INDIA Meeting : ‘इंडिया’च्या बैठकीत रंगाचा बेरंग का झाला?, कपिल सिब्बलांच्या एन्ट्रीनंतर काय घडलं?

मुंबई तक

01 Sep 2023 (अपडेटेड: 01 Sep 2023, 08:15 AM)

INDIA Meeting : मुंबईत गेल्या दिवसांपासून इंडियाची बैठक सुरु आहे. या बैठकीत कपिल सिब्बल दिसताच काँग्रेसचे नेते वेणुगोपाल यांनी थेट वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार केली. त्या तक्रारीवरून अखिलेश यादवांसह राहुल गांधींनी नंतर त्यांची समजूत काढली.

Kapil Sibbal and akhilesh yadav india meeting

Kapil Sibbal and akhilesh yadav india meeting

follow google news

INDIA Meeting : मुंबईतील विरोधी पक्षांच्या इंडियाच्या बैठकीचा आज दुसरा दिवस आहे. राज्यसभेचे खासदार कपिल सिब्बल (MP Kapil Sibal) यांनी शुक्रवारी या बैठकीत प्रवेश केल्याने काँग्रेस नेत्यांमधून नाराजी व्यक्त केली आहे. विरोधकाच्या इंडियाच्या बैठकीसाठी कपिल सिब्बलांना खरं तर त्यांना अधिकृत निमंत्रण नव्हते. तरीही त्यांची उपस्थित बैठकीत दिसल्यानंतर मात्र काँग्रेस (Congress) नेत्यांमधून अस्वस्थता व्यक्त केली जात आहे. इंडियाच्या लोगाच्या अनावरणापासून ते पुढील रणनीती काय असणार हे आता पुढील काही दिवसातच स्पष्ट होणार आहे. (Venugopal Congress expressed his displeasure former Congress minister Kapil Sibal appeared India meeting)

हे वाचलं का?

वेणुगोपालांचा राग आणि समजूत

मुंबईतील इंडियाची बैठक होण्याआधीपासूनच चर्चेत आली आहे. त्यामुळे आता सुरु झाल्यानंतर प्रत्येक घडामोडीकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यातच काँग्रेसचे नेते के. सी. वेणुगोपाल यांनी या बैठकीच्या नेत्यांबरोबर फोटो काढत असतानाच त्यांनी कपिल सिब्बल यांच्या उपस्थितीमुळे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली. त्यानंर के. सी. वेणुगोपल यांना फारुख अब्दुल्ला आणि अखिलेश यादव यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना राहुल गांधी यांनी समजवणयाचा प्रयत्न केला. त्यानंतर कपिल सिब्बल यांना घेऊन फोटो सेशनचा कार्यक्रम पार पडला.

हे ही वाचा >> INDIA Alliance : वाद टाळण्यासाठी फॉर्म्युला ठरला; वाचा मुंबई बैठकीची Inside Story

आधी काँग्रेसचा नेता होता, मात्र आता…

कांग्रेसला सोडचिठ्ठी देऊन कपिल सिब्बल यांनी मे 2022 मध्ये समाजवादी पक्षात प्रवेश केला होता. सिब्बल यांना काँग्रेसचा बड्या नेत्यामध्ये गणले जात होते. युपीएच्या काळात कपिल सिब्बल हे केंद्रीय कायदा मंत्री ते मानव संसाधन मंत्री म्हणून राहिले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून सिब्बल यांनी काँग्रेस नेतृत्ववर नाराजी व्यक्त केली होती. कपिल सिब्बल यांना काँग्रेसच्या त्या पळीतील नेत्यांमध्ये गणले जाते ज्यांना काँग्रेसने भरभरुन दिले आहे. सिब्बल हे पंजाबी ब्राह्मण समजातून आले आहेत. मात्र दिल्लीच्या राजकारणात त्यांचे वेगळे वजन असल्याचे सांगितले जाते. राज्यसभेच्या उमेदवारीनंतर त्यांनी सिब्बल यांनी सांगितले की, मी या आधी काँग्रेसचा नेता होतो, मात्र आता नाही.

इंडियाचे संयुक्त निवेदन

इंडियाच्या बैठकीमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीकोऑर्डिनेशन कमिटीसाठी सहभागी पक्षातील एका एका नेत्यांची नाव देण्याची सूचना केली. तर त्याचबरोबर इंडियाच्या बैठकीत आज लोगोचे अनावरण होणार आहे. आजच्या दुपारपर्यंत झालेल्या बैठकीत महत्वाच्या गोष्टीवर आज चर्चा करण्यात आली. त्यानंतर आता इंडियाच्या बैठकीतील पक्षांच्या युतीबाबत चर्चा केली जाणार आहे. आजच्या बैठकीनंतर नेत्यांच्याकडून संयुक्त निवेदनही जाहीर करण्यात येणार आहे.

इंडियाच्या समित्या स्थापन

मुंबईतील इंडियाच्या बैठकीच्या पहिल्याच दिवशी दोन स्तरावर समन्वय समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. या समित्या केंद्र पातळीवर एक दुसरी राज्य पातळीवर काम करणार आहे. विरोधकांनी आता पुढील रणनीतीसाठी जोरदार कंबर कसली आहे. इंडियाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत समन्वय समितीमध्ये कमीत कमी चार गट सहभागी होणार आहेत. त्यामध्ये एक युतीचा संयुक्त कार्यक्रम आखण्यात, दुसरा कृती आराखडा तयार करण्यात आणि तिसरा सोशल मीडिया हाताळण्यात आणि एक संशोधन आणि डेटा विश्लेषणात सहभागी होणार आहे. त्याचबरोबर संयुक्त प्रचार आणि रॅलींची रूपरेषा तयार करण्यासाठी एक उपसमितीही स्थापन करण्यात येणार आहे. तर शुक्रवारीही युतीसाठी समन्वय करण्याची चर्चा होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा >> One Nation One Election वरून संजय राऊत संतापले; मोदींना म्हणाले, ‘फुगा…’

पुढची रणनीती लवकरच ठरणार

विरोधकांची इंडिया अशी युती झाल्याने आता भाजप दडपणखाली त्यामुळे लवकरच समन्वय समिती व इतर गट तयार करण्याची गरज असल्याचे मत माडंले आहे. समितीच्या निर्मितीनंतर जागा वाटप आणि इतर घटनांबाबत चर्चा होणार असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले आहे. इंडियाच्या बैठकीत नेत्यांनी आता ठरवले आहे की, पुढची रणनीती लवकरच ठरणार आहे. यादरम्यान बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे म्हणाले की, एनडीएच्या आश्चर्यकारक रणनीती आणि हालचालींना तोंड देण्यासाठी विरोधकांनी आता सज्ज राहिले पाहिजे असंही या बैठकीवेळी स्पष्ट करण्यात आले.

    follow whatsapp