Nilesh Rane यांच्या गाडीवर दगडफेक; भास्कर जाधवांच्या कार्यालयासमोर राडा

मुंबई तक

17 Feb 2024 (अपडेटेड: 17 Feb 2024, 12:50 AM)

Stone Pelting on Nilesh Rane car: गुहागर येथे जाहीर सभेसाठी जात असताना निलेश राणे यांच्या ताफ्यावर जोरदार दगडफेक करण्यात आली. त्यानंतर भास्कर जाधव आणि राणेंचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले.

निलेश राणेंच्या गाडीवर दगडफेक

निलेश राणेंच्या गाडीवर दगडफेक

follow google news

बातम्या हायलाइट

point

निलेश राणेंच्या गाडीवर दगडफेक

point

गुहागरमध्ये तुफान राडा

point

राणे-जाधव समर्थक एकमेकांना भिडले

Nilesh Rane Guhagar: गोकूळ कांबळे, चिपळूण: माजी खासदार निलेश राणे यांच्या गाडीवर चिपळुणात आमदार भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे चिपळुणात जोरदार राडा झाला असून, राणे आणि जाधव यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले आहेत. या राड्यामुळे जमलेला जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचा मारा केला आहे. (stone pelting on bjp leader nilesh rane car big commotion in front of shiv sena ubt mla bhaskar jadhavs office)

हे वाचलं का?

आमदार भास्कर जाधव यांनी अलिकडेच उद्धव ठाकरे यांच्या कणकवली दौऱ्याप्रसंगी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे संतापलेले माजी खासदार निलेश राणे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि भास्कर जाधव यांच्यावर सणसणीत टीका केली. 'त्यांचा समाचार घेण्यासाठी आपण त्यांच्या मतदार संघातच सभा घेऊ आणि तेथेच बोलू', असे त्यांनी जाहीर केले. त्यानुसार आज शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता त्यांची शृंगारतळी (ता. गुहागर) येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.

गुहागरमध्ये नेमकं काय घडलं?

गेल्या दोन-तीन दिवसात आमदार भास्कर जाधव यांनी आपल्याला धमक्या येत असल्याचे विधान केले आहे. त्यामुळे संतापलेल्या जाधव समर्थक कार्यकर्त्यांनी बुधवारी चिपळूण पोलिसांना निवेदन देत निलेश राणे यांची सभा रद्द करण्याची मागणी केली होती.]

हे ही वाचा>> Maratha Reservation : 'जरांगेंनी अंथरुणावर पडून राहून नाटके करावीत'

शुक्रवारी दुपारी निलेश राणे गुहागरकडे जाण्यासाठी निघाले होते. साडेचार ते पाच वाजण्याच्या दरम्यान राणे यांच्या गाडीसह सर्व ताफा आमदार जाधव यांच्या चिपळुणातील कार्यालयासमोरुन जात असताना अचानक त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. 

यानंतर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. साधारण या पद्धतीचे पडसाद उमटण्याची कल्पना असल्याने पोलीस खात्यानेही तयारी केली असल्याचे दिसत होते. त्यामुळे मोठा जमाव जमताच पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. या दगडफेकीमध्ये झालेल्या धावपळीत सात ते आठ कार्यकर्ते जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

    follow whatsapp