शरद पवारांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर राष्ट्रवादीत घडतंय काय?

मुंबई तक

02 May 2023 (अपडेटेड: 02 May 2023, 11:37 AM)

शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राष्ट्रवादीत राजीनामा सत्र सुरु झाला आहे. धाराशिवचे राष्ट्रवादीचे सुरेश बिराजदार यांनी दिला जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.

sharad pawar political retirement

sharad pawar political retirement

follow google news

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या ‘लोक माझ्या सांगाती’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात राजकीय निवृत्तीची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला.मात्र शरद पवार त्यांच्या भूमिकेवर ठाम होते.शरद पवार यांच्या या निर्णयानंतर आता राष्ट्रवादीत राजीनामा सत्र सुरु झाले आहे. राष्ट्रवादीच्या राज्यातील अनेक जिल्हाध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्त्यांनी राजीनामा द्यायला सुरूवात केली आहे. (sharad pawar political retirement ncp dharashiv district president resign)

हे वाचलं का?

शरद पवार निवृत्तीवर काय म्हणाले?

“कोठेतरी थांबणे आवश्यक आहे, मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आता पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी पुढील अध्यक्ष कोण याबाबतचा निर्णय घ्यावा. तसंच सध्याची राज्यसभेची टर्म संपल्यानंतर पुन्हा निवडणुकीला उभं राहणार नाही. आता नवी जबाबदारी नको, असं म्हणतं शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाच्या आणि संसदीय राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली होती. मुंबईत ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्र पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना त्यांनी याबाबतची घोषणा केली.

शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राष्ट्रवादीत राजीनामा सत्र सुरु झाला आहे. धाराशिवचे राष्ट्रवादीचे सुरेश बिराजदार यांनी दिला जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. बिराजदार यांनी आपला राजीनामा प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाठवला असल्याचीही माहिती दिली.

शरद पवार यांचा राजीनामा ही माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांसाठी अत्यंत वेदनादायी घटना आहे. त्यामुळे शरद पवार यांच्याशिवाय पक्ष, ही संकल्पना आम्हाला सहन होत नाही. त्यामुळे आज मी राष्ट्रवादीच्या जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा सुरेश बिराजदार यांनी केली. तसेच राजीनामा प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाठवला असल्याचीही माहिती दिली. शेवटी शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.

    follow whatsapp