Maharashtra : ‘राज ठाकरेंना फोन करणार, पण…’, उद्धव ठाकरे खासगीत काय बोलले?

भागवत हिरेकर

07 Aug 2023 (अपडेटेड: 07 Aug 2023, 02:46 PM)

उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना फोन करण्याबद्दल विधान केले. राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार, या चर्चेने पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. त्यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उत्तर दिले आहे.

uddhav Thackeray Raj thackeray may be come together in future.

uddhav Thackeray Raj thackeray may be come together in future.

follow google news

Uddhav Thackeray-Raj Thackeray : राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार, या चर्चेने पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. याला कारण ठरलंय उद्धव ठाकरेंचं एक विधान. पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, राज ठाकरेंना फोन उचलायला तयार असतील, फोन करणार.’ ठाकरेंच्या या विधानावर मनसेकडून तिखट प्रतिक्रिया आलीये.

हे वाचलं का?

पत्रकारांशी अनपौचारिक बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “मी राज ठाकरेंना फोन करण्यास तयार आहे. वेळ आल्यास बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासंदर्भात राज ठाकरेंशी बोलणार. राज फोन उचलायला तयार असतील, तर फोन करणार.”

उद्धव ठाकरेंच्या विधानावर मनसेची भूमिका काय?

राज ठाकरेंनी फोन उचलला, तर करणार या उद्धव ठाकरेंच्या विधावर संदीप देशपांडे यांनी टीव्ही9 ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय की, “फोन उचलायला तयार असतील, तर फोन करणार याचा अर्थच मला कळला नाही. जे लोक स्वतः इतरांचे फोन उचलत नाहीत, त्यांच्याच मनात ही भीती असू शकते. जर मला वाटलं की फोन करावा, तर मी हा विचार करणार नाही की उचलेल की नाही.”

वाचा >> ‘चक्की पिसिंग.. पिसिंग..’ आता देवेंद्र फडणवीसांना संभाजीराजेंनीही डिवचलं!

श्रीकांत ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंची भाषणं रेकॉर्ड केलेली आहेत. ती उद्धव ठाकरेंना हवी आहेत. त्यामुळे त्यांना (उद्धव ठाकरे) खात्री हवीये की, फोन केल्यानंतर राज ठाकरेंनी तो उचलावा. त्यावर संदीप देशपांडे म्हणाले की, “असं डोक्यातच का आलं. असं कुणाच्या मनात येऊ शकतं, जे स्वतः लोकांचे फोन उचलत नाही, त्यांच्याच मनात या गोष्टी येऊ शकतात. मी याचा उचलला नव्हता, तर हा माझा उचलेल का?”, असा उलट सवाल देशपांडेंनी उपस्थित केला.

‘राज ठाकरे रात्रीही फोन उचलतात’

“मी राज ठाकरेंना ओळखतो. माझ्यासारख्या लहान माणसाचाही ते फोन उचलतात. आमच्या अडीअडचणी असतील, तर समजून घेतात. आम्हाला मार्गदर्शन करतात. आम्ही रात्री कॉल केला तरी ते उचलतात. त्यामुळे हा प्रश्नच कसा डोक्यात येऊ शकतो, असा प्रश्न मला पडलाय”, असं संदीप देशपांडे म्हणाले.

वाचा >> पती-पत्नी और वो! Boss च्या पत्नीला कळलं आणि जीवच गेला; 5 जणांनी काय केलं?

“अभिजीत पानसेंनी अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव दिला नव्हता. ज्यावेळेला प्रस्ताव द्यायचा होता, 2014 आणि 2017 ला. तेव्हा आम्ही दिला आणि आजही आम्ही सांगतो की, आम्ही दिला होता. त्यावेळी यांनी फोन उचलले नाही. त्यामुळे आता काही विषयच उरत नाही.”

‘…तेव्हा राज ठाकरेंनी फोन केला होता’

“स्वतःचा भाऊ फोन उचलणार की नाही, याची ग्यारंटी पाहिजे का? हे कुठलं राजकारण? मला हे खूप विचित्र वाटतं की, तुम्ही फोन उचलणार असाल, तर मी फोन करतो. हेही पत्रकारांच्या माध्यमातून. त्यापेक्षा तुम्ही फोन उचला आणि करून बघा. 2017 ला जेव्हा फोन करायचा होता, तेव्हा राज ठाकरेंनी कुणालाही मध्ये घेतलं नाही. त्यांना वाटलं. त्यांनी फोन केला होता”, संदीप देशपांडे म्हणाले.

वाचा >> ‘हीच जागा योग्य होती, पण…’; अमित शाहांचं विधान ऐकून अजित पवारांनी जोडले हात

“बाळासाहेबांचं स्मारक चांगलं व्हावं म्हणून तुम्हाला ती भाषणं पाहिजे. मग बाळासाहेबांच्या भाषणासाठी तुमचा इगो का मध्ये येतोय. फोन उचलणार असशील, तरच मी फोन करतो; हा इगो कशाला? बाळासाहेबांची भाषणं मोठी की तुमचा इगो मोठा? तुम्हाला ग्यारंटी पाहिजे, याचा अर्थ तुमचा इगो मोठा आहे”, असा टोला संदीप देशपांडेंनी लगावला.

    follow whatsapp