Maharashtra politics news today: मुंबई: पाटणातील (Patna) विरोधकांच्या बैठकीला गेलेल्या शिवसेना (UBT) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आपला परिवार बचाव करण्यासाठी गेल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली होती. ज्याला आज (24 जून) उद्धव ठाकरेंनी तात्काळ प्रत्युत्तर दिलं. यावेळी ठाकरेंनी फडणवीसांना आव्हानच दिलं की, ‘आमच्या कुटुंबावर बोलाल तर तुम्हाला देखील परिवार आहे… परिवाराचे सुद्धा व्हॉट्सअॅप बाहेर येत आहेत.’ठाकरेंनी दिलेलं हे प्रत्युत्तर फडणवीसांच्या बरंच जिव्हारी लागलं. ज्यावर त्यांनी तात्काळ ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया देत मोठं आव्हान दिलं. (uddhav thackeray criticism deputy chief minister devendra fadnavis shiv ena ubt and bjp whatsapp chat maharashtra politics news today)
ADVERTISEMENT
मुंबईतील शाखाप्रमुखांच्या बैठकीत बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. याशिवाय देवेंद्र फडणवीसांना देखील कुटुंबावरुन सूचक इशारा दिला. ज्यानंतर आता देवेंद्र फडणवीसांनी देखील आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन उद्धव ठाकरेंना थेट आव्हान दिलं आहे. तसंच मुंबई महापालिकेच्या कथित घोटाळ्याप्रकरणीही निशाणा साधला.
हे ही वाचा >> ‘देवेंद्रजी तुमच्या परिवाराचेही WhatsApp चॅट…’, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांनी डिवचलं
‘घरात घुसलोच तर तोंड दाखवायला जागा उरणार नाही’
मी, माझे कुटुंब आणि माझा संपूर्ण भाजपा परिवार एक खुली किताब आहे उद्धव ठाकरे !
ज्या ‘व्हॉटसअॅप चॅट’ बाबत तुम्ही बोलताय, ते आरोपपत्राचे भाग आहेत. न्यायालयाच्या रेकॉर्डवर आहेत आणि जाणीवपूर्वक टाकले आहेत, कारण, लपविण्यासारखे आमच्याकडे काहीच नाही. पण, मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या माणसाला इतकी ‘बालबुद्धी’ असावी, याचे मात्र आश्चर्य वाटते. त्यामुळे त्याची फार चिंता तुम्ही करु नका.
चिंता करायचीच असेल आणि पुस्तक काढायचेच असेल तर यावर काढा
➡️ सामान्य शिवसैनिकांना वार्यावर सोडून मुख्यमंत्रीपद, मंत्रिपद घरात कसे ठेवले यावर…
➡️ मुंबईला कुणी लुटले यावर…
➡️ मृतांच्या टाळूवरील लोणी कुणी खाल्ले यावर…
➡️ मराठी माणसाला कुणी ओरबाडले यावर…
➡️ 100 कोटींच्या वसुलीचे टार्गेट कसे दिले जाते यावर…
तुमचे हिंदूत्त्व आणि तुमचे कारनामे आता एकेक करीत जनतेत उघड होतच आहेत आणि होतच राहणार
आम्ही कुणाच्या घरात घुसत नाही. पण, घुसलोच तर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही.
तुमचे ‘नड्डे’ केव्हा सैल होतील, हे समजणार देखील नाही. (नड्डे म्हणजे घसा)
तोवर तुमची हास्यजत्रा चालू द्या…
बघूच आता शवासन कुणाला करावे लागते ते…
हे ही वाचा >> ‘मी मुद्दाम मेहबुबा मुफ्तीच्या बाजूला बसलो..’, उद्धव ठाकरेंनी सगळंच सांगून टाकलं!
असं ट्वीट देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्यामुळे आता त्यांच्या या ट्विटला उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या पक्षाकडून कशा पद्धतीने उत्तर मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT