Vasant More : तारीख ठरली! वसंत मोरे 'या' दिवशी ठाकरे गटात प्रवेश करणार, विधानसभेचे तिकीट मिळणार?

मुंबई तक

• 08:09 PM • 04 Jul 2024

Vasant more meet udhhav thackeray : ''मी वंचितमध्ये गेलो होतो मात्र मतदारांनी मला स्वीकारलं नाही. जो मतांचा टक्का होता, पुण्यामध्ये तो मिळाला नाही. त्यामुळे मी 9 तारखेला ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती वसंत मोरे यांनी दिली आहे. तसेच मी शिवसेनेचा शाखा प्रमुख होतो, माझा परतीचा प्रवास शिवसेनेकडे होतो. शिवसेनेकडून महानगरपालिकेत कडव आव्हान देऊ, असे देखील वसंत मोरे यांनी सांगितले.

vasant more meet udhhav thackeray in matoshree bunglow on this date join shiv sena ubt

वसंत मोरे (Vasant more) यांनी आज मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (udhhav thackeray) यांची भेट घेतली होती.

follow google news

Vasant more meet udhhav thackeray : मनसेला सोडचिठ्ठी देऊन लोकसभा निवडणूकीत प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीत प्रवेश केलेल्या  पुण्यातील माजी नगरसेवक वसंत मोरे (Vasant more)  यांनी आज मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (udhhav thackeray) यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर वसंत मोरे पक्षप्रवेश करतील अशी चर्चा होती. मात्र त्यांचा पक्षप्रवेश टळला आहे. त्यामुळे आता ते येत्या 9 जूनला पक्षप्रवेश करतील,अशी सुत्रांकडून माहिती मिळत आहे. (vasant more meet udhhav thackeray in matoshree bunglow on this date join shiv sena ubt) 

हे वाचलं का?

उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर वसंत मोरे यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. या भेटीत वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी देण्यामागचं कारण सांगितलं. ''मी वंचितमध्ये गेलो होतो मात्र मतदारांनी मला स्वीकारलं नाही. जो मतांचा टक्का होता, पुण्यामध्ये तो मिळाला नाही. त्यामुळे मी 9 तारखेला ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती वसंत मोरे यांनी दिली आहे. तसेच मी शिवसेनेचा शाखा प्रमुख होतो, माझा परतीचा प्रवास शिवसेनेकडे होतो. शिवसेनेकडून महानगरपालिकेत कडव आव्हान देऊ, असे देखील वसंत मोरे यांनी सांगितले. 

हे ही वाचा : क्रिकेटप्रेमींच्या गर्दीत अडकला टीम इंडियाचा विजयरथ, कधी निघणार परेड?

 विधानसभा निवडणुकीबाबत विचारले असता, वसंत मोरे म्हणाले की, माझ्याजवळ दोन पर्याय आहेत. एक खडकवासला आणि दुसरं हडपसर, या दोन्ही जागांवर निवडणूक लढू शकतो, असे वसंत मोरेंनी सांगितले. 

लोकसभा निवडणूक ठाकरेंच्या शिवसेनेकडून लढण्याची तयारी वसंत मोरे यांनी केली होती. यासाठी त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यासह अनेक नेत्यांची भेट घेतली होती. मात्र महाविकास आघाडीत पुण्याची जागा काँग्रेसच्या वाट्याला गेल्याने वसंत मोरे यांना उमेदवारी मिळू शकली नव्हती. त्यामुळे अखेरच्या क्षणी प्रकाश आंबेडकरांच्या वंचित पक्षात प्रवेश करून लोकसभा लढवली होती. मात्र या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आता विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन वसंत मोरे ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. 

    follow whatsapp