Political news of Maharashtra: ठाणे: राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis Govt) आज (30 जून) बरोबर एक वर्ष पूर्ण झालं आहे. याच निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी काही मोठे खुलासे केले. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राज्यातील सरकार आता स्थिर झालं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी वर्षपूर्तीच्या निमित्ताने सत्तासंघर्षामधील एक अत्यंत रंजक किस्सा यावेळी सांगितला आहे. त्यावेळी जे धाडस केलं तेव्हा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे ठामपणे पाठिशी उभे राहिले म्हणूनच शिवसेना-भाजपची (Shivsena-BJP) सत्ता महाराष्ट्रात आली. असं शिंदे म्हणाले. (shinde fadnavis government anniversary chief minister eknath shinde very interesting story post of chief minister maharashtra political news)
ADVERTISEMENT
एकनाथ शिंदे यांनी बरोबर 1 वर्षांपूर्वी जे बंड केलं होतं त्यावेळी भाजपमधील दिग्गज नेते हेच म्हणत होते की, शिंदे आणि शिवसेनेचा हा अंतर्गत मामला आहे. त्याचा भाजपशी काही संबंध नाही. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे हे आपल्या आमदारांना वारंवार सांगत होते की, त्यांच्या पाठिशी ‘महाशक्ती’ आहे. यथावकाश ही महाशक्ती म्हणजे भाजपच हे समोर देखील आलं. पण आता आपण मुख्यमंत्री होणार हे माहित देखील नव्हतं. पण अचानक ती जबाबदारी माझ्यावर देण्यात आली असं एकनाथ शिंदे हे आज ठाण्यातील एका कार्यक्रमात बोलत होते.
एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
‘मला वाटलं नव्हतं की, या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मला जबाबदारी पार पाडावी लागेल. पण बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन गेल्यानंतर आणि एवढं मोठं धाडस केल्यानंतर PM नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी मला मुख्यमंत्रिपदाची जबाबादारी दिली. मी त्यांचा मनापासून आभारी आहे.’
हे ही वाचा >> शरद पवारांच्या ‘त्या’ गुगलीवर गेली अजित पवारांची विकेट? फडणवीस ‘सेफ’?
‘भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जे पी नड्डांनी देखील सहकार्य केलं. खास करुन मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून अभिनंदन करेन. कारण या एकनाथ शिंदेने जे धाडस केलं त्या धाडसाच्या पाठीमागे देवेंद्र फडणवीस आणि त्यांची टीम उभी राहिली, म्हणून हा प्रयोग यशस्वी झाला.’ असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी त्यांना मुख्यमंत्रिपद नेमकं कसं मिळालं हेच सांगून टाकलं.
महाराष्ट्रात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार
दरम्यान, एकीकडे राज्यातील सरकारला वर्ष पूर्ण होत असताना दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा देखील जोरदार सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह या तिन्ही नेत्यांची बैठक जवळपास तीन ते चार तास चालली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. त्याचबरोबर शिंदे-फडणवीस आणि शाहांमध्ये किती मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करायचा? त्यांना कोणती खाती द्यायची? सध्या एका मंत्र्याकडे एकापेक्षा अधिक जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी आहे. त्यामुळे किती जणांना पालकमंत्री करायचं? आणि कुणाला कोणती खाती द्यायची? याबद्दल चर्चा झाल्याची माहिती आहे.
हे ही वाचा >> शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच! देवेंद्र फडणवीसांनी सांगितला मुहूर्त
मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांनी गेल्या महिनाभरापासून जास्तच जोर धरलाय. याची सुरूवात शिंदेंच्या शिवसेनेतील चार मंत्र्यांना डच्चू दिला जाणार, या वृत्ताने झाली होती. यात गुलाबराव पाटील, तानाजी सावंत, दादा भूसे, अब्दुल सत्तार यांची नावे प्रामुख्याने चर्चेत राहिली. आता देवेंद्र फडणवीस यांनी जुलै महिन्यातच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत मंत्रिमंडळातून कुणाला डच्चू मिळणार की नाही, हेही स्पष्ट होईल.
ADVERTISEMENT