Varun Sardesai Bandra East Assembly Election Results Live Updates: वांद्रे पूर्वमधून शिवसेना ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई आघाडीवर

मुंबई तक

23 Nov 2024 (अपडेटेड: 23 Nov 2024, 09:26 AM)

Varun Sardesai Bandra East assembly election 2024 results live updates: वरुण सरदेसाई वांद्रे पूर्व विधानसभा निवडणूक निकाल 2024: झिशान सिद्दीकींसाठी अटीतटीची लढाई, पाहा निकालाचे लाइव्ह अपडेट

Varun Sardesai with the party it is related with live: मातोश्रीच्या अंगणात कोणाचा विजय?

Varun Sardesai Mumbai Tak Interview

follow google news

Varun Sardesai Bandra East Assembly Election Results Live Updates: मुंबई: वरूण सरदेसाई वांद्रे पूर्व विधानसभा निवडणूक 2024 चे निकाल लाइव्ह अपडेट: 'मातोश्री'च्या अंगणात नेमकं कोण विजय मिळवणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे डोळे लागून राहिले आहेत. कारण की, येथील निवडणूक ही अत्यंत रंजक झाली आहे. कारण या मतदारसंघात शिवसेना (UBT) कडून पहिल्यांदाच वरूण सरदेसाई हे निवडणूक लढवत आहेत. 

उद्धव ठाकरे यांच्यासाठी वांद्रे पूर्व हा मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण येथे त्यांचं 'मातोश्री' हे निवासस्थान आहे. त्यामुळे या मतदारसंघात आपलाच आमदार असावा यासाठी ठाकरेंनी जोरदार तयारी केली आहे.

हे ही वाचा>> Maharashtra Assembly Election Results 2024 : Maharashtra Election 2024: ठाकरे-पवारांची मोठी खेळी, निकालाआधीच उमेदवारांना थेट...

आदित्य ठाकरेंसोबत आणि एक तरुण उमेदवार म्हणून ठाकरेंनी वरूण सरदेसाई यांना पसंती दिली आहे. पण वरूण सरदेसाई यांच्यासाठी देखील लढाई ही अत्यंत महत्त्वाची आणि अटीतटीची आहे. कारण झिशान सिद्दीकी हे येथील विद्यमान आमदार आहेत. अशावेळी विद्यमान आमदाराविरोधात सरदेसाईंना चोख रणनिती आखावी लागणार आहे.

हे ही वाचा>> Maharashtra Assembly Election Results 2024 : Maharashtra Election 2024: राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण? निकालाआधीच MVA आणि महायुतीच्या नेत्यांची नावं समोर

जाणून घ्या या मतदारसंघात नेमकं काय घडतंय, क्षणाक्षणाचे अपडेट आम्ही आपल्याला देणार आहोत.

अशाच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे संपूर्ण निकाल हे आपल्या mumbaitak.in या वेबसाइटवर पाहता येतील.

 

 

लाइव्हब्लॉग बंद

  • 08:44 AM • 23 Nov 2024
    Mumbai Assembly Election Results Live: मुंबईत कोणते उमेदवार आघाडीवर अन् कोण पिछाडीवर?

    मुंबईच्या वरळी मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे आघाडीवर आहेत.

    वांद्रे पूर्व मतदारसंघात झिशान सिद्दीकी आघाडीवर आहेत.

    कुलाबा मतदारसंघातून भाजपचे राहुल नार्वेकर आघाडीवर आहेत.

    वांद्रे पश्चिम मतदारसंघातून आशिष शेलार पिछा़डीवर आहेत.

    अमित ठाकरे माहीममधून आघाडीवर आहेत.

    नालासोपारा इथे क्षितिज ठाकूर आघाडीवर आहेत. 

    बोरीवली पश्चिममधून भाजपचे संजय उपाध्यय यांनी निकालपूर्वीच विजयाचा झेंडा फडकवाल आहे. आज सायंकाळी साडेपाच वाजता महाजल्लोष विजय यात्रा सुर करणार असल्याचं उपाध्यय यांच्या बॅनरमध्ये नमूद करण्यात आलंय. 

    मुंब्रा कळवा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड आघाडीवर आहेत.

    वडाळ्यातून भाजपचे काळीदास कोळमकर आघाडीवर आहेत. 

    ठाणे पाचपाखाडी मतदारसंघातून एकनाथ शिंदे आघाडीवर आहेत.

    ठाणे शहरमधून संजय केळकर आघाडीवर आहेत.

    माजीवाडा मतदारसंघातून प्रताप सरनाईक आघाडीवर आहेत.

  • 08:09 AM • 23 Nov 2024
    Varun Sardesai Bandra East Assembly Election Results lIVE : वांद्रे पूर्वमधून झिशान सिद्दीकी आघाडीवर

    वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई यांच्याविरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे झिशान सिद्दीकी आणि मनसेच्या तृप्ती सावंत निवडणूक लढवत आहेत. पहिल्या फेरीत झिशान सिद्दीकी आघाडीवर असून पोस्टल मतमोजणी सुरु आहे.
     

  • 07:29 AM • 23 Nov 2024
    Varun Sardesai Bandra East Assembly Election Results lIVE: वांद्रे पूर्व मतदारसंघात वरुण सरदेसाई मारणार बाजी?


    मुंबईच्या वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून वरुण सरदेसाई विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सरदेसाईंच्या विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून झिशान सिद्दीकी आणि मनसेकडून तृप्ती सावंत निवडणूक लढवत आहेत. ठाकरे गटाकडून वरुण सरदेसाई हे पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. दुसरीकडे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार झिशान सिद्दीकी यांचं पारड जड असल्याचं म्हटलं जातंय. अशातच या मतदारसंघात सरदेसाई सिद्दीकींचा पराभव करतात का? हे पाहावं लागणार आहे.
     

follow whatsapp