Vallabh Benke Passed Away : जुन्नर: पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष वल्लभशेठ दत्तात्रय बेनके (vallabh benke) यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. बऱ्याच महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. रविवारी रात्री चाकण येथील खाजगी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत माळवली आहे. ते 74 वर्षाचे होते. त्यांच्या या निधनाने राजकीय वर्तुळात शोक व्यक्त होत आहे. (vallabh benke passed away junnar assembly constituency pune news sharad pawar atul benke)
ADVERTISEMENT
दरम्यान बेनके यांचा अंत्यविधी सोमवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता त्यांच्या गावी हिवरे बुद्रुक(ता.जुन्नर जिल्हा, पुणे) या ठिकाणी होईल अशी माहिती जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार यांनी आहे दिली.त्यापूर्वी सोमवारी सकाळी 9 ते 12 या वेळात नारायणगाव येथील निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
हे ही वाचा : Eknath Shinde : 'उद्धव ठाकरेंना हाजमोला पाठवावा लागेल'; शिंदेंचा टोमणा
माजी आमदार वल्लभ शेठ बेनके यांचा जन्म 23 जून 1950 रोजी हिवरे बुद्रुक या गावी झाला होता.शेती हा त्यांचा मूळ व्यवसाय होता.हे 1985 साली प्रथम जुन्नर विधानसभेवर निवडून आले होते, त्यानंतर 1990 साली दुसऱ्यांदा ते आमदार झाले. त्यानंतर लागोपाठ दोन पंचवार्षिक निवडणुकांमध्ये माजी आमदार बाळासाहेब दांगट यांनी त्यांचा सलग दोन वेळा पराभव केला. मात्र 2004 व 2009 साली पुन्हा आमदार वल्लभ बेनके जुन्नर विधानसभेवर निवडून आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे ते खंदे समर्थक होते. परखड वक्तव्य व प्रशासनावर असलेली पकड यामुळे वल्लभ शेठ बेनके यांचा दरारा संपूर्ण पुणे जिल्ह्यात होता. त्यांच्या जाण्याने निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व आमदार अतुल बेनके यांच्या कुटुंबावरमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.बेनके यांच्या मागे पत्नी, 3 मुले सुना व नातवंडे असा परिवार आहे.
हे ही वाचा : प्रकाश आंबेडकर 'मविआ'ला देणार धक्का? भुजबळांना दिली ऑफर
ADVERTISEMENT