Madha Lok Sabha election 2024, Uttamrao Jankar : धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी सोलापूर जिल्ह्यात लक्ष घातलं आहे. उत्तमराव जानकर आणि माझं ठरलं असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितल्यानंतर फडणवीसांनी तातडीने जानकर यांना नागपूरला बोलावून घेतलं. दोघांमध्ये एक तास बैठक झाली. त्याबद्दल जानकर यांनी माहिती दिली.
ADVERTISEMENT
देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर उत्तमराव जानकर म्हणाले की, "निश्चितपणाने माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा विषय होता. त्या मतदारसंघाच्या संदर्भाने आम्ही फडणवीसांना भेटायला नागपूरमध्ये आलेलो आहोत. फडणवीस यांच्यासोबत आमची १ तास बैठक झाली."
बैठक घेऊन निर्णय जाहीर करू
"या बैठकीत आमचे काय मुद्दे होते. अडचणी होत्या. त्यावर सविस्तरपणाने चर्चा झाली. त्यामध्ये सकारात्मक चर्चा याठिकाणी झालेली आहे. आजच आम्ही काही प्रमुख नेते मंडळी संध्याकाळी ७ वाजता बसून बैठकीत निर्णय घेऊ."
हेही वाचा >> श्रीकांत शिंदेंना घेरण्याची तयारी? संजय राऊतांचे थेट मोदींना पत्र
जानकर पुढे म्हणाले की, "ज्या ज्या गोष्टीची याठिकाणी चर्चा झाली. विश्लेषण झाले, ते आमच्या कार्यकर्त्यांसमोर मांडून बैठकीत सकारात्मक निर्णय घेऊ."
राम सातपुतेंना तिकीट दिल्यामुळे तुमची नाराजी होती, तुमची नाराजी दूर झाली का? त्यावर उत्तमराव जानकर म्हणाले, "नाही. आता तिकिटाचा विषय संपून गेला. परंतू इतर ज्या काही विषय, घडामोडी होत्या. गेल्या दहा वर्षामधील अनेक अडचणी होत्या. अनेक विषय होते. आमच्या बऱ्याचशा तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या ज्या ज्या अडचणी होत्या. त्या देवेंद्रजींसमोर मांडल्या आहेत."
हेही वाचा >> "तुझं पार्सल माघारी बीडला...", राम सातपुतेंना धैर्यशील मोहिते पाटलांचा थेट इशारा
महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार का? त्यावर जानकर म्हणाले, "नाही, आम्ही आज बैठक घेत आहोत. सोलापूर, माळशिरस येथील बैठकीत आमचा निर्णय होईल."
ADVERTISEMENT