Maharashtra Politics : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांचे कौतुक केले. शिवसेनेचे मुखपत्र सामनाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे महाराष्ट्र सरकारमध्ये प्रामाणिकपणे काम करणारे नेते अशात शब्दात कौतुक केले. अजित पवार हे कुशल प्रशासक असल्याचे सांगून ते म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या विभागात चांगले काम केले. (Maharashtra Political Latest News)
ADVERTISEMENT
उद्धव ठाकरेंचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे, जेव्हा निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवरील दाव्याबाबत शरद पवार यांना भूमिका मांडण्यास सांगितले आहे. अजित यांच्याशी झालेल्या तीन बैठकीनंतर शरद पवारांची भूमिकाही मवाळ झाली आहे.
शरद पवारांच्या या भूमिकेमुळे त्यांचे समर्थक आमदारही संभ्रमात पडले आहेत. शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरेही गेल्या आठवड्यात त्यांच्या कार्यालयात पोहोचल्यानंतर अजित पवार यांची भेट घेतली होती. आधी भेट आणि आता स्तुती, हे महाराष्ट्रात काही नवे समीकरण तयार होण्याचे संकेत आहे का? असा प्रश्न उपस्थित झालाय.
उद्धव ठाकरे मध्यस्थाच्या भूमिकेत आहेत का?
आपल्याच पक्षात अस्तित्वाची लढाई लढत असलेल्या शरद पवारांसोबत असल्याचे उद्धव ठाकरे सातत्याने सांगत आहेत. तर दुसरीकडे ज्यांच्या नेतृत्वाखाली बंड झालं, त्या अजित पवार यांचेही ते कौतुक करताना दिसत आहे. उद्धव ठाकरे यांची अजित पवारांसोबतची भेट आणि आता स्तुतीसुमने काका-पुतण्यातील वैर संपवण्याच्या दिशेने पुढे जाण्याची चिन्हे नाहीत ना? उद्धव ठाकरे मध्यस्थाच्या भूमिकेत आहेत का? असा प्रश्न पुढे आला आहे.
वाचा >> Sambhaji Bhide : “महात्मा गांधींचे वडील मुस्लीम जमीनदार”, भिडेंनी तोडले तारे
याचे कारण म्हणजे यापूर्वी सलग तीन दिवस अजित पवार यांनी काका शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांच्या आजारी पत्नीची प्रकृती जाणून घेण्यासाठी अजित पहिल्याच दिवशी पत्नी आणि मुलासह गेले होते. त्यानंतर पुढील दोन दिवस अजित पवार हे पवारांना भेटले. आधी मंत्री आणि नेत्यांसह, तर नंतर आमदारांसह. अजित पवारांच्या तीन भेटीनंतर शरद पवारांचा सूर मवाळ झाला आहे.
दुसरीकडे, राष्ट्रवादीतील बंडानंतर उद्धव ठाकरे शरद पवार यांच्यासोबत उभे असल्याचे दिसले. विरोधी आघाडीच्या बैठकीला उद्धव ठाकरे आणि शरद पवारही गेले होते आणि पुढची बैठक मुंबईत होणार आहे, ज्याचे यजमानपदही उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याच पक्षाला मिळणार आहे.
वाचा >> NIA : डॉक्टरची पुण्यातून घातक कृत्ये? तरुणांना लावत होता इसिसच्या नादाला!
अजित पवार यांच्याबाबत शरद पवार यांच्या नरमाईमुळे त्यांचे समर्थक आमदार आधीच कोंडीत सापडले आहेत. विधानसभेच्या चालू अधिवेशनात शरद पवार गटाचे आमदार सभागृहात पोहोचले, मात्र राष्ट्रवादीचे बहुतांश आमदारांनी अधिवेशनाकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे. आता उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याने हा संभ्रम आणखी वाढला आहे.
शिंदे गटाला डावलण्याची संधी
अजित पवार गटाच्या प्रवेशामुळे महाराष्ट्र सरकारमधील शिंदे गटाचा कमी होत चाललेला प्रभावही उद्धव ठाकरे यांच्या या वृत्तीचा परिणाम असू शकतो, असे ज्येष्ठ पत्रकार अशोक यांनी सांगितले. अजित पवार यांच्या सरकारमधील प्रवेशानंतर भाजपचे शिंदे यांच्यावरील अवलंबित्व कमी झाले आहे.
शिंदे गटाच्या विरोधानंतरही अजित पवार यांनी अर्थ मंत्रालयाच्या मागणीवर ठाम राहून अखेर ते खात मिळवलच. अजित पवार सरकारमध्ये गेल्यानंतर विरोधी पक्षात असताना एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल करण्याची संधी आता उद्धव ठाकरेंना आहे.
अजित पवारांच्या महत्त्वाकांक्षेला शह देऊन शिंदे गटाचे राजकारण कमकुवत करण्याचीही उद्धव ठाकरे यांची रणनीती असू शकते. एकेकाळी शरद पवार यांच्या विश्वासू नेत्यांपैकी एक असलेले प्रफुल्ल पटेल यांनीही आता ते शक्य नसले तरी अजित पवारच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असे म्हटले आहे. प्रफुल्ल पटेलही अजित पवारांसोबत आहेत.
उद्धव ठाकरे काय संदेश देऊ पाहत आहेत?
अजित पवारांचे कौतुक करताना उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या तिजोरीची चावी त्यांच्याकडे (अजित) असल्याचे नमूद करून त्यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या भल्यासाठी काम करावे, असे सांगितले. उद्धव ठाकरे यांनी अर्थ खात्याचा उल्लेख करणे, हे महत्त्वाचं आहे. कारण याच खात्यावरून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या आमदारांनी बंड केले होते.
वाचा >> फडणवीसांच्या नागपुरात दुहेरी हत्याकांड! व्यापाऱ्यांना गोळ्या घातल्या, जाळलं अन्…
अजित पवार पुरेसा निधी देत नसल्याचा आरोप शिवसेना आमदारांनी केला होता. ते शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे शिंदे समर्थक आमदारांचं म्हणणं होतं. ज्या शिंदे समर्थक आमदारांनी अजित पवारांना अर्थ मंत्रालय मिळवून वेगळा मार्ग पत्करला, त्याच अजित पवारांना त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये अर्थमंत्रीही करण्यात आले. निवडणुकीतही उद्धव ठाकरे हा मुद्दा उपस्थित करतील, हे विधान त्या दिशेने द्योतक आहे.
उद्धव ठाकरे एनडीए मध्ये परतण्यासाठी मार्ग तयार करताहेत?
अजित पवारांच्या मदतीने उद्धव ठाकरे एनडीएमध्ये परतण्याचा मार्ग तयार तर करत नाहीत ना, असा अंदाजही राजकीय वर्तुळात आहे. भाजप राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) 2024 च्या निवडणुकीपूर्वी मित्र पक्षांची संख्या वाढवण्याच्या मिशनमध्ये व्यस्त आहे. भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही यापूर्वी एनडीएचा भाग असलेल्या पक्षांना दरवाजे सर्वांसाठी खुले असल्याचा संदेश दिला आहे. आम्ही कोणालाही मध्येच सोडले नाही. जे निघून गेले त्यांना परत कधी यायचे हे ठरवायचे आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांची घेतलेली भेट असो किंवा त्यांचं केलेलं कौतुक… हे भाजप अध्यक्षांच्या वक्तव्यानंतरच झाले.
बिहारमधील लोक जनशक्ती पक्षाचे दोन्ही गट… पशुपती पारस यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्ष आणि चिराग पासवान यांचा लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) हे दोन्ही गट एनडीएमध्ये आले आहेत. अशा परिस्थितीत बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही राजकीय समीकरण पुन्हा वळण घेणार का? मात्र, सध्या राजकीय विश्लेषक उद्धव ठाकरे एनडीएमध्ये सामील होण्याची शक्यता शून्य असल्याचे सांगत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या मनात काय आहे ते फक्त त्यांनाच माहीत, पण राजकारणात कोण कधी कुणाचा मित्र बनेल आणि कोण कुणाचा शत्रू बनेल, सांगता येत नााही.
ADVERTISEMENT