निषेध व्यक्त करत थेट राज्यभरात सावरकर गौरव यात्रा काढण्यास सुरुवात केली आहे. असं असताना आता याच मुद्द्यावरुन विजय वडेट्टीवारांच्या मुलीने भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. पण यावेळी त्यांनी जे विधान केलं आहे त्यामुळे त्या सध्या चर्चेत आल्या आहेत.

शिवानी वडेट्टीवारांनी नेमकं काय विधान केलं?

‘हे लोकं फुले, शाहू, आंबेडकर विचारांचा.. कधीच मोर्चा काढणार नाही. कुठला मोर्चा काढतात तर सावरकर मोर्चा काढतात. सावरकर मोर्चा काढून काय करतात?’

अधिक वाचा- उद्धव ठाकरेंना भाजप पुन्हा एंट्री देणार? अमित शाहांनी विषय केला क्लिअर

‘सावरकर मला तर… मला आणि माझ्यासोबत महिला भगिनी इकडे उपस्थित आहेत. सगळ्यांना भीती वाटत असेल कारण की, सावरकरांचे विचार होते.. काय विचार होते? तर विचार होते की, बलात्कार हे राजकीय हत्यार आहे. जे तुम्ही तुमच्या राजकीय विरोधकांच्या विरोधात वापरलं पाहिजे..’

‘मग माझ्यासारख्या महिला भगिनींना कसं सुरक्षित वाटेल? आणि अशा लोकांचा प्रचार करत हे लोकं रॅली काढतात.’

त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांना बरंच टार्गेट करण्यात आलं. पण तरीही शिवानी वडेट्टीवार या आपल्या मतावर ठाम आहेत. त्यांनी ट्विटरवरुन आपल्या विरोधकांना थेट प्रत्युत्तरही यावेळी दिलं आहे.

अधिक वाचा- “… त्याला जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही”; ठाकरेंवर फडणवीसांचा पलटवार

‘सावरकरांनी “सहा सोनेरी पाने” या त्यांच्या पुस्तकात बलात्कार हे राजकीय हत्यार आहे हे विकृत विधान केलेलं आहे. ज्यांना पुरावा पाहिजे त्यांनी ते पुस्तक वाचावे.’ असं शिवानी वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा- शरद पवारांची अदाणींसाठी बॅटिंग, राहुल गांधींचंही प्रत्युतर… पण वेगळ्याच स्टाइलमध्ये!

मुलीच्या वक्तव्यावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

‘हा विषय फार गंभीर आहे असं मला वाटत नाही. मी शिवानीला विचारलं की हा कुठला संदर्भ घेऊन तू बोललीस. ती म्हणाली सावरकरांनी लिहिलेलं ‘सहा सोनेरी पाने’ या पुस्तकातला संदर्भ आहे. जर ती पुस्तकाचा आधार घेऊन बोलली असेल, तर त्यावर वाद करण्याचंही काहीही कारण नाही. ती स्वत: वकील असल्याने आणि तिला वाचनाचा छंदही असल्याने तिने पुस्तकाचा संदर्भ घेऊन आपलं मत व्यक्त केलं आहे.’ अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

    follow whatsapp