Maharashtra Political News : मुंबई महानगरपालिकेत उद्धव ठाकरेंच्या (udhhav thackeray) नेतृत्वाखाली साडेबारा हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला होता.या आरोपाला आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. स्वत:च चोर चोर ओरडलं की लोक तुम्हाला सोडून दुसऱ्याकडे बघतात, त्यामुळे या चोराच्या उलट्या बोंबा असल्याचा पलटवार ठाकरेंनी फडणवीसांवर केला आहे.(udhhav thackeray reply devendra fadnavis cm eknath shide bmc scam)
ADVERTISEMENT
अडीच वर्षाच्या काळामध्ये 92 हजार कोटीच्या ठेवी राहिल्या कशा? सगळे पक्ष तेव्हा लोकप्रतिनिधी होते. महापालिकेचा हिशेब एपिडेमिक अॅक्ट होता, डिझास्टर अॅक्ट होता, त्यावेळेस विदाऊट टेंडर अशी कोणतीच गोष्ट झाली नाही आहे, असे देखील उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच कॅगच्या अहवालात तसं काहीच नाही आहे. कुठेही भ्रष्टाचार झालेला नाही, चोराच्या उलट्या बोंबा आहेत, स्वत:च चोर चोर ओरडलं की लोक तुम्हाला सोडून दुसऱ्याकडे बघतात, असा टोला देखील उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीसांना लगावला आहे. तसेच पंतप्रधान मदत नीधीवर जाब विचारणार कोणीच नव्हता, पण महापालिकेच्या खर्चावर सगळ्यांचे लक्ष होते,अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली.
हे ही वाचा : CM शिंदेंनी डिवचलं, ‘तुमची मर्सिडीज रिक्षावाल्यांने खड्ड्यात घातली, नादी लागू नका…’
काढा ना बाहेर,कोणता घोटाळा झाला आहे, मग आज 1 वर्ष होऊन सुद्धा शांत का बसला आहात, असा सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच उलट्या चोराच्या बोंबा अशी त्यांची स्थिती झाली आहे. स्वत:च चोरी करतायत, दिवसा ढवळ्या चोरी करत आहेत. यासाठीच आम्ही येत्या 1 जूलैला महापालिकेवर विराट मोर्टा काढणार आहोत. या मोर्चात महाविकास आघाडी देखील सामील होत असेल तरी काही हरकत नाही, असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
गद्दार किती झाले तरी गद्दारच राहणार, किती काही म्हटलं तरी यांच्या कपाळावरचा गद्दारीचा शिक्का काही पुसला जाणार नाही, अशी टीका देखील ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केली आहे.तसेच मुंबई महापालिकेची 92 हजार कोटींची ठेवी आहे, हा मुंबईकरांच्या कष्टाचा पैसा आहे. हा पैसा लुटुन मुंबईची तिजोरी रिकामी करायची,आणि मुंबईच्या हाती भिकेचा कटोरा देऊन दिल्ली दरबारी उभी करायची, असा यांचा मनसुबा असल्याचे देखील उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
‘आजच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याठिकाणी मुंबईच्या महानगरपालिकेत कॅगच्या अहवालात आलं आहे की, साडेबारा हजार कोटी रुपयांचा घोटाळा त्याठिकाणी शिवसेनेच्या, उद्धवजींच्या नेतृत्वात झाला. आजच एकनाथ शिंदे यांनी एसआयटी तयार केली आहे. त्या एसआयटीच्या माध्यमातून जो जनतेचा पैसा तुम्ही तुमच्या तिजोरीत नेलाय त्यातील पै-पै परत आणण्याचं काम आमचं सरकार निश्चितपणे करेल.’ असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.
ADVERTISEMENT