देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांवर हल्लाबोल करताना दिसत आहेत. भ्रष्टाचारच्या मुद्द्यावरून विरोधकांना मोदी घेरताना दिसत असून, यावरून शिवसेनेने (UBT) पंतप्रधानांनावर पलटवार केला आहे.
ADVERTISEMENT
‘चोर बाजाराचे खरे मालक’, असा अग्रलेख सामनात प्रसिद्ध झाला आहे. यातून ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस आणि मोदींना घेरलं आहे.
वाचा >> Chhagan Bhujbal : “सुप्रियांचं नाव येताच प्रफुल पटेल म्हणाले मी राजीनामा देतो”
“काँग्रेस म्हणजे लूट की दुकान झूठ का बाजार असा घणाघात पंतप्रधान मोदींनी राजस्थानमध्ये केला. त्यांचे हे नेहमीचेच आहे. पंतप्रधानांना स्व:पक्षाविषयी बोलायचं होतं, पण चुकून त्यांच्या तोंडून काँग्रेसचे नाव आले. काँग्रेस किंवा इतर राजकीय पक्ष लूट की दुकान असेल तर तो लुटीचा माल घेऊन भाजप आपले घर का भरत आहे?”, असा सवाल शिवसेनेने (UBT) केला आहे.
फडणवीसांवर ठाकरेंचा वार
“भाजप हाच राष्ट्रीय चोर बाजार झाला आहे. चोरीचा, लुटीचा माल विकत घेणारा पक्ष म्हणून बदनाम झाला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री फडणवीस हे मोदींचीच थुंकी झेलून म्हणतात, ‘मी पुन्हा येईन असे म्हणालो होतो. येताना दोघांना घेऊन आलो.’ हे दोघे म्हणजे एकनाथ शिंदे-अजित पवार”, अशा शब्दात ठाकरेंच्या सेनेने देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली आहे.
वाचा >> ‘भाजप-शिवसेना युती तुटण्यामागे शरद पवारांची डील’; भुजबळांनी टाकला नवा ‘बॉम्ब’
“काँग्रेस पक्ष भ्रष्टाचारी पण ज्यांच्यामुळे काँग्रेस भ्रष्टाचारी झाली ते सर्व भाजपमध्ये जाऊन शिष्टाचारी झालेत. भाजपला त्यांची लूट की दुकाने चालवण्यासाठी इतर पक्षातील चोरांची गरज आहे काय?”, असा सवाल ठाकरेंनी केला आहे.
मोदी दुसऱ्यांना चोर म्हणताहेत हे आश्चर्य
“मोदी हे दुतोंडी असल्यासारखं वागतात, बोलतात. आपल्या लोकांचा भ्रष्टाचार झाकून ठेवायचा आणि राजकीय विरोधकांना भ्रष्टाचारी म्हणून बदनाम करायचे हेच त्यांचे धोरण आहे. आताचा भाजप हा 70-75 टक्के लुटीचा माल भरलेला पक्ष आहे आणि मोदी दुसऱ्यांना चोर म्हणत आहेत हे आश्चर्य आहे”, असा टोला सेनेने लागवला आहे.
ADVERTISEMENT