Maharashtra Breaking news Updates : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी आज (12 जुलै) निवडणूक पार पडणार आहे. यासाठी सकाळी 9 वाजता मतदानाला सुरूवात होणार आहे. तर सायंकाळी निकाल लागणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीला आपापले उमेदवार निवडून येण्यासाठी जास्तीच्या मतांची गरज आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय घडामोडी वाढल्या आहेत.
विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी गुप्त पद्धतीने मतदान होणार आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीने 9 उमेदवार उभे केले आहेत. तर विरोधी महाविकास आघाडीचे 3 उमेदवार रिंगणात आहेत. यात भाजपचे 5 उमेदवार पाहायला मिळत आहेत. तर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट यांनी प्रत्येकी 2 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. तर दुसरीकडे महाविकासआघाडीच्या काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रत्येकी एक उमेदवार रिंगणात आहे. तर शरद पवार गटाने भारतीय शेतकरी आणि कामगार पक्षाचे उमेदवार जयंत पाटील यांना पाठिंबा दिला आहे. यासंदर्भातील ताजे अपडेट्स वाचा....
सध्या देशभरातील विविध भागांत जोरदार पाऊस होत असून, राज्यातील विविध भागांनाही पावसाने झोडपले आहे.
मराठा आरक्षणाच्या संबंधीत विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली मराठवाड्यात शातता रॅली सुरू आहे.
लाइव्हब्लॉग बंद
ADVERTISEMENT
- 08:51 PM • 12 Jul 2024महाविकास आघाडीची मतं मिळाली - देवेंद्र फडणवीस
महायुतीने 9 उमेदवार उतरवले तेव्हा अनेकजण वल्गणा करत होते आमचे उमेदवार पडतील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकतील असे सांगितले जात होते. पण आम्हाला आमची मतं तर मिळालीच, त्यासोबत महाविकास आघाडीची मतं ही मिळाली आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. तसेच विधानसभेच्या निवडणुकीत महायुती जिंकून येईल, असा, विश्वास देखील देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
- 07:42 PM • 12 Jul 2024ठाकरेंच्या शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर विजयी,
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर विजयी ठरले आहेत. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांचा पराभव झाला आहे.
- 07:33 PM • 12 Jul 2024विधान परिषद निवडणुकीत काँग्रसची 8 मतं फुटली
विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या किमान 8 आमदारांनी महायुतीला क्रॉस वोटींग केल्याचा अंदाज आहे.
- 07:26 PM • 12 Jul 2024कोण-कोणते उमेदवार झाले विजयी?
महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीचा निकाल
भाजपचे 4 उमेदवार पहिल्या मतमोजणीत विजयी
1)पंकजा मुंडे (जिंकल्या)
2) परिणय फुके(जिंकले)
3)अमित गोरखे (जिंकले)
4)योगेश टिळेकर(जिंकले)5) सदा भाऊ खोत (जिंकले)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी AP)
1)शिवाजी राव गर्जे (जिंकले)
2)राजेश विटेकर (जिंकले)शिवसेना (शिंदे)
1) कृपाल तुमाने (जिंकले)
2) भावना गवली ( जिंकल्या)
शिवसेना - UBT
1)मिलिंद नार्वेकर (मतमोजणी अद्याप सुरू आहे.)शेकाप - NCP शरद पवार उमेदवार
1)जयंत पाटिल (मतमोजणी सुरू)काँग्रेस
1)प्रज्ञा सातव( जिंकल्या)
- 07:20 PM • 12 Jul 2024निकालावर एकनाथ शिंदे काय म्हणाले?
अडीच वर्षापुर्वी याच दिवशी आम्ही उठाव केला. अडीच वर्षापुर्वी आम्ही धाडसी निर्णय घेतला, असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
काहींनी गर्दी झाली की लगेच अँलर्जी होती. मला गर्दीची अॅलर्जी नाही.
मविआ काळात सगळ्या योजनांचा खोडा घालण्याचा प्रयत्न केला.
योजना केल्यानंतर काही लोकांना पोटदुखी होईल, मळमळ होईल, त्यांचा मोफत इलाज बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्यात होईल, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केली. - 07:08 PM • 12 Jul 2024महायुतीचे सर्व उमेदवार विजयी, महाविकास आघाडीचा 'हा' उमेदवार पडणार?
महायुतीचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. तर मविआचा एक उमेदवार जिंकून आला आहे. त्यात ठाकरेंचे उमेदवार मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटील यांच्यातून कोणता उमेदवार जिंकणार आणि पडणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
- 07:04 PM • 12 Jul 2024विजयानंतर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
मी खूप आनंदी आहे. मी पक्षासाठी जास्त काम करू शकेन त्यामुळे मला खूप आनंद वाटतोय. आधी देशाचा अनुभव घेतला आता राज्याचा अनुभव घेणार आणि खूप छान काम करता येईल असे भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
- 06:49 PM • 12 Jul 2024विधानपरिषद निवडणुकीच्या निकालावर अजित पवार काय म्हणाले?
महायुतीचे 9 आमदार निवडून यायला अडचण नाही. या निवडणुकीकडे सगळ्या जनतेचं लक्ष होतं.महाराष्ट्राचं लक्ष होतं. वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या पसरवल्या जात होत्या. पण एका गोष्टीच समाधान आहे. आमच्याकडे पण मतं 42 होती, पण त्या पेक्षा अधिक मतं, आमदारांनी शिवाजीराव गर्जे आणि योगेश विटेकरांना दिली आहे. त्या सर्व आमदारांचे मी आभार मानतो, असे अजित पवार म्हणाले आहेत.
वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा होत होत्या हे फुटणार ते फुटणार अशाप्रकारच्या बातम्या येत होत्या. पण शिंदे, फडणवीस आणि आम्ही एकत्र बसून शिंदेंची मतं त्यांनी सांभाळायची, भाजपची मतं त्यांनी सांभाळायची आणि राष्ट्रवादीची मतं राष्ट्रवादीने सांभाळायची असं ठरलं होतं.
आमची महायुतीची एकी यातून दिसून आली आहे. त्यामुळे हीच एकी विधानसभेत दिसून येईल. तसेच महायुतीच्या उमेदवारांना मतदान करणाऱ्या आमदारांचे मी आभार मानतो. निवडून आलेल्या उमेदवारांचे मनापासून कौतुक करतो. एक 12 उमेदवार आला आणि निवडणुकीला रंगत चढली. पण आता निकाल आल्यानंतर चित्र स्पष्ट झाले आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.
- 06:44 PM • 12 Jul 2024महाविकास आघाडीला बसणार झटका, 'हा' उमेदवार पडणार
मिलिंद नार्वेकर किंवा जयंत पाटलांपैकी एकाचा पराभव निश्चित आहे.
- 06:41 PM • 12 Jul 2024महायुतीचे सर्व आमदार विजयी
महायुतीचे सर्व आमदार विजयी ठरले आहेत. सदाभाऊ खोत यांनी 26 मतं मिळवत विधानपरिषद निवडणुकीत मोठा विजय मिळवला.
- 06:38 PM • 12 Jul 2024जयंत पाटील -सदाभाऊ खोत यांच्यात रस्सीखेच
जयंत पाटील आणि सदाभाऊ खोत यांच्यामध्ये सध्या बरीच रस्सीखेच सुरू आहे. सदाभाऊ खोत यांना 14 तर जयंत पाटील यांना 12 मतं मिळाली आहेत.
- 06:38 PM • 12 Jul 2024नार्वेकर विजयापासून 1 मतं दूर
शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे मिलिंद नार्वेकर हे विजयापासून अवघ्या 1 मतांनी दूर, त्यांना आतापर्यंत 22 मतं मिळाली आहेत.
- 06:37 PM • 12 Jul 2024शिंदेंचे दोन्ही उमेदवार विजयी
शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे दोन्ही उमेदवारांनी विजय मिळवला आहे. भावना गवळी यांना 24 तर कृपाल तुमाने यांना 25 मिळाली आहेत. त्यामुळे शिवसेनेने अपेक्षित असा विजय या निवडणुकीत मिळवला आहे.
- 06:33 PM • 12 Jul 2024अजित पवारांनी मारली मोठी बाजी, दोन्ही उमेदवार विजयी
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या राजेश विटेकर यांनी 23 मतं मिळवून विजय मिळवला. तर शिवाजीराव गर्जे यांनीही 24 मतं मिळवून आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केलं आहे.
- 06:32 PM • 12 Jul 2024अजित पवारांनी मारली मोठी बाजी, दोन्ही उमेदवार विजयी
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या राजेश विटेकर यांनी 23 मतं मिळवून विजय मिळवला. तर शिवाजीराव गर्जे यांनीही 24 मतं मिळवून आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केलं आहे.
- 06:25 PM • 12 Jul 2024पंकजा मुंडेंचा राजकीय वनवास संपला, अखेर आमदार पदाची माळ पडली गळ्यात
विधानपरिषद निवडणुकीत 26 मतं मिळवून पंकजा मुंडे यांनी विजय मिळवला आहे. 2019 पासून पंकजा मुंडे यांना आमदार किंवा खासदार होता आलं नव्हतं. मात्र, अखेर आज विधानपरिषद निवडणुकीत विजय मिळवून पंकजा मुंडेंनी पुन्हा आमदारकी मिळवली आहे.
- 06:25 PM • 12 Jul 2024कुणाला किती मतं मिळाली?
आतापर्यंतची मते
भाजप
टिळेकर - 26
गोरखे - 22
मुंडे - 26
खोत - 10
परिणय फुके - 26शिंदे शिवसेना
तुमाने - 16
भावना गवळी - 10अजित पवार राष्ट्रवादी
गर्जे - 20
विटेकर - 21शिवसेना ठाकरे -
मिलिंद नार्वेकर - 17शेकाप - जयंत पाटील - 8
काँग्रेस - प्रज्ञा सातव - 19
- 06:15 PM • 12 Jul 2024पहिला निकाल हाती आला, भाजपचा 'हा' उमेदवार झाला विजयी
भाजपचे योगेश टिळेकर हे पहिल्याच फेरीत विजयी झाले आहेत. त्यांनी एकूण 23 मतं मिळवून आपला विजय निश्चित केला आहे.
- 06:13 PM • 12 Jul 2024भापजच्या योगेश टिळेकरांना 21 मतं
भापजच्या योगेश टिळेकरांना 21 मतं मिळाली आहेत.
शिदेंच्या शिवसेनेच्या कृपाल तुमानेंना 16 मतं मिळाली आहेत.
- 06:07 PM • 12 Jul 2024प्रज्ञा सातव 18 मतांना आघाडीवर
पहिल्या पसंतीची मतमोजणी
मिलिंद नार्वेकरांना आतापर्यंत 17 मतं
प्रज्ञा सातव यांना आतापर्यंत 18 मतं
जयंत पाटील यांना 6 मतं
भावना गवळी यांना 10 मतं
योगेश टिळेकर 15 मतं
शिवाजीराव गर्जे यांना 15 मतं
राजेश विटेकर यांना 15 मतं
परिणय फुके यांना 17 मतं
कुपाल तुमाने यांना 12 मतं
पंकजा मुंडे यांना 11 मतं
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT